Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:00:12.820749 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 07:00:12.826739 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:00:12.858454 GMT+0530

राष्ट्रध्वज

भारताचा राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. ह्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे.

भारताचा राष्‍ट्रध्‍वज 

राष्ट्रध्वजाचे वर्णन

आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. ह्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे. ध्वजाच्या रुंदी-लांबीचे प्रमाण दोनास-तीन असे आहे. पांढर्या पट्टयाच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. ह्या चक्राची मूळ रचना सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील पौराणिक स्तंभावर पाहावयास मिळते. ह्या चक्राचा व्यास जवळजवळ पांढर्या पटट्याच्या रुंदीइतकाच आहे व ह्या चक्रास २४ आरे आहेत. राष्ट्रध्वजाच्या ह्या रचनेला भारताच्या सांविधानिक सभेने २२ जुलै १९४७ रोजी मान्यता दिली. भारत सरकारच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणार्या अवैधानिक सूचनांखेरीज राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन आणि वापर करण्यासंबंधी काही कायदेदेखील केलेले आहेत - प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) १९५० (१९५० मधील क्र. १२), राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ (१९७१ मधील क्र. ६९). असे सर्व नियम, कायदे इत्यादींचे एकत्रीकरण करून सर्व संबंधितांच्या सुविधेसाठी २००२ सालचा राष्ट्रध्वज संकेत तयार केला आहे.

राष्ट्रध्वजाचे नियम

२६ जानेवारी २००२ पासून ह्या संकेताची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पूर्वीच्या सर्व नियमांऐवजी आता ह्याचा वापर केला जाईल. ह्यामधील तरतुदीनुसार आता सामान्य नागरिक, खाजगी संस्था तसेच शैक्षणिक संस्था राष्टध्वजाचे मुक्त प्रदर्शन करू शकतात. परंतु असे प्रदर्शन व वापर प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) १९५० आणि राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ कायद्याच्या अधीन राहून करता येईल.

3.16129032258
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:00:13.075629 GMT+0530

T24 2019/10/14 07:00:13.081764 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:00:12.750970 GMT+0530

T612019/10/14 07:00:12.770348 GMT+0530

T622019/10/14 07:00:12.809965 GMT+0530

T632019/10/14 07:00:12.811008 GMT+0530