অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कवच विरूपण

कवच विरूपण

 

पृथ्वीच्या कवचाच्या हालचालींमुळे कवचाच्या खडकांस बाक येणे किंवा घड्या पडणे किंवा त्यांच्यात विभंग (मोठ्या भेगा) उत्पन्न होणे याला कवच विरूपण म्हणतात. कवचाच्या हालचालींमुळे व त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्‍या विरूपणांचे दोन प्रकार आहेत. (१) गिरीजनक (पर्वत निर्माण करणाऱ्‍या) हालचालींमुळे होणारे विरूपण : यात पृथ्वीच्या लांब व चिंचोळ्या प्रदेशावर संपीडक (संकोचन घडवून आणणारा) दाब पडून खडकांना घड्या पडणे व त्यांच्यात व्युत्क्रमी विभंग किंवा प्रणोद विभंग [ विभंग, खडकांतील] उत्पन्न होणे इ. क्रिया घडून येतात. उदा., हिमालय किंवा अरवली यांच्या रांगा असलेला प्रदेश, हे गिरीजनक हालचालींमुळे निर्माण झालेले आहेत. (२) भूरूपजनक किंवा खंडजनक हालचालींमुळे होणारे विरूपण : यात कवचाच्या विस्तीर्ण क्षेत्रास किंचित बाक येतो व पालथ्या किंवा उलथ्या तव्यासारखे फुगवटे व खोलसर भाग तयार होतात. त्या क्षेत्रावर ताण पडून सामान्य विभंग तयार होतात. खडकांस घड्या पडून संमुखनती व विमुखनती [ घड्या, खडकांतील] उत्पन्न झाल्या तर त्या रुंद व मंद तरंगांसारख्या असतात. उदा., भारताचे द्वीपकल्प आणि आफ्रिका खंडाचा बराचसा भाग ही भूरूपजनक हालचालींमुळे निर्माण झालेली आहेत.
लेखक : क.वा.केळकर

 

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate