অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॅलॅव्हेराइट

कॅलॅव्हेराइट

खनिज. स्फटिक एकनताक्ष, लांब प्रचिनाकार, प्रचीनाच्या फलकावर त्याच्या लांबीस समांतर रेखा असतात [ स्फटिकविज्ञान]. पुष्कळदा यमलन (जुळे स्फटिक) आढळते. बहुधा कणमय स्वरूपांत आढळते. अत्यंत ठिसूळ. कठिनता २⋅५. वि. गु. ९⋅३५. अपारदर्शक. रंग पितळेसारखा ते रुपेरी. कस पिवळसर ते हिरवट करडा. चमक धातूसारखी. रा. सं. AuTe2. सोन्याच्या जागी बहुधा अल्प चांदी आलेली असते. सिल्व्हेनाइट व इतर टेल्यूराइडांच्या जोडीने ते आढळते.  पाटन नसल्याने सिल्व्हेनाइटापासून वेगळे ओळखता येते. सोन्याचे धातुक (कच्ची धातू) म्हणून त्याचा उपयोग होतो. ऑस्ट्रेलिया व कोलोरॅडो येथील याच्या साठ्यांपासून सोने मिळविले जाते. कॅलिफोर्नियातील कॅलॅव्हेरास काऊंटीमध्ये सर्वप्रथम आढळल्यावरून हे नाव पडले.
लेखक : अ.ना.ठाकूर

 

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate