Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/09/16 22:49:52.961067 GMT+0530
शेअर करा

T3 2019/09/16 22:49:52.967340 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/09/16 22:49:52.998939 GMT+0530

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.

आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी महाभारत लिहिले. ते गुरुंचेही गुरू, भारतवर्षाचे गुरू मानले जातात; म्हणून या दिवशी व्यासमहर्षींची तसेच दीक्षा गुरू व मातापिता यांची पूजा करून, त्यांना वंदन करण्याची पूर्वापार प्रथा आहे. ज्या गुरूजवळ विद्या संपादन केली जाते त्या गुरूस गुरुदक्षिणा देऊन, त्याला संतुष्ट करून त्याचा आशीर्वाद घेतल्याने विद्या सफल होते, अशी श्रद्धा आहे.

द्य शंकराचार्य हे व्यासांचेच अवतार असल्याची धारणा संन्याशांत असल्यामुळे, ते या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची षोडशोपचारे पूजा करतात. तमिळनाडूत जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस व्यासपूजा होते. दक्षिण भारतातील शंकराचार्यांच्या शृंगेरी आणि कुंभकोणम् ह्या पीठांत व्यासपूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

याच दिवशी गौतम बुद्धाने धर्मचक्रपरिवर्तन केले. जैन लोकही या दिवशी उपवास करून जिनपूजा करतात; म्हणून हिंदू, बौद्ध व जैन धर्मांत ह्या दिवसास विशेष महत्त्व आहे.

करंदीकर, ना. स.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

स्त्रोत : मराठीविश्वकोश

2.90697674419
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/09/16 22:49:53.273349 GMT+0530

T24 2019/09/16 22:49:53.284819 GMT+0530
Back to top

T12019/09/16 22:49:52.887718 GMT+0530

T612019/09/16 22:49:52.909139 GMT+0530

T622019/09/16 22:49:52.949542 GMT+0530

T632019/09/16 22:49:52.950404 GMT+0530