অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विमानातील संडाससफाईसाठी हवेच्या झोताचा वापर होतो.

विमानातील संडाससफाईसाठी हवेच्या झोताचा वापर होतो.

विमानात पूर्वी पाटीचे संडास असत. विमानमार्गाच्या खाली राहणार्याय लोकांना विमानातून पडणार्यार विष्ठेमुळे काही रोगांचा सामना करावा लागतो, असे आढळून आले. त्यानंतर विमानातील संडासांची रचना बदलली. आंतरराष्टीय सामंजस्यानुसार विमानातून संडासमधील तसेच अन्य प्रकारचा कोणताही कचरा हवेत सोडण्यास मनाई आहे.

विमानातील संडासातून मलमूत्रविसर्जन उघड्यावर केले जात नाही हे नक्की. शिवाय संडासचा खालचा भाग उघडा असेल तर त्यातून घोंघावते वारे, थंडी विमानात शिरून विमानाचा तोल जाण्याची शक्यता लक्षात घेता विमानातील संडास बंद असणेच श्रेयस्कर.

बंद संडासाची सफाई पाण्याने करायची तर तेवढे स्वच्छ पाणी आणि संडास धुतलेले गटारपाणी साठवण्यासाठी जागा लागणार. एवढ्या वजनाचे पाणी वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर करावा लागणार. त्यापेक्षा हवेच्या झोताचा वापर करणे किफायतशीर.

विष्ठेवर दाबाने हवा सोडण्यापेक्षा निर्वात पोकळी करून विष्ठा ओढून घेणे सोपे, सुरक्षित आणि आरोग्यकारक. विमानातील संडास वापरण्यापूर्वी त्या भांड्यात १-२ टिश्यू पेपर घातले तर विष्ठा कागदावर राहाते आणि मग ती संडासच्या भांड्याच्या आत खेचली जाणे सोपे होते. काही विमानात संडासच्या भांड्याला विष्ठा चिकटू नये तसेच भांडे निर्जंतूक राहावे म्हणून औषधी द्रावणही अल्प प्रमाणात वापरतात.
विष्टा हटविण्यासाठी हवाशोषक वापरल्याने नळकाम करताना नळ उतारालाच लावावे लागतात असे नाही तर त्यांची रचना सोईप्रमाणे करता येते.

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate