অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पंजाब- भूगोल, हवामान

पंजाब- भूगोल, हवामान

पंजाब राज्य : भारताच्या उत्तर भागातील एक राज्य. विस्तार २९° ३२’ उ. ते ३२° ३४’ उ. अक्षांश आणि ७३° ५५’ पू.ते ७७°  पृ. रोखांश यांदरम्यान. क्षेत्रफळ ५०,३७६ चौ. किमी., लोकसंख्या १,५५,००,००० (मध्य १९७८ अंदाज). याच्या पश्चिमेस पाकिस्तान, उत्तरेस पाकिस्तान, जम्मू व काश्मीर राज्य, ईशान्येस व पूर्वेस हिमाचल प्रदेश, आग्नेयीस व दक्षिणेस हरयाणा, नैर्ऋत्येस राजस्थान ही राज्ये येतात. एकेकाळी सिंधू आणि सतलज यांदरम्यानचा झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या पाच नद्यांच्या खोर्‍यांनी व्यापलेला; डोंगररांगापासून हिमालयपायथ्याच्या शिवालिक श्रेणीपर्यंत विस्तारलेला, असा मूळचा पंजाब होता. ब्रिटिश राजवटीत त्याचे वायव्य सरहद्द प्रांत व दिल्ली, फाळणीत पश्चिम पंजाब, नंतर भाषावार विभागणीत हिमाचल प्रदेश व अखेर १९६६ साली हरयाणा असे तुकडे तुटत जाऊन, शेवटी पश्चिमेस रावी-सतलज नद्या, दक्षिणेस फिरोझपूर भतिंडा व पतियाळा हे जिल्हे आणि पूर्वेस हिमालयाचा पायथा या त्रिकोणात शेष पंजाबचा तुटपुंजा भाग राहिला. पंजाब व हरयाणा राज्यांची चंडीगढ राजधानी आहे.
भूवर्णन : पंजाब राज्याच्या ईशान्य सीमेवरील गुरदासपूर, रूपार व होशियारपूर जिल्ह्यांच्या पूर्व सीमांवर शिवालिक डोंगरांच्या रांगा आहेत. पश्चिम सीमेवर उत्तरेस रावी आणि नैर्ऋत्येस सतलज असून ही पाकिस्तानबरोबरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भूरूपदृष्ट्या पंजाबचे दोन भाग पडतात. पहिला भाग ईशान्य ग्हणजे सीमेवरील उच्च प्रदेश. या भागात उंची ३६५ मी. पासून ६१० मी. पर्यंत वाढत जाते व रूपारच्या पूर्वेस हरयाणामध्ये ही उंची १,५०० मी. पर्यंत वाढते. याच्या दुसऱ्या भागात उच्च प्रदेशाच्या नैर्ऋत्येस व पश्चिमेस दुआबांनी बनलेले मैदान असून त्याची उंची २१० ते ३६५ मी. पर्यंत आहे. उत्तरेस सतलज व रावी यांमधील बडी दोआब (दुआब) चा थोडा भाग या मैदानात येतो, त्याची उंची २०० ते ३०० मी. पर्यंत आहे; तर त्याच्या आग्नेयीस ‘बीस्त’ रा बिआस आणि सतलज यांमधील संपूर्ण त्रिकोणी दुआब आहे. हा दुआब बडी दुआबपेक्षा थोडासा उंच आहे. पंजाबमध्येही अन्य प्रदेशांप्रमाणे नवीन व जुन्या गाळाचे प्रदेश आहेत. नद्यांकाठच्या प्रदेशांस ‘बेत’ म्हणतात व ते सिल्टयुक्त असून जास्त सुपीक असतात. सतलजच्या बेतची रुंदी १० ते २० किमी. आहे. काही वेळा क्षार साचून हे भाग नापीक बनतात. उच्च भागातील दुआबाच्या मध्यभागी जुन्या गाळाचे वाळयुक्त प्रदेश आहेत. त्यांस ‘बार’ म्हणतात. पंजाबच्या मृदा मुख्यतः जलोढीय स्वरूपाच्या आहेत. त्यांपैकी सखल नदीकाठच्या मृदांस ‘खादर’, तर उंच प्रदेशातील मृदांस ‘बांगर’ म्हणतात. वाळवंटाच्या आग्नेय भागात पॅडॉक प्रकारच्या क्षारयुक्त भुऱ्या पिंगट मातीचे आवरण काही प्रदेशात आहे. काही भागांत गाळाच्या थरांची जाडी ४,५०० मी. पेक्षाही जास्त आढळते. खनिज संपत्तीच्या दृष्टीने पंजाब हे महत्त्वाचे राज्य नाही. तेल संशोधनाचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या पाच नद्यांचा प्रदेश तो पंजाब, हे नाव आज समर्पक राहिलेले नाही. सध्या रावी केवळ सीमेवरून, बिआस केवळ ११२ किमी. व सतलज सु. ७७५ किमी. या राज्यातून वाहतात. बिआस गुरदासपूरजवळ हिमाचल प्रदेशातून प्रवेशते व दक्षिणेस वाहते. बिआस व सतलज यांचा संगम माखूरजवळ होतो. सतलज हीच पंजाबची खरी महत्त्वाची नदी होय. ती हिमाचल प्रदेशातून भाक्राजवळ पंजाबमध्ये प्रवेशते व रूपारपर्यंत दक्षिणेस वाहते, तेथे अचानक १० अंशांनी वळून पश्चिमेस वाहते. बिआसच्या संगमानंतर फिरोझपूरच्या उत्तरेस ती पंजाब-पाकिस्तानच्या सीमेवरून फाझिलूकापर्यंत व पुढे पाकिस्तानमधून वाहते. सतलजवर जलंदर जिल्ह्यात पूर्व सीमेवर भाक्रा व नानगल येथे होन घरणे बांधलेली आहेत. भाक्रा धरणामुळे १७२ चौ. किमी. क्षेत्रफळाचा विस्तीर्ण ‘गुरू गोविंदसागर’ जलाशय निर्माण झाला आहे व तो मुख्यतः हिमाचल प्रदेशात पसरला आहे.
हवामान : राज्याचे हवामान खंडीय स्वरूपाचे असून अमृतसरचे वार्षिक सरासरी तपमान २३.१° से. आहे. उन्हाळ्यात ३४.५° से. व हिवाळ्यात ११.८° से. असते. उन्हाळ्यात दुपारी तपमान ४१° से. पर्यंत वाढते. ऑक्टोबरपासून तपमान कमी होत असून फेब्रुवारी पर्यंत २०°से. पेक्षा कमी असते. जानेवारीमध्ये ११.८° ते १४.२° से. च्या दरम्यान आढळते. संपूर्ण राज्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तपमान जवळजवळ सारखेच असते. पंजाबमध्ये आग्नेय मान्सून अथवा बंगालवरून येणाऱ्या मान्सून शाखेमुळे जुलै-सप्टेंबर या काळात पाऊस पडतो, तर जानेवारी-फेब्रुवारी या काळात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तापासूनही अल्पवृष्टी होते. ईशान्येकडील उच्छ प्रदेशात वार्षिक सरासरी पाऊस ७५ सेंमी. पर्यंत पडतो व तो नैर्ऋत्येस ३० सेंमी. पर्यंत कमी होतो. वार्षिक जलवायूचा विचार करता नोव्हेंबर ते मार्च थंड व उत्साही हवा, एप्रिल ते जून कडक उन्हाळा, जुलै से सप्टेंबर पावसाळा असे हवामान आढळते. ऑक्टोबर महिन्यात हवामान बदलते असते.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/30/2020

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate