অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एन्स्टॅटाइट

एन्स्टॅटाइट

 

पायरोक्सीन गटातील खनिज. स्फटिक समचतुर्भुजी ,प्रचिनाकार, परंतु विरळाच आढळतात.  हे बहुधा संपुंजित, तंतूमय किंवा पत्रित स्वरूपात आढळते. पाटन: (110) स्पष्ट ,(010) ला समांतर विभाजकप्रतले [ स्फटिकविज्ञान] भंजन खडबडीत. कठिनता ५·५ वि.गु..३·२-३·५ चमक काचेसारखी, पाटनपृष्ठांची मोत्यासारखी रंग करडसर, पिवळसर किंवा हिरवट पांढरा, हिरवा , उदी, दुधी काचेप्रमाणे पारभासी, कस करडसर सा. सं. MgSiOa. यात FeO ५% पर्यंत असते. FeO ५% ते १३% असल्यास खनिजाची चमक ब्रॉँझसारखी होते. अशा खनिजाला ब्रॉँझाइट म्हणतात. यापेक्षा अधिक झाल्यास हायपर्स्थीन तयार होते. पायरोक्सिनाइट, पेरिडोटाइट, डायोराइट, काही रूपांतरित खडक इत्यादीमध्ये व सामान्यपणे अशीनीमध्येही (पृथ्वीवर पडलेल्या उल्का पाषाणांत) आढळते. उच्चतापसह (उच्च तापमान सहन करण्याच्या) गुणधर्मामुळे विरोधक या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून नाव पडले.
लेखक : अ.ना.ठाकूर.

 

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate