অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारताचा औद्योगिक इतिहास

भारताचा औद्योगिक इतिहास

भारताच्या उद्योग – व्यवसायावर परिणाम करणार्‍या काही कंपन्या –कॉक्स अँड किंग्ज (१७५८), फोर्बस् फोर्बस् अँड कॅम्बेल (१७७९), इ आय डी पॅरी (१७८८), कॅरूव अँड कंपनी (१८०२), मार्टिन बर्न कंपनी (१८१०), कॅडबरी (१८२४), भारताचे पहिले वर्तमानपत्र – दर्पण (१८३२), इ आय डी पॅरी पहिला साखर कारखाना (१८४६), बेनेट कोलमन अँड कंपनी (१८३८), ‘मुंबई-ठाणे’ भारतातील पहिली रेलगाडी (१८५३) मात्र वीज वापरून चालणारी पहिली ट्रेन मुंबई व्हि. टी. ते कुर्ला या मार्गावर १९२५ साली दौडली.


दादर येथे कावसजी यांनी पहिली कापड गिरणी स्थापन केली (७ जुलै १८५४), मोहननगर – उत्तर प्रदेश येथे पहिला मद्यनिर्मिती कारखाना झाला – डायर मीकीन डिस्टिलरी (१८५६), बिहारमध्ये टाटा यांनी पहिली ओतशाळा (फाऊंड्री) स्थापन केली. कलाक्षेत्रातून उद्योगांना मदत झाली ती मुंबईमध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् ची स्थापना झाल्यावर (१८५७), गोकाक येथे शापुर्जी पालोनजी यांनी कापडउद्योग सुरू केला तर १८७९ साली नौरोसजी वाडीया यांनी ‘बॉम्बे डाइंग’ कंपनी उभारली. भारतातील पहिला औषधनिर्मिती उद्योग धूतपापेश्वर यांनी पनवेल येथे उघडला. १८८६ला शॉ वॉलॉस डिस्टिलरी, १८८८ला किर्लोस्कर उद्योग, १८९५ला झेकोस्लोवाकियाची स्कोडा आली.


शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे बदल झाले. १८८० साली पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना करण्यात आली तर १८८५ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली.
७ जुलै १८९६ला ल्युमिअर ब्रदर्स यांनी चित्रपटाचा पहिला खेळ मुंबईत सादर केला. पुढे यातून एका नव्या उद्योग विश्वाची उभारणी झाली. पुढे १४ मार्च १९१३ला दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेला “राजा हरिश्चंद्र” हा पहिला पूर्ण लांबीचा कथाप्रधान मूक-चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. १ जून १९२९ला प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. पहिला हिन्दी बोलपट “आलम आरा” १९३१ साली तर पहिला मराठी बोलपट “अयोध्येचा राजा” १९३२ साली प्रदर्शित झाला.


१९०३ साली हॉटेल उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती टाटांकडून – मुंबईत ताजमहल हॉटेल उभारून. याच वर्षी प्रतापपूर येथे साखर उद्योगाचीही उभारणी झाली. १९०७ला नागपूरला एम्प्रेस मिल आली त्याच वर्षी इंडीयन मर्चंटस चेंबर स्थापण्यात आले. १९०८ साली बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली. आज ‘कॅडबरी’ हे चॉकलेटला पर्यायी नाव झाले आहे तसे पूर्वी ‘रावळगाव’ हे चॉकलेट कँडीचे पर्यायी नाव झाले होते त्या कारखान्याची स्थापना १९०९ साली झाली. १९१० साली वालचंद हिरीचंद ग्रूप स्थापन झाला. त्याच वर्षी जपानच्या हिताची कंपनीची स्थापना झाली.


औद्योगिक विकासाबरोबर तंत्रवैज्ञानिक आणि वैज्ञानिक - शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाची गरज लक्षात घेऊन टाटांनी बंगळुरू येथे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना १९११ साली केली. १९१६ला बनारस हिंदू विश्वविद्यालय सुरू झाले.


सहकारी साखर कारखान्याचे पेव फुटण्याची पूर्वतयारी १९१९ साली ब्रॅडी अँड कंपनीच्या साखर कारखान्याने झाली असे म्हणायला हरकत नाही. १९२५ मध्ये जुगल किशोर सिंघानिया यांनी जे. के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज (रेमण्डस्) उद्योग कानपूर येथे सुरू केला. १९३३ला आपटे कुटुंबियांनी इंग्लंडच्या डंकन स्टेवर्ट प्लांट यांच्या सहकार्याने फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखाना सुरू केला तर त्याच दरम्यान कोल्हापूर शुगर मिल्सची सुरूवात शिरगावकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी इंग्लंडच्या ए. डब्ल्यू स्मिथ प्लांट यांच्या सहकार्याने केली. १९३९ला झेकोस्लोवाकियाच्या स्कोडा पॉवर प्लांटच्या सहकार्याने गोदावरी शुगर मिल सुरू करण्यात आली. १९३९ मळीवर आधारीत मद्यनिर्मितीचा उद्योग मंड्या डिस्टिलरी या नावाने सुरू करण्यात आला. पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये सुरू झाला. १९६१ साली साकरवाडी येथे सोमय्या यांनी स्वीडनच्या एबी केमाटूर यांच्या सहकार्याने मद्यार्कावर आधारीत शिरका (ऍसेटिक आम्ल)  निर्मितीचा कारखाना सुरू केला. १९७४ साली बरैली येथे किलाचंद यांनी मद्यार्कावर आधारीत कृत्रिम रबर निर्मितीचा उद्योग सुरू केली.


या प्रकारे उद्योग वाढले तसे त्याचे परिणाम समाजातील विविध क्षेत्रांवर झाले. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण कायदा सुव्यवस्था राजकारण समाजकारण यांवरही झाले.

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

 

अंतिम सुधारित : 5/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate