অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अभियांत्रिकीचा जागतिक इतिहास

अभियांत्रिकीचा जागतिक इतिहास

·यंत्र म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्‍या प्रकारच्या ऊर्जेत रुपांतर करणारे साधन, खास करून रुपांतरीत ऊर्जेद्वारे यांत्रिक कार्य करून देणारे साधन.

·अभियंता म्हणजे यंत्रांची रचना, निर्मिती, हाताळणी करणारी आणि यंत्रे चालविणारी व्यक्ती.

·“उद्योग” किंवा “उद्योजकता” या शब्दांचा संबंध “निर्माणा”शी आहे.

·माणसाला शिकार करण्यासाठी हत्यारांची गरज भासली तेव्हापासून म्हणजे सुमारे ६५०००  वर्षांपूर्वीपासूनच माणसामध्ये अभियांत्रिकी कौशल्ये अस्तित्त्वात आली.

·अभियांत्रिकीच्या इतिहासाची घडण - संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी, तंत्रज्ञांनी, अभियंत्यांनी आणि अर्थतज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचा एकत्रित परिणाम आहे, आणि त्याच्या रेट्यामुळे परिणामत: औद्योगिक वाढ झाली, असे म्हणणे योग्य ठरेल. जगभरातील औद्योगिक वाढीसाठी थेट किंवा आडमार्गाने कारणीभूत ठरलेल्या मोजक्या घटकांचा एक धावता आढावा थोडक्यात घेतला आहे.

·यात इसवी सनापूर्वी योगदान दिलेले – थेलीस, हेराक्लिटस, डेमोक्रेटस, सॉक्रेटिस, प्लेटो,  अॅरिस्टॉटल, पायथागोरस, आणि आर्किमिडीज असे ग्रीक प्रज्ञावंत आहेत. (अॅरिस्टॉटलने म्हटले होते की कृतीपेक्षा विचार श्रेष्ठ आहे कारण तो कृतीचे नियमन करतो)

·भारतीय प्रज्ञावंतांमध्ये असे अनेक हिरे आहेत

आर्यभट्ट: (जन्म: इ. स. पू. ४७६) – बिहारमधील नालंदा विद्यापीठातील एक ज्ञानसमृद्ध व्यक्ती. त्यांनी गणित, खगोलशास्त्र या विषयांमध्ये आपला ठसा उमटवला. शून्य, ‘पाय’चे मूल्य २२/७ हे असल्याचे सांगितले, तसेच बीजगणित आणि भूमितीमध्येही मोठे काम केले. इसपू ४९९ मध्ये आर्यभटीय हा ग्रंथ लिहीला.

भास्कराचार्य: (१११४-११८५) कर्नाटकी गणितज्ज्ञ आणि खगोलवैज्ञानिक. “सिद्धार्थ शिरोमणी” च्या–गोलाध्याय आणि ग्रहगती या दोन भागातील ग्रंथाचे कर्ता.

माधवन: १३५० – केरळी – “वेणवरोह” या ग्रंथाचे कर्ता.·

चीनमध्ये सुमारे २००० वर्षांपूर्वी ३९४८ मैल लांबीची भिंत ३० लाख मजुरांना घेऊन बांधण्यात आली. इतिहासातील मानव-निर्मीत सर्वात मोठे नागरी अभियांत्रिकी बांधकाम·

१६२७ला ब्रिटनमध्ये जन्माला आलेल्या रॉबर्ट बॉईल याने भौतिक रसायनशास्त्राचा पाया घातला. रासायनिक मूलद्रव्यांची कल्पना मांडली.

·१६४२ ते १६९१ या काळात इंग्लंडमध्ये असणारा सर्वात प्रभावी वैज्ञानिक म्हणजे सर आयझॅक न्यूटन. त्याचे गतिविषयक तीन नियम, पृथ्वीवरील आणि अवकाशातील जडत्वाबद्दलची मांडणी मूलभूत आहे. ‘नैसर्गिक तत्वज्ञानाचे गणिती सिद्धांत’ या ग्रंथाचा कर्ता.

·रेने डेकार्टे (फ्रेंच वैज्ञानिक १५९६-१६५०) आधुनिक भूमिती, त्रिकोणमिती आणि  सहनिर्देशक भूमितीचा जनक.

·मायकेल फॅरेडे (ब्रिटीश १७९१-१८६७) यांनी - विद्युत विखंडनाचे नियम, विद्युतचुंबकीय प्रेरण, विजेरी, विद्युत प्रज्योत, जनित्र आणि विद्युतरसायनशास्त्र - यांच्या अभ्यासातून विद्युत अभियांत्रिकीचा पाया घातला.

·विल्यम ‍ऍडम्स (ब्रिटीश १८३६-१९१५) – सेलेनियम धातूवर पडणार्‍या सूर्यप्रकाशामुळे त्यात वीज निर्माण होते याचा शोध त्याने लावला. अंतराळात सोडल्या जाणार्‍या यानांना सौर ऊर्जा मिळू लागली. आता ती सर्वसामान्यांनाही मिळू शकते.

·अँड्रे अँपिअर (फ्रेंच १७७५-१८३६) – विजेच्या प्रवाहाचे मापन करण्याची पद्धत शोधून काढली. त्याबद्द्ल कृतज्ञता दाखवण्यासाठी ‘विजप्रवाह मापनाच्या एकका’ला अँपिअर नाव दिले गेले आहे. अँपिअरने आपल्या सिद्धांतात चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य आणि विजप्रवाहाचा वेग यांच्यातील संबंध स्पष्ट केला आहे.

·आंद्रे अँगस्ट्रॉम (स्वीडन १८१४-१८७४) याने सूर्याचा नकाशा काढला तसेच सूर्यावर उदजन म्हणजे हैड्रोजन वायू असल्याचा शोध लावला. प्रकाशतरंगांची लांबी मोजण्याच्या एककाला गौरवार्थ अँगस्ट्रॉम हे नाव देण्यात आले आहे.

·ऍमेडो ऍवॅगॅड्रो (इटली १७७६-१८५६) – आपल्या ऍवॅगॅड्रो हायपोथिसिस मुळे प्रसिद्ध आहे.

·रॉबर्ट बुली – आजच्या संगणक प्रणालीचा पाया बुलीच्या बीजगणितावर आधारलेला आहे.

·अँटोनी सीझर बॅक्वेरेल (फ्रेंच १७८८-१८७८) – विद्युतरसायन विषयात उल्लेखनीय कार्य.

·अँटोनी हेन्री बॅक्वेरेल (फ्रेंच १८५२-१९०८) – याने - नैसर्गिक किरणोत्सार – शोधून काढला.  किरणोत्साराच्या मात्रा मोजण्याच्या एककाला गौरवार्थ बॅक्वेरेल हे नाव देण्यात आले आहे.

·ऍलेक्झँडर ग्रॅहॅम बेल (स्कॉटीश १८४७-१९२२) – टेलिफोनचा जनक.

·मोझेस गेल – इ. स. १८७१ मध्ये अमेरिकेत लायटरच्या शोधाचे एकस्व मिळवले.

·चार्लस (फ्रेंच १७४६-१८२३) – दाब स्थिर असलेल्या वायूचे आकारमान त्याच्या निरपेक्ष तापमानाप्रमाणे बदलते असा नियम त्याने शोधून काढला.

·जेम्स मॅक्सवेल (स्कॉटीश १८३१-१८७९) – गणिताच्या आधारावर आधारलेल्या त्याच्या विद्युतचुंबकीय सिद्धांतामुळे त्याचे नाव सुप्रसिद्ध आहे.

·डॉ. हाफकीन यांनी १८९७ मध्ये प्लेग या रोगावर प्रभाव अशी लस शोधून काढली.

·रॉबर्ट गोडार्ड याने १९१८ साली क्षेपणास्त्र तंत्रप्रणालीची निर्मिती केली.

·सर सी व्ही रमण (भारत) यांना ‘प्रकाशाचे विकीरण’ या शोधाबद्दल नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले.

·एडविन आर्मस्ट्राँग (अमेरिका १८९०-१९५४) – आधुनिक रेडिओ, रडार आणि टेलेव्हिजन यांच्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या पायाभूत इलेक्ट्रॉनिक मंडलाच्या रचनेचा शोध लावला.

·बेरी क्लिफोर्ड (अमेरिका १९१८-१९६३) – संगणक वैज्ञानिक. पहिल्या अंकीय संगणकाचा सहनिर्माता.

·सत्येंद्रनाथ बोस (भारत १८९४-१९७४) – बोस-आईनस्टाईन संख्याशास्त्र आणि मूळकणांचे वर्तन तसेच ‘बोसॉन’ कणाची संकल्पना यांसाठी प्रसिद्ध.

·थॉमस अल्वा एडिसन (अमेरिका १८४७-१९३१) – ग्रामाफोन / फोनोग्राम, विजेचा दिवा यांसह एक हजाराहून अधिक उपकरणांचे एकस्व मिळवणारा संशोधक. न्यूयॉर्क या शहरात जगातील पहिले व्यापारी तत्वावरील वीज निर्मिती केद्र उभारून ‘विद्युतयुगा’ची सुरूवात केली. तापलेल्या ऋण अग्रातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात हे एडिसनला माहिती होते. या परिणामाला ‘एडीसन परिणाम’ म्हणूनच ओळखले जाते. पण एडिसनला त्याचे महत्त्व लक्षात आले नव्हते. पुढील काळातील वैज्ञानिकांनी याचा आधारावर इलेक्ट्रॉन-नलिका विकसित केल्या.

·अल्बर्ट आईनस्टाईन (मूळ जर्मन १८७९-१९५५) – विज्ञानाच्या आधुनिक संकल्पनांवर याच्या कर्तृत्वाचा प्रभाव प्रचंड आहे.

·लुई डी ब्रॉग्ली (फ्रेंच १८९२-१९८७) – याने इलेक्ट्रॉनच्या तरंग-स्वरुपाचा वेध घेतला. प्रकाशाप्रमाणे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन यांनाही त्यांच्या गतिमुळे तरंग-स्वरूप प्राप्त होते असे त्याने दाखवून दिले.

·१९६५ साली अमेरिकेने अर्ली बर्ड नावाचा उपग्रह अंतराळात पाठवला त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांती झाली.

·१९३५ साली अरनॉल्ड बेकमन याने पी-एच मापकाची निर्मिती केली.

·कार्ल लिनिअस याला आधुनिक वनस्पतीशास्त्राचा जनक म्हणतात.

·कुंतला देवी (भारत १९३९-२०१३) असामान्य गणिती बुद्धीमत्ता असलेली विदुषी.

·टी. आर. शेषाद्री (भारत १९९०-) कपडे रंगवण्यासाठी लागणार्‍या एंडोसायनीन आणि फ्लुओरोनामिड या दोन रंगद्रव्यांचा शोध लावला.

·मार्टिन पोर्टर (ब्रिटीश) – वायूवर्णालेख याच्या शोधासाठी अणि विकासासाठी १९५२ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित.

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate