অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

जिच्‍या हाती पाळण्‍याची दोरी ती जगाला उध्‍दारी उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमत योगी।' असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! राजमाता जिजाऊसाहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे' त्या मूलमंत्राचा उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. १२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जे अद्वतीय कन्यारत्न जन्माला आले ते म्हणजे जिजाऊ आणि ही गुणी पोर, बाबाजी आणि शहाजी भोसल्यांची अर्धांगिनी झाली ती १६०५ च्या रंगपंचमीला अर्थात फाल्गुन वदय पंचमीला. त्या भोसले घराण्याला 'पृष्णेश्वर'मंदिराच्या जीणोंद्धाराचे श्रेय जाते. जिचे वर्णन 'शिवभारत २-४५' मध्ये केले 'गड:गेव गुणगम्भीरा व्यराजत महोदधिन् (अर्थात गुणगंभीर अशी गंगा समुद्राला शोभून दिसते, तशी जिजाबाई शहाजीला शोभली.) 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' तद्वतच युगपुरुष घडत असताना ते बीज आणि त्यावर होणारे संस्कार यांचा अन्योन्य संबंध होता. कारण शिवबांच्या जन्माच्या पार्श्वभूमीचा विचार करताना हा गर्भ जिजाऊंच्या उदरी वाढत असताना काय परिस्थिती होती? सभोवताली किंवा उभ्या महाराष्ट्रात. जाधव आणि भोसले या घराण्यांची सोयरीक जुळली खरी; पण मने मात्र जुळली नाहीत, त्यामुळे जिजाबाईंना फार वाईट वाटे. एका अकल्पित प्रसंगी जाधव व भोसले घराण्यात युद्धही जुपले. महाराष्ट्रात आणि सर्वत्र मोगल आणि विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. जिजाबाईंना असह्य होई. मराठ्यांच्या संसाराची, प्रदेशांची आणि तीर्थक्षेत्रांची दैना पाहून जिजाबाईंच्या हृदयाला पीळ 'झगडणे आणि संघर्ष’ हा त्यांच्या जीवनाचा पायाच होता. शिवबाच्या जन्मापासून प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याशी करताना त्या डगमगल्या नाहीत. ही माता ह्या पुत्राच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घौडदोड करणारी ही माता, तिने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली असे म्हणावे लागेल. अस्मानी सुलतानी. संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन ‘शिवाई' देवीचा  कृपाप्रसाद म्‍हणून शिवाजी नामकरण करून त्‍यास इतिहासाचे बाळकडू पाजले, पुण्‍याच्‍या लालमहालात प्रवेश केल्‍यावर पुणे भूमी सोन्‍याच्‍या नांगराने नांगरून येथील आपल्‍या अस्तित्‍वाच्‍या पाऊलखुणा त्‍यांनीच उमटविल्‍या असेच म्‍हणावे लागेल.

प्रसंग रांझयाच्‍या पाटलाचा असो त्‍यात न्‍यायनिवाडा करण्‍याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता जिजाबाईकडूनच.  न्‍यायासनासमोर आपलाच अधिकारी गुंन्‍हेगार  म्‍हणून आल्‍यावर कारवाई करण्याचे प्रशिक्षण मिळाले. निःस्पृह आणि नि:स्वार्थी आंबे तोडल्याचा व त्यावर उपाय म्हणून आयुष्यभर अधीं बाहीचा शर्ट वापरण्याचे ब्रीद पाळणा-या दादोजींची निवड ह्यात त्यांच्या मुत्सद्देगिरीचा भाग जाणवतो. पतीच्या अनुपस्थितीत मुसलमानी राजवटीविरुद्ध बाल शिवाजी व मावळ्यांमध्ये 'स्वराज्य स्थापना'चे बीज रोवून 'हिंदवी स्वराज्याचे' महान स्वप्न पाहण्याचे योगदान देणारी ती माऊली म्हणजे, 'स्त्री क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता असते' हे शब्दशः खरे करून त्यांनी आपल्या पुत्राच्या कर्तृत्वात स्वत:चे योगदान दिले. A low aim is a crime' हे तत्त्व लक्षात घेऊन स्वराज्यनिर्मितीचे भव्य दिव्य स्वप्न उराशी बाळगले.

तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर, रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला प्रेरक ठरल्या त्या एकमेव जिजाऊ माँसाहेब! म्हणतात त्याप्रमाणे, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी'

हे वाक्य शिवराय सार्थ ठरवू शकले ते केवळ माँ साहेबांच्या करारी व नि:पक्षपाती स्वभावाचा त्यांच्यात उतरलेला अंश म्हणूनच! नेताजी पालकरांचे धर्मातर घडवून ह्या वीराच्या घरी स्वत: जाऊन सांत्वन करण्यात किंवा दूरदृष्टीने कोंढण्याचे स्वराज्यातील महत्व ओळखण्यातच ह्या मातेचे योगदान होते. आग्रा सुटका - प्रसंगानंतर बैराग्याच्या वेषात आलेल्या प्रतापराव गुजर ह्यांना सोन्याचे कडे कबूल करून त्या देणा-या राजमाता जिजाऊ होत्या, म्हणूनच हे हिंदवी स्वराज्याचे तारू राज्यभिषेकाच्या काठावर पोहोचले.

पुण्यात राहण्यासाठी आल्यावर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली व जोगेश्वरी आणि केदारेश्वर यांचा जीणोंद्धार केला. जिजाबाई शिवाजीच्या मनावर सतत एक गोष्ट बिंबवीत राहिल्या की, 'हे राज्य आमचे नाही, इथे लोक कंगाल आहेत, देवळे पाडली जात आहेत. गोरगरिबांना वाली उरलेला नाही, शिवबा, तू मोठा हो, यांचा पालनवाला हो.”

तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालीत. जाती-जमातीत व घराण्यांन्यायनिवडांच्या बाबतीत त्या नि:पक्षपाती होत्या. संतमहंतांचा आणि विद्वानांचा त्या योग्य परामर्श घेत असत. परिणामतः संत तुकाराम यांसारखे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले हा त्यांचाच दृश्य परिणाम होता.

अफजलखानाचे संकट आणि सिद्दी जोहरने पन्हाळ्याला दिलेला वेढा हे जिजाबाईंच्या जीवनातील पडले होते. संभाजी व शिवाजी जगले आणि त्यातील शिवाजीवर हे अफजलखानाचे संकट! पण अशाही स्थितीत मन कठोर करून त्यांनी शिवाजींना आशीर्वाद दिला.

'शिवबा तू विजयी होशील!’

पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी स्वतःच युद्धावर निघाल्या होत्या; पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले. या प्रसंगात त्यांची पुत्रप्रेमाची आर्तता आणि विलक्षण आवेश गोष्टी दिसून येतात. इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांना अपघात झाला आणि ते निवर्तले, हा वज्राघात झेलून त्या सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी विनवणी करून त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले. जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते. त्या कर्तबगार सर्व राज्यकारभार त्यांच्या स्वाधीन केला होता. जिजाबाई ह्या ‘युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती, सह्याद्रीच्या कुशीत, उदयास आले एक अनमोल रत्न! उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!'

स्त्रोत :शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate