Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/19 22:12:25.140861 GMT+0530
शेअर करा

T3 2019/08/19 22:12:25.146214 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/19 22:12:25.199297 GMT+0530

सूक्ष्मजीवशास्त्र

या विभागात सूक्ष्मजीवशास्त्र या बद्दल माहिती दिली आहे.

ऊती संवर्धन (Tissue culture)
एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्‍या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात.
ऊती ( Tissue )
बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह म्हणजे ऊती. एकपेशीय सजीवांच्या ज्या विविध क्षमता असतात त्या बहुपेशीय सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊतींद्वारा घडून येतात. ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची पुढची पायरी आहे.
ऊतिविज्ञान ( Histology )
ऊती म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह. ऊतिविज्ञानात मुख्यत: ऊतींचा, तसेच पेशींचा आणि इंद्रियांचा समावेश होतो. १८५१ सालामध्ये ऊतिविज्ञानावरील पहिला ग्रंथ जर्मन भाषेतून प्रसिद्ध झाला.
अमीबाजन्य विकार ( Amoebiasis )
अमीबाजन्य विकार हा आमांश या रोगाचा एक प्रकार आहे. अमीबा या एकपेशीय आदिजीवाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका जातीमुळे हा रोग होतो. हा रोग जगातील सर्व देशांत आढळतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका व आग्नेय आशिया या प्रदेशांत या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झालेला आढळतो.
अमीबा ( Amoeba )
आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील र्‍हायझोपोडा या वर्गातील अगदी साधी शरीररचना असणारा अमीबा हा प्राणी आहे. अमीबा प्रजातीच्या अनेक जाती असून त्या खार्‍या व गोड्या पाण्यात आणि दमट व ओलसर जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती सार्वत्रिक आहे. अमीबाच्या शरीराचा आकार सतत बदलत असतो.
अंकुशकृमी
तोंडामध्ये अंकुश अथवा आकडे असलेल्या परजीवी, अपायकारक कृमीला ‘अंकुशकृमी’ म्हणतात. अंकुशकृमी हा सूत्रकृमी (नेमॅटोडा) संघातील असून याचे शास्त्रीय नाव अँकिलोस्टोमा ड्युओडिनेल आहे.
कृत्तक (Clone)
एखाद्या सजीवाच्या जनुकीय रचनेसारखीच जनुकीय रचना असणारा दुसरा सजीव म्हणजे कृत्तक. असा कृत्तक निर्माण करण्याच्या प्रक्रियेला कृत्तकी किंवा कृत्तककरण म्हणता येईल. उत्परिवर्तन किंवा पर्यावरणामुळे आलेला विकासातील फरक झाला नाही तर कृत्तकाचे गुणधर्म मूळ सजीवाच्या गुणधर्मासारखेच असतात.
किण्वन ( Fermentation )
किण्वन ही एक रासायनिक प्रकिया असून या प्रक्रियेत सजीव पेशी हवाविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करतात. यातून सजीवांना लागणारी ऊर्जा भागश: किंवा पूर्णत: मिळते. या क्रियेला विनॉक्सिश्वसन किंवा विनॉक्सी ग्लायकॉलिसीस असेही म्हणतात. काही सूक्ष्मजीवांना (उदा., किण्व) आणि काही जीवाणू यांना बाह्य ऑक्सिजनाची गरज नसते; त्यांना विनॉक्सिजीव म्हणतात.
कवक ( Fungus )
आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके आणि हरितद्रव्य नसतात. त्यांमध्ये प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही, ती परपोषी असतात.
एंटरोबॅक्टिरिएसी
सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टिरिएलीझ गणातील तेरा कुलांपैकी एक कुल.
नेवीगेशन

T5 2019/08/19 22:12:25.410991 GMT+0530

T24 2019/08/19 22:12:25.418139 GMT+0530
Back to top

T12019/08/19 22:12:25.051009 GMT+0530

T612019/08/19 22:12:25.070310 GMT+0530

T622019/08/19 22:12:25.127196 GMT+0530

T632019/08/19 22:12:25.127348 GMT+0530