অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्न शिजवून खायला लागल्यानंतर माणूस बुद्धिमान झाला.

अन्न शिजवून खायला लागल्यावर तो बुद्धिमान झाला

बरोबर – माणूस सोडून दुसरा कोणताच प्राणी अन्न शिजवून खात नाही.
माणूस बुद्धीमान असल्यामुळे अन्न शिजवून खायला लागला की अन्न शिजवून खायला लागल्यावर तो बुद्धिमान झाला?
म्हणजे कोंबडी आधी का अंडं आधी?



इंग्लंड येथील वानरवर्गी प्राणी संशोधक डॉ. रिचर्ड व्रँगहॅम (Dr. Richard Wrangham) यांनी संशोधन करून लिहीलेल्या आपल्या –


Catching Fire – How cooking made us human?


– या पुस्तकात या प्रश्नाचे उत्तर नि:संदिग्धपणे
‘अन्न शिजवून खायला लागल्यानंतर माणूस बुद्धिमान झाला’
असेच दिले आहे.

माणसाला आग हाताळायला यायला लागण्याआधीचा त्याच्या कवटीचा आकार आणि आग हाताळायला यायला लागल्यानंतरचा त्याच्या कवटीचा आकार यामधील फरकावरून डॉ. रिचर्ड व्रँगहॅम यांनी आपला तर्क मांडला आहे.

आग हाताळू शकणारा आदिमानव - होमो इरेक्ट्स – सुमारे २० लाख वर्षांपूर्वी घडला. अन्न शिजवून खाऊ लागला. शरीराबाहेर अन्न शिजल्यामुळे ते पचविण्यासाठी शरीरातली ऊर्जा कमी प्रमाणात वापरायला लागली. अन्नमार्ग हळुहळू लहान होत गेला. अन्न पचविण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचली. तीच ऊर्जा मेंदूच्या कामी आली मग माणूस हुशार झाला. शिवाय अन्न शोधण्यासाठी लागणारा वेळ, लागणारी मेहनत, यासाठी द्याव्या लागणार्या  ऊर्जेत झालेली बचतही बुद्धीची वाढ होण्यासाठी मिळाली.


अझेरेडो (Azeredo) आणि हरक्युलॅनो हौझेल (Herculano Houzel) या ब्राझिल मधील दोघींनी केलेल्या संशोधनावरूनही याच तर्काला पुष्टी मिळते. आपल्याला रोज 1800 किलोकॅलरी ऊर्जा आवश्यक असते. त्यापैकी 360 कॅलरी ऊर्जा मेंदूच्या कार्यासाठी लागते. एवढी ऊर्जा न शिजवलेल्या अन्नातून मिळवण्यासाठी, 70 किलो वजनाच्या व्यक्तीला अन्न मिळवण्यासाठी रोजचे 16 तास द्यावे लागले असते, असे त्यांचे संशोधन सांगते. अन्न शिजवून खाल्ल्यामुळे या 16 तासांपैकी किती तरी तास वाचलेले आहेत.

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

 

लिंक : http://mavipapunevibhag.blogspot.in/

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate