অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुंबईचा इतिहास

मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून देशाचे आर्थिक शक्तीस्थान आहे तसेच हिंदी चित्रपट सृष्टीचे हृदय आणि कापड उद्योगापासून रसायनांपर्यत सर्व उद्योगांचे केंद्रस्थान आहे

मुंबईचे वैशिष्टे म्हणजे हिंदी चित्रपट स्रृष्टी, क्रिकेटची मैदाने, समुद्र चौपाटीवरील भेळपुरी, विशेष वसाहतींचे वास्तुशिल्प आणि लाल दुमजली बसगाडया हे होय.


सुवर्णस्मृति

बेटावरील शहर

मुंबईचे वैशिष्टे म्हणजे हिंदी चित्रपट स्रृष्टी, क्रिकेटची मैदाने, समुद्र चौपाटीवरील भेळपुरी, विशेष वसाहतींचे वास्तुशिल्प आणि लाल दुमजली बसगाडया हे होय. 

ह्या बेटावर मुख्यतः कोळी मच्छीमार लोकांचे अनेक शतकांपासून वास्तव्य होते. पुढील शतकामध्ये बेटाच्या आजूबाजूकडील भूखंडावर महत्वाची शहरे आणि बंदरांचा समावेश झाला 

हे ठिकाण अनेक हिंदु आणि मुस्लिम राजेशाहीच्या राज्यामध्ये झालेल्या विकासाचे साक्षीदार आहे, परंतु या बेटाचे भौतिक रुपांतर 1534 नंतर पोर्तुगीजांनी गुजरातच्या मुस्लिम राज्यकर्त्याकडून घेतल्यानंतर सुरु झाले.




आंदण

सन 1661 मध्ये,इग्लंडचे राजे चार्ल्स-दुसरा यांनी ब्रॅगांझाच्या कॅथरिनसोबत विवाह केला त्यावेली त्यांना हे बेट विवाहाचे आंदण म्हणून पोर्तुगीजांनी भेट दिले.



ब्रीटीश इस्ट इंडिया कंपनीने पूर्व किना-यावरील मोठया सात बेटांच्या आणि पश्चिमेस नैसर्गिक उपसागर यावर स्थित असलेले भविष्याच्या दृष्टीने संभवनीय संरक्षित बंदर भाडयाने घेतले होते. 

ईस्ट इंडिया कंपनीने अनुकूल व्यापार केंद्र आणि बंदर विकसित केले व किल्ला बांधला. पुढील दशकामध्ये सात बेटे एकत्रित जोडून सतत वाढत्या लोकसंख्येकरिता जागा पुरविणयास अनेक सुधारणा प्रकल्प हाती घेण्यात आले होते.


19व्या शतकाच्या मध्यान्ही, अनेक औद्योगिक आस्थापने उभारले गेले आणि त्यामध्ये प्रामुख्याने महत्वाची कापडाच्या गिरण्या होत्या आणि रेल्वे, बंदरे आणि गिरण्या यांमध्ये रोजगार मागण्यासाठी स्थलांतरीत झाल्यमुळे लोकसंख्या झापाटयाने वाढत गेली.



व्यावसययिक भरभराट. बॉम्बेची पुनर्रचना. आणि अधिक. (मुंबईची व्यावसययिक भरभराट व पुनर्रचना)

सन 1861 मध्ये, अमेरिकन यादवी युध्द सुरु झाले आणि त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकेच्या दक्षिण राज्यातील बंदरांचा कोंडमारा झाला; त्या देशामधून इंग्लंडमधील लंकेशायर मिलला कापसाचा कच्चा माल मिळविण्यास अशक्य झाले. त्या मिलला भारतातील पश्चिम आणि मध्य भागातील बॉम्बे बाजारातून कापूस विकत घेण्यास भाग पाडले आणि पाच वर्षाच्या युध्द कालावधीमध्ये, असा अंदाज होता की, शहरामध्ये 81 दशलक्ष पौंडहून जास्त चलनी नाणी आली. याचा परिणाम म्हणजे फक्त व्यावसायिक भरभराटीचा चमत्कारच नाही तर कंपनीच्या रोख्यांमध्ये सुद्धा भाव वाढ झाली अणि जी प्राथमिकपणे अमर्याद सुधारणा योजना स्थापण्याकरिता झाली होती.

सन 1864 पर्यंत येथे 31 बँका, 16 आर्थिक सहाय्य संघटना, 8 जमीनीच्या कंपन्या, 16 प्रेस कंपन्या, 10 जहाज कंपन्या, 20 आयुर्विमा कंपन्या तर 1855 मध्ये 10 कंपन्या होत्या आणि संयुक्त स्टॉक कंपन्या अस्तित्वात नव्हत्या.


दुर्देवाने, सन 1865 मध्ये अमेरिकन यादवी युध्दाच्या समाप्तीमुळे, बॉम्बेतील व्यावसायिक भरभराट कोसळली आणि अनेक कंपन्या डबघाईस गेल्या. भरभराटीच्या मध्यान्ही सन 1862 ते 1867 पर्यंत बॉम्बेचे राज्यपाल, सर बार्टल फ्रेर, यांनी किल्ल्याची भिंत तोडून शहराची पुनर्रचना करण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला.

किल्ल्याचा तट, दरवाजे आणि खंदक संपूर्णतः काढून टाकण्यात आले आणि किल्ल्याच्या भागामध्ये भव्य गोठीक सजावट असलेल्या इमारती बांधून मोकळया जागेवर नवीन शहर उदयास आले. 19व्या शतकाच्या अखेरपर्यत, बॉम्बे भारताचे प्रमुख शहर बनले आणि देशाचे महत्वाचे, व्यावसायिक, आर्थिक, व्यापारी आणि औद्योगिक केंद्र आणि बंदर बनले. सन 1890 मध्ये मोठया प्रमाणावर प्लेग या साथीचा परिणाम म्हणून शहरात बहुसंख्य सुधारणा करण्यात आल्या. सन 1930 मध्ये, जेव्हा सर्व उपलब्ध भूभागावर बांधकाम झाल्यानंतर बहुसंख्य औद्योगिक आस्थापने उभारले गेले, जमीनीवरील ताण वाढत गेला आणि इमारत बांधकाम उच्च टोकावर पोहोचले.


बॉम्बे आणि स्वातंत्र्य चळवळ


स्वातंत्र्य चळवळीने बॉम्बेस प्रचंड उत्तेजन मिळाले ज्यामुळे प्रत्येक मोठया राजकीय आंदोलनामध्ये बॉम्बेची प्रमुख भूमिका होती. सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पाकीस्तानमधून आलेल्या निर्वासितांची पुढे लोकसंख्येमध्ये भर पडली. 20व्या शतकाच्या मध्यानंतर, बॉम्बे आणि बाहेरील भागांमध्येही उंच इमारतीच्या स्वरुपामध्ये वाढ होत गेली, त्यामुळे उत्तरीय उपनगरे आणि भूखंडामध्ये जलद विसतर होत गेला. आज, शहराची लोकसंख्या अंदाजे 14 दशलक्ष इतकी आहे.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत:http://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?NavigationTarget=navurl://33c68189005207eb22af65b590e217a8

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate