অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृष्ण पदार्थ

कृष्ण पदार्थ

सर्वच्या सर्व आपाती प्रारण (पडणारी तरंगरूपी ऊर्जा) शोषून घेणारा आदर्श व काल्पनिक पदार्थ. याचा परावर्तनांक (परावर्तित प्रारण व आपाती प्रारण यांचे गुणोत्तर) शून्य असून शोषणांक (शोषण केलेले प्रारण व आपाती प्रारण यांचे गुणोत्तर) एक असतो. असा पदार्थ तापविला असता तो श्टेफान-बोल्टस् यांच्या नियमानुसार संपूर्ण प्रारण (कृष्ण पदार्थ प्रारण) उत्सर्जित करतो. या प्रारणातील ऊर्जेचे वर्णपटीय वितरण वीन यांच्या नियमावरून किंवा अधिक अचूकरीत्या प्लांक यांच्या सूत्रावरून मिळते.

अपारदर्शक पदार्थाने वेष्टिलेल्या व अतिशय लहान द्वार असलेल्या विवराचे गुणधर्म जवळजवळ कृष्ण पदार्थाप्रमाणे असतात. प्रयोगशाळेत आतून काळा केलेला व अतिशय लहान छिद्र असलेला धातूचा पोकळ पदार्थ कृष्ण पदार्थ म्हणून वापरतात.

लेखक : सु.स.शिरोडकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate