অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाजमिति

समाजमिति

समाजमिति : समाजमितीच्या चाचण्यांचा वापर करून तथ्यसंकलनाचे विश्र्लेषण करण्यास ‘ समाजमिती ’ अशी संज्ञा दिली जाते. समाजमिती या संज्ञेला अनेक अर्थ असून तिचे ऐतिहासिक दृष्टय नजिकचे साहचर्य जे. एल्. मोरेनोच्या हू शाल सर्व्हाइव्ह (१९३४) ह्या व्यक्ति-व्यक्तींमधील परस्परसंबंधांचा ऊहापोह करणाऱ्या ग्रंथात आढळते. मोरेनोने विशिष्ट प्रकारच्या प्रश्र्वनालीच्या स्वरूपात समाजमिती विकसित केली असली, तरी त्याचा उपयोग केवळ ह्या तंत्रापुरताच मर्यादित राहू नये, अशी त्याची भूमिका होती. सामाजिक घटनांचे मोजमाप करण्यासाठी हे तंत्र वापरावे, अशी भूमिका मांडली गेली असली, तरीही मोरेनोचे तंत्र प्रत्यक्षात अदयापि समाजमितीच्या संदर्भात सुपरिचित आहे.

समाजमिती तंत्रानुसार तथ्यसंकलनामध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्र्नांसाठी अनेक पर्याय दिले जातात. अर्थात उत्तरदात्यास विषयाची व्याप्ती आणि पार्श्वभूमी समजणे महत्त्वाचे आहे. ( उदा., वर्गातील कोणत्या व्यक्तीशी बोलायला आवडेल, असे विचारल्यास उत्तरदाता शिक्षक किंवा संशोधकाचीही गैरसमजुतीमुळे निवड करेल, तेव्हा विदयार्थ्यासाठीच अभ्यास मर्यादित असल्यास ते स्पष्ट होणे आवश्यक ठरते.) ह्या पद्धतीत गटा-गटांतील, व्यक्ति-व्यक्तींमध्ये किंवा उपगटांमध्ये परस्परांविषयी असणाऱ्या आकर्षण किंवा विकर्षणाचा अभ्यास करता येतो.

गटातील सभासदांमध्ये असलेल्या पारस्परिक आकर्षण-विकर्षणाचे मापन करून सामाजिक आंतरकियांच्या समगाचा वा समुच्च्याचा शोध लावण्याची आणि त्याचबरोबर अशा संबंध-समगास हाताळण्याची पद्धत म्हणजे समाजमिती होय. एखादया विशिष्ट गटातील सदस्यांमधील किंवा व्यक्तींमधील पारस्परिक किया किंवा त्यांचा अभाव, या विषयाची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी समाजमितीचा उपयोग होतो. प्रत्यक्षात व्यावहारिक उपयोगासाठी देखील ह्या तंत्राचा उपयोग होऊ शकतो. उदा., शिक्षकाने विदयार्थ्यांच्या पसंतीचे मापन करून गट तयार केल्यास त्यांच्याकडून अधिक चांगले कार्य करून घेणे शक्य होईल. समाजमितीच्या अध्ययनामध्ये प्रश्र्नावलीचा किंवा मुलाखत अनुसूचीचा उपयोग केला जातो. प्रश्र्नावली वापरण्यासाठी आणि उत्तरे लिखित स्वरूपात मिळविण्यासाठी उत्तरदात्यास ती समजणे, वाचन-लेखन करता येणे आवश्यक असते. म्हणूनच हे शक्य नसल्यास मुलाखत तंत्राचा उपयोग करणे, काही वेळा आवश्यक ठरते. सामजमितीय प्रश्नांच्या आधारे तथ्यसंकलन करणे, ही सोपी पद्धत असून परिस्थितीजन्य बदलही त्यात करणे शक्य होते. एक प्रश्र्न विचारून त्याच्या उत्तरादाखल अनेक पर्याय एकाच मोजमापाच्या आधारावर देणे, अशा विविध पर्यायांचा वापर करणे शक्य होते. अनेक पर्याय दिल्यास एखादया मोठय गटातील पाच-सात व्यक्तींचा ‘ कंपू समूह ’ (क्लिप गुप) शोधणेही शक्य होते. अशा प्रकारे संबंधांचे जाळे शोधणेही शक्य होते. मोरेनोनेही मुक्त निवडीचे समर्थन केले. अर्थात किती संख्येपर्यंत व्यक्तींना पसंती किंवा नापसंती विचारली जाईल, हे गटाच्या आकारावरही अवलंबून असते. समाजमितीय वर्णनांमध्ये व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वर्णन आंतर-कियांच्या विश्र्लेषणामध्ये अधिकच गुंतागुंतीचे बनते. समाजमितीच्या आधारे केलेले विश्र्लेषण सोशिओगॅमच्या आधारे सारांशरूपात, दृश्य, आलेखात्मक स्वरूपात मांडता येते. उदा., शाळेतील वर्गामधील मुली आणि मुले यांच्या मैत्रीची पसंती लिंगभेदानुसार आलेखात्मक स्वरूपात वेगवेगळी दाखविल्यास प्रभावीपणे मांडली जाईल. कधी रेखाकृतीव्दारा तर विशिष्ट प्रकारे मांडलेल्या वर्तुळांव्दारा अशा अनेक प्रकारे व्यक्तीचे परस्परसंबंध आणि पसंती दाखविता येते. वेगवेगळ्या, लहान-मोठय प्रतीकांव्दारा उत्तरदात्यांची पसंती दर्शवता येते. अशा प्रकारे समाजमितीच्या उपयोगाचे स्वरूप विश्र्लेषणात्मक असण्याऐवजी वर्णनात्मक स्वरूपाचे राहिले. व्यक्तींना दाखविलेल्या पसंती वा नापसंतीला सारांश स्वरूपात मांडण्याचे किंवा एखादया समूहामधील पारस्परिक संबंधांचे सार-चित्र सादर करण्याचे एक साधन असे सोशिओगॅमचे वर्णन पु, ल. भांडारकर यांनी केलेले आहे. सारणी वा कोष्टकांव्दारेही पसंती-नापसंतीचे चित्र दर्शविता येते. अशा कोष्टकास समाजमितीय ‘ मॅटि्नक्स ’ म्हणतात. मॅटि्नक्सच्या आधारे तथ्यांचे विश्र्लेषण करताना ‘ गाफ थिअरी ’ आणि ‘ फॅक्टर अनॅलिसिस ’ किंवा ‘ क्लस्टर अनॅलिसिस ’ या तंत्रांचा उपयोग केला जातो.

ह्या तंत्राचा उपयोग नेतृत्वासंबंधींचे अध्ययन, गटातील व्यक्तींची पर-स्परांबद्दलची पसंती इत्यादींसाठी केला गेला. लहान मुलांमध्ये असणारे वांशिक पूर्वगह, त्यांचे परस्परसंबंध यांच्या अध्ययनातही ह्या तंत्राचा उपयोग केलेला आहे. रूथलिस बर्गर व डिक्सन यांनी समाजमितीय गुप रेखाचित्रांच्या आधारे, हॅथॉर्न इलेक्टि्नकल वर्क्समधील बँक वायरिंग (औदयोगिक समाजशास्त्रातील एक महत्त्वाचा प्रयोग) या गटातील परस्परसंबंधांचे वर्णन केले. व्यक्ती आपल्याभोवती असणाऱ्याबद्दल व सभोवतालच्या एकंदर वातावरणाबद्दल कसा विचार करते, हे जाणून घेण्यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो. व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टीने समाजमितीय पद्धती हे तंत्र उपयुक्त आहे.

ह्या तंत्राच्या मर्यादाही आहेत. पूर्णपणे ह्या तंत्रावर अवलंबून राहणे संयुक्तिक ठरत नाही; कारण केवळ समाजमितीय माहितीच्या आधारे ठराविक गट किंवा वातावरणाच्या सांस्कृतिक, सामाजिक, भौतिक वा मानसशास्त्रीय अशा वेगवेगळ्या पैलूंच्या बाबत माहिती अंधारातच राहण्याची शक्यता असते. (उदा., आपल्याच वंशाच्या अथवा जातीच्या लोकांची मैत्री करण्यास असलेली पसंती अथवा शालेय मुला-मुलींची मैत्रीसाठी समलिंगी व्यक्तीची पसंती, हा व्यक्तिमत्त्वाच्या पसंतीचाच केवळ भाग नसून सांस्कृतिक जडण-घडणीचाही भाग असू शकेल.) समाजमितीय तंत्राच्या सहाय्याने तथ्यसंकलन करण्याच्या पद्धतीत बरीच प्रगती झाली असली, तरी त्यात दोषही आहेत. सामाजिक शास्त्रांमध्ये अजूनही समाजमितीय पद्धतीचा तथ्यसंकलनासाठी वापर केला जातो. व्यक्तिमत्त्वाचा, नेतृत्वाचा अभ्यास, लहान गटांचा अभ्यास, परस्परसंबंधी जाळे व संप्रेषण गटांची संरचना, समुदायामधील दर्जा इ. अनेक संशोधनांमध्ये समाजमितीचा उपयोग होतो.

 

संदर्भ : 1. Moreno, Jacob, Who shall survive ? Foundation of Socio-metry, Group Psychotherapy and Sociodrama, New York, 1953.

२. भांडारकर, पु. ल. सामाजिक संशोधन पद्धती, नागपूर, १९८७.

लेखक - स्वाती शिरवाडकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate