অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ख्रिसमस (नाताळ)

ख्रिसमस (नाताळ)

नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. परंतु  काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबरऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.  ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.  ख्रिश्नन लोकं या सणाला फार महत्व देतात कारण जीझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे. नाताळ हा आनंद व हर्षोल्साचा सणं आहे.  ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे क्राइस्ट्स मास अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना.

आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्य नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात. २१ डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे.

जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस २५ डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला. त्यांनी येशूख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्या वेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.

या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभ कामना कार्डसची घेवाण देवाण होते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात. संपूर्ण जगभरातल्या गिरीजाघरां मध्ये येशुची जन्मगाथा झाक्यांच्या रूपात प्रदर्शित केल्या जाते. चोवीस डिसेंबरच्या रात्री पासूनच आरती व पुजा पाठास सुरूवात होते. दूसरया दिवशी सकाळीच जन्म दिनाचा सोहळा असतो.

ख्रिश्चन बांधव एक दूसरयांची गळाभेट घेवून शुभेच्छांचे आदान प्रदान करतात. गिरिजाघरात मंगल कामनेचे प्रतिक म्हणून ख्रिसमच-ट्रीची सजावट केली जाते. आज ‍नाताळला धार्मिकते सोबतच सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. इंग्रजी भाषीक देशामधील लोकं या दिवशी एक विशेष प्रकारची पुडिंग व केक इत्यादी बनवतात. भारताच्या नागरी भागात हा सण पश्चिमी देशां सारखच साजरा करतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना मिठाई व भेट वस्तू देतो असे मानले जाते.

परंतू देशातील आदिवासी आणि खेड्या पाड्‍यांच्या लोकांच खानपान या दिवशी वेगळ असते. तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी हे यांच्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग असतते. आर्थिकरित्या संपन्न नसणारया घरात हे व्यंजन भेट म्हणून पाठविण्यात येते. दक्षिण भारतात काही भागात पायस वाटण्यात येतो.

परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशु‍द्धीचे कारण असते, म्हणून रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबर पासून पंचवीस डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात.

जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणूनही  मानला जात होता.

माहिती संकलन: प्राची तुंगार

स्त्रोत: बालपण

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate