অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठा अंमल

मराठा अंमल

मराठा अंमल

छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड मराठी सत्तेच्या परमप्रभुत्वाचा (मराठा सुप्रीमसी) कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता  इ. स. १८१८ पर्यंत टिकली. या नोंदीत मराठेशाहीचा म्हणजे मराठा अंमलाचा पुढील अंगांनी थोडक्यात परामर्श घेतला आहे:

(१) ऐतिहासिक आढावा,

(२) राज्य व्यवस्था

(३) सैनिकी व्यवस्था

(४) न्यायव्यवस्था,

(५) मुलकीव्यवस्था,

(६) आर्थिक स्थति,

(७) सामाजिक स्थिती,

(८) कला आणि खेळ आणि

(९) मूल्यमापन व र्‍हासाची मीमांसा.

यांशिवाय मराठा अंमल या विषयाशा निगडीत असलेल्या तसेच त्यासंबंधी विविध अंगांनी माहिती देणार्‍या काही स्वतंत्र नोंदी विश्वकोशात  अकारविल्हे यथास्थळी दिलेल्या आहेत. अशा नोंदी साधारणपणे पुढील प्रकारच्या आहेत:

(१) इतिहासग्रंथ, इतर ऐतिहासिक वाङमय व इतिहासकार: उदा., इतिहासलेखनपद्धति; बखर वाङमय; मराठी साहित्य (इतिहास लेखन); वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, ग. ह. खरे, द. वा. पोतदार, ग्रँट डफ, जदुनाथ सरकार इत्यादी.

(२) मराठा अंमलाची विशेष माहिती देणार्‍या नोंदी : उदा., आज्ञापत्र; इंग्रज मराठे युद्ध; पेशवे; मराठ्यांची युद्धपद्धती; मराठा राजमंडळ इत्यादी.

(३) मराठिशाहीतील महत्वाच्या व्यक्ती: उदा., छ. शिवाजी व त्यानंतरचे बहुतेक सर्व छत्रपती; बाळाजी विश्वनाथ व त्यानंतरचे इतर सर्व पेशवे. महादजी शिंदे, नाना फडणीस, हरिपंत फडके इ. मराठे सरदार आणि मुत्सदी.

(४) मराठेशाहीतील महत्वाची घराणी व संस्थाने: उदा., गायकवाड, पटवर्धन, पवार, भोसले, शिंदे, होळकर इ. घराणी व इंदूर, औंध, कोल्हापूर, झांशी, ग्वाल्हेर, बडोदे इ. संस्थाने.

(५) मराठेशाहीतील महत्वाच्या लढ्या: उदा., खर्ड्याची लढाई पानिपतची लढाई, राक्षसभुवनची लढाई इत्यादी.

(६) मराठा अंमलाच्या पूर्वोत्तर काळातील महत्वाच्या राजसत्ता : उदा., आदिलशाही, निजामशाही, बहमनी सत्ता, मोगलसत्ता, यादव वंश, विजयनगरचे साम्राज्य.

(७) याशिवाय महाराष्ट्र राज्यावरील व्यातिलेखात इतिहास या उपविषयाखाली मराठा अंमलविषयी धावता आढावा देण्यात आलेला आहे.

जिज्ञासू वाचकांना वरील सर्व नोंदीतून मराठा अंमलाविषयी विविध प्रकारची माहिती मिळू शकेल.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate