অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एरिथ्राइट

एरिथ्राइट

 

खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार, प्रचिनांवर उभ्या रेखा [स्फटिकविज्ञान]. गोलकार, वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराचे), कधीकधी तारकाकार, चूर्णिल, पुंजक्यांच्या किंवा पापुद्यांच्या स्वरूपात आढळते. पाटन : (010) उत्कृष्ट [पाटन]. छेद्य (चाकूने कापता येणारे). कठिनता १·५­­­ –२·५. वि. गु. ३·०६. दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी. रंग किरमिजी लाल, कधीकधी करडा. कस रंगाहून फिकट. रा. सं. Co3 (AsO4)2.8H2O. हे विरळाच आढळणारे व कोबाल्ट आर्सेनाइडांपासून तयार होणारे द्वितीयक खनिज असून कोबाल्टाच्या धातुक निक्षेपात वरच्या भागात आढळते. त्यामुळे कोबाल्टाची खनिजे व त्यांच्या जोडीने आढळणारी चांदी यांचा मागोवा घेण्यास याचा मार्गदर्शकासारखा उपयोग होतो. नाव रंगावरून, लाल या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून पडले आहे.
लेखक : अ.ना.ठाकूर

 

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate