অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनस्पती भूगोल भाग २

वनस्पति-भूगोलात कोणत्याही जातीचा, घटकाचा किंवा संपूर्ण पादपजातीचा नैसर्गिक अधिवास (वाढण्याचे ठिकाण) किंवा प्रसार येथे आढळतो त्या संपूर्ण प्रदेशाला ‘क्षेत्र’ म्हणतात. क्षेत्रासंबंधीच्या विशेष माहितीला ‘क्षेत्र वर्णन’ ही संज्ञा आहे. क्षेत्रातील एखाद्या जातीच्या स्थानिक प्रसाराला त्या क्षेत्राचे ‘स्थलवर्णन’ म्हणतात. क्षेत्रांचा साधारण आकार, त्यांचे आकारमान, त्यांच्या किनारीचे (काठाचे) सलग, खंडयुक्त (तुटक) असे प्रकार आणि शेजारी असलेल्यांशी त्यांचे संबंध येथे विचारात घेतले जातात.
अनेक क्षेत्रे एका बिंदूभोवती असल्यास त्यांचा ‘एककेंद्री’ गट व ती अनेक बिंदूभोवती असल्यास ‘अनेककेंद्री’ गट अशा संज्ञांनी ओळखतात; त्यांचा भौगोलिक दृष्ट्या एकच प्रांत असतो किंवा तसे अनेक असतात. निकट संबंधाच्या परंतु परस्परवर्ज्य जातींच्या क्षेत्रांना प्रतिनिधीरूप (बदली) म्हणतात. जुन्या आणि अधिक विस्तृत क्षेत्राच्या विद्यमान लहान उर्वरित किंवा शेष मात्र भागाला ‘अवशिष्ट क्षेत्र’ म्हणतात. विविध क्षेत्रे व त्यांचे पादपजातीय संबंध यांच्या आधारावर भूपृष्ठाचे अनेक (सु. ३०) पादपजातीय प्रदेश ओळखले जातात.
पादपजाती व त्यांचा प्रसार यांचा कार्यकारणभाव समजून घेऊन, त्यांचा इतिहास व परिस्थितिविज्ञान यांच्या संदर्भात त्यांचे वर्णन करण्याची पद्धत रूढ आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती व जातींचा क्रमविकास यांमध्ये बदलणाऱ्या भूपट्टांचे सिद्धांत [भूपट्ट सांरचनिकी], महाद्वीपकल्पी या राशींची हालचाल, बदलत्या समुद्र पातळ्या आणि भूवैज्ञानिक काळातील पर्वत वर्णनविषयक व जलवायुमानविषयक विभेद (बदल) ह्या सर्वांशी संबंधित असलेल्या विचारांचा अंतर्भाव होतो; या सर्वामुळे पादपजातींचे स्थानांतर आणि त्याची शाश्वती यांवर परिणाम झालेले आढळतात.
पारिस्थितिक घटकांत ज्यांचे निरीक्षण करता येते व परिमाणात्मक मापन करता येते अशा पुढील बाबींचा समावेश करतात. वर्णन, आर्द्रता, पाण्याच्या पातळ्या, तापमान, वारा, जमीन (मृदा) प्राणी, माणसे इत्यादींच्या तत्कालिक व समकालीन भूमिका . पादपजातीय वनस्पति-भूगोलाचा पाया घालून त्याला सुस्थित करण्यास रोनाल्ड गुड, लीऑन क्रोइझॅत आणि इतर कित्येक शास्त्रज्ञांनी फार परिश्रम केले. या उपशाखेचे अंतिम उद्दिष्ट ज्ञात वस्तुस्थितीचे अर्थपूर्ण पुनःसंयोजन करणे आणि संकल्पनांची पुनर्रचना करणे हे आहे; अर्थात ज्या वेळी सागरमध्यातील तडे (भेगा) आणि पालटणारे भूपट्ट ह्यासंबंधीची भूविज्ञानातील विकासाची माहिती उपलब्ध होईल, त्या वेळी ते साध्य होईल.
काही शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर एकूण सहा प्रमुख पादपजातीय विभाग भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात केले आहेत; त्यांचेही लहानमोठे उपविभाग केले असून प्रत्येकात विशिष्ट प्रकाराच्या परिस्थितीत वाढणाऱ्या विशिष्ट गुणसंपन्न पादपजातींचा अंतर्भाव केलेला आढळतो. पादपजातीय संघटनेवरूनच वनश्रीचा प्रकार ओळखता येतो.
हे पादपजातीय विभाग असे :
  1. उत्तरीय (होलार्क्टिक; बोरियल);
  2. पुराउष्णकटिबंधीय (पॅलिओट्रॉपिकल);
  3. नवोष्ण कटिबंधीय (नीओट्रॉपिकल);
  4. ऑस्ट्रेलियन;
  5. दक्षिण आफ्रिकी;
  6. दक्षिण ध्रुवीय (अंटार्क्टिक).
ह्या प्रत्येक विभागातील पादपजात व त्यातील अंतर्भूत जाती व त्यांचे सापेक्ष प्रमाण त्या त्या विभागातील भौगोलिक परिस्थितिसापेक्ष भिन्न प्रकारचे असतात.
वनश्रीविषयक वनस्पति-भूगोल : कोणत्याही प्रदेशातील वनश्रीचे मूलभूत घटक म्हणजे तीत आढळणारे वनस्पतींचे लहान मोठे समुदाय. ह्या संबंधीच्या उपशाखेला काही शास्त्रज्ञ वनस्पतींचे (पादप–) परिस्थितिविज्ञान म्हणतात, तर काही जण वनस्पतींचे (पादप–) समाजशास्त्र [इं. प्लँट इकॉलॉजी; प्लँट (फायटो) सोशिऑलॉजी; व्हेजिटेशन सायन्स] म्हणतात. वनस्पति-समुदाय ह्या त्यातील घटकाच्या अनेक व्याख्या प्रचलित असून सर्वसंमत व्याख्या नाही.
१९२० पूर्वी एच्. ए. ग्लिमसन यांनी संमत केलेल्या संकल्पनेनुसार समुदाय ही नैसर्गिक घटना असून त्यातील जातींच्या व्यक्तींत उच्च दर्जाचे स्वालंबन आढळते. तज्ञांच्या मते समुदाय ही अनेकदा सृष्टीतील केवळ सापेक्ष सामाजिक निरंतरता असून तिच्याभोवती सापेक्ष सातत्याभाव असतो. ह्या वैज्ञानिक उपशाखेत तथाकथित वनश्रींचे (वानस्पतिक) प्रदेश दर्शविणारा नकाशा बनविण्यावर आणि परिस्थितीच्या प्रभावाच्या संदर्भात त्याचे अर्थबोधन करण्यावर भर दिलेला असतो. नकाशे बनविण्यास उपयुक्त ती माहिती व त्यांचे तंत्र संक्षिप्त रूपात ए. डब्ल्यू. कुक्लर यांनी संकलित केले आहे.

वनस्पति-भूगोलात कोणत्याही जातीचा, घटकाचा किंवा संपूर्ण पादपजातीचा नैसर्गिक अधिवास (वाढण्याचे ठिकाण) किंवा प्रसार येथे आढळतो त्या संपूर्ण प्रदेशाला ‘क्षेत्र’ म्हणतात. क्षेत्रासंबंधीच्या विशेष माहितीला ‘क्षेत्र वर्णन’ ही संज्ञा आहे. क्षेत्रातील एखाद्या जातीच्या स्थानिक प्रसाराला त्या क्षेत्राचे ‘स्थलवर्णन’ म्हणतात.

क्षेत्रांचा साधारण आकार, त्यांचे आकारमान, त्यांच्या किनारीचे (काठाचे) सलग, खंडयुक्त (तुटक) असे प्रकार आणि शेजारी असलेल्यांशी त्यांचे संबंध येथे विचारात घेतले जातात. अनेक क्षेत्रे एका बिंदूभोवती असल्यास त्यांचा ‘एककेंद्री’ गट व ती अनेक बिंदूभोवती असल्यास ‘अनेककेंद्री’ गट अशा संज्ञांनी ओळखतात; त्यांचा भौगोलिक दृष्ट्या एकच प्रांत असतो किंवा तसे अनेक असतात. निकट संबंधाच्या परंतु परस्परवर्ज्य जातींच्या क्षेत्रांना प्रतिनिधीरूप (बदली) म्हणतात. जुन्या आणि अधिक विस्तृत क्षेत्राच्या विद्यमान लहान उर्वरित किंवा शेष मात्र भागाला ‘अवशिष्ट क्षेत्र’ म्हणतात. विविध क्षेत्रे व त्यांचे पादपजातीय संबंध यांच्या आधारावर भूपृष्ठाचे अनेक (सु. ३०) पादपजातीय प्रदेश ओळखले जातात.

पादपजाती व त्यांचा प्रसार यांचा कार्यकारणभाव समजून घेऊन, त्यांचा इतिहास व परिस्थितिविज्ञान यांच्या संदर्भात त्यांचे वर्णन करण्याची पद्धत रूढ आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती व जातींचा क्रमविकास यांमध्ये बदलणाऱ्या भूपट्टांचे सिद्धांत , महाद्वीपकल्पी या राशींची हालचाल, बदलत्या समुद्र पातळ्या आणि भूवैज्ञानिक काळातील पर्वत वर्णनविषयक व जलवायुमानविषयक विभेद (बदल) ह्या सर्वांशी संबंधित असलेल्या विचारांचा अंतर्भाव होतो; या सर्वामुळे पादपजातींचे स्थानांतर आणि त्याची शाश्वती यांवर परिणाम झालेले आढळतात.

पारिस्थितिक घटकांत ज्यांचे निरीक्षण करता येते व परिमाणात्मक मापन करता येते अशा पुढील बाबींचा समावेश करतात. वर्णन, आर्द्रता, पाण्याच्या पातळ्या, तापमान, वारा, जमीन (मृदा) प्राणी, माणसे इत्यादींच्या तत्कालिक व समकालीन भूमिका . पादपजातीय वनस्पति-भूगोलाचा पाया घालून त्याला सुस्थित करण्यास रोनाल्ड गुड, लीऑन क्रोइझॅत आणि इतर कित्येक शास्त्रज्ञांनी फार परिश्रम केले. या उपशाखेचे अंतिम उद्दिष्ट ज्ञात वस्तुस्थितीचे अर्थपूर्ण पुनःसंयोजन करणे आणि संकल्पनांची पुनर्रचना करणे हे आहे; अर्थात ज्या वेळी सागरमध्यातील तडे (भेगा) आणि पालटणारे भूपट्ट ह्यासंबंधीची भूविज्ञानातील विकासाची माहिती उपलब्ध होईल, त्या वेळी ते साध्य होईल.

काही शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर एकूण सहा प्रमुख पादपजातीय विभाग भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात केले आहेत; त्यांचेही लहानमोठे उपविभाग केले असून प्रत्येकात विशिष्ट प्रकाराच्या परिस्थितीत वाढणाऱ्या विशिष्ट गुणसंपन्न पादपजातींचा अंतर्भाव केलेला आढळतो. पादपजातीय संघटनेवरूनच वनश्रीचा प्रकार ओळखता येतो. हे पादपजातीय विभाग असे :

  1. उत्तरीय (होलार्क्टिक; बोरियल);
  2. पुराउष्णकटिबंधीय (पॅलिओट्रॉपिकल);
  3. नवोष्ण कटिबंधीय (नीओट्रॉपिकल);
  4. ऑस्ट्रेलियन;
  5. दक्षिण आफ्रिकी;
  6. दक्षिण ध्रुवीय (अंटार्क्टिक).

ह्या प्रत्येक विभागातील पादपजात व त्यातील अंतर्भूत जाती व त्यांचे सापेक्ष प्रमाण त्या त्या विभागातील भौगोलिक परिस्थितिसापेक्ष भिन्न प्रकारचे असतात.

वनश्रीविषयक वनस्पति-भूगोल

कोणत्याही प्रदेशातील वनश्रीचे मूलभूत घटक म्हणजे तीत आढळणारे वनस्पतींचे लहान मोठे समुदाय. ह्या संबंधीच्या उपशाखेला काही शास्त्रज्ञ वनस्पतींचे (पादप–) परिस्थितिविज्ञान म्हणतात, तर काही जण वनस्पतींचे (पादप–) समाजशास्त्र [इं. प्लँट इकॉलॉजी; प्लँट (फायटो) सोशिऑलॉजी; व्हेजिटेशन सायन्स] म्हणतात. वनस्पति-समुदाय ह्या त्यातील घटकाच्या अनेक व्याख्या प्रचलित असून सर्वसंमत व्याख्या नाही.

भूपृष्ठावरील पादपजातीय प्रदेश

  1. उत्तर ध्रुवीय व उप-उत्तरध्रुवीय;
  2. यूरो-सायबीरियन : (अ) यूरोप, (आ) आशिया;
  3. चिनी–जपानी;
  4. पश्चिम व मध्य आशियाई;
  5. भूमध्य-सामुद्रिक;
  6. अटलांटिक उत्तर अमेरिका : (अ) उत्तर, (आ) दक्षिण;
  7. पॅसिफिक उत्तर अमेरिका;
  8. आफ्रिकी-भारतीय मरूक्षेत्र;
  9. सूदानी पार्क-स्टेप;
  10. ईशान्य आफ्रिकी उच्च प्रदेश;
  11. पश्चिम आफ्रिकी वर्षावन;
  12. पूर्व आफ्रिकी स्टेप;
  13. दक्षिण आफ्रिकी;
  14. मादागास्कर;
  15. भारतीय;
  16. महाद्वीपकल्पीय आग्नेय आशियाई;
  17. मलेशियाई;
  18. मेलानीशिया व मायक्रोनीशिया;
  19. कॅरिबियन;
  20. व्हेनेझुएला व गियाना;
  21. ॲमेझॉन;
  22. दक्षिण ब्राझीलीय;
  23. अँडीयन;
  24. पॅंपास;
  25. केप;
  26. उत्तर व पूर्व ऑस्ट्रेलियाई;
  27. नैर्ऋत्य ऑस्ट्रेलियाई;
  28. मध्य ऑस्ट्रेलियाई;
  29. न्यूझीलंड;
  30. पॅटागोनियाई.

भूपृष्ठावरील पादपजातीय प्रदेश

(१) उत्तर ध्रुवीय व उप-उत्तरध्रुवीय; (२) यूरो-सायबीरियन : (अ) यूरोप, (आ) आशिया; (३) चिनी–जपानी; (४)पश्चिम व मध्य आशियाई; (५) भूमध्य-सामुद्रिक; (६) अटलांटिक उत्तर अमेरिका : (अ) उत्तर, (आ) दक्षिण; (७) पॅसिफिक उत्तर अमेरिका; (८) आफ्रिकी-भारतीय मरूक्षेत्र; (९) सूदानी पार्क-स्टेप; (१०) ईशान्य आफ्रिकी उच्च प्रदेश; (११) पश्चिम आफ्रिकी वर्षावन; (१२) पूर्व आफ्रिकी स्टेप; (१३) दक्षिण आफ्रिकी; (१४) मादागास्कर; (१५) भारतीय; (१६) महाद्वीपकल्पीय आग्नेय आशियाई; (१७) मलेशियाई; (१८) मेलानीशिया व मायक्रोनीशिया; (१९) कॅरिबियन; (२०) व्हेनेझुएला व गियाना; (२१) ॲमेझॉन; (२२) दक्षिण ब्राझीलीय; (२३) अँडीयन; (२४) पॅंपास; (२५) केप; (२६) उत्तर व पूर्व ऑस्ट्रेलियाई; (२७) नैर्ऋत्य ऑस्ट्रेलियाई; (२८) मध्य ऑस्ट्रेलियाई; (२९) न्यूझीलंड; (३०) पॅटागोनियाई. 
१९२० पूर्वी एच्. ए. ग्लिमसन यांनी संमत केलेल्या संकल्पनेनुसार समुदाय ही नैसर्गिक घटना असून त्यातील जातींच्या व्यक्तींत उच्च दर्जाचे स्वालंबन आढळते. तज्ञांच्या मते समुदाय ही अनेकदा सृष्टीतील केवळ सापेक्ष सामाजिक निरंतरता असून तिच्याभोवती सापेक्ष सातत्याभाव असतो. ह्या वैज्ञानिक उपशाखेत तथाकथित वनश्रींचे (वानस्पतिक) प्रदेश दर्शविणारा नकाशा बनविण्यावर आणि परिस्थितीच्या प्रभावाच्या संदर्भात त्याचे अर्थबोधन करण्यावर भर दिलेला असतो. नकाशे बनविण्यास उपयुक्त ती माहिती व त्यांचे तंत्र संक्षिप्त रूपात ए. डब्ल्यू. कुक्लर यांनी संकलित केले आहे.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate