অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एप्समाइट

एप्समाइट

 

(एप्सम सॉल्ट). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी परंतु विरळाच आढळतात. सामान्यत: गुच्छाकार राशींच्या व तंतुमय रचना असलेल्या पापुद्र्यांच्या स्वरूपात आढळते. पाटन : (010) अत्युकृष्ट [ पाटन ]. भंजन शंखाभ [ खनिजविज्ञान]. कठिनता २–२·५ वि. गु.  १·७५. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी ते मातीसारखी. रंग व कस पांढरा. चव कडू व खारट. रा. सं. MgSO4.7H2O. कित्येक गुहांच्या पृष्ठांवर नैसर्गिक पाणी सुकून तयार झालेल्या लवणी लेपांत व ‘मिठाच्या डोंगरांतील’ लवणी निक्षेपांत आढळते. इंग्लंडमधील एप्सम या प्रदेशात प्रथम आढळले म्हणून एप्समाइट हे नाव दिले गेले.
लेखक : क.वा.केळकर

 

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate