অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय शिष्यवृत्त्या आणि बक्षिसे

राष्ट्रीय शिष्यवृत्त्या आणि बक्षिसे

राष्ट्रीय शिष्यवृत्त्या आणि बक्षिसे

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) (NCERT) शैक्षणिक विकासाला गुणात्मक दृष्टिने पाठिंबा देतात, आणि असमानता दूर करण्यासाठी व सर्व विद्यार्थ्यांना एकस्वरुपाचे शिक्षण मिळण्याबाबत विशेष प्रयत्नशील असतात. एनसीईआरटी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता मान्य करतात व त्यांच्यातील प्रतिभेला राष्ट्रीय प्रतिभा शोध योजनेच्‍या अंतर्गत प्रोत्साहन देतात. कलात्मक और आणि अभिनव उत्कृष्टतेसाठी चाचा नेहरू शिष्यवृत्ति द्वारे कलात्मक गुणवत्तेला देखील प्रोत्साहन देण्‍यात येते.

राष्ट्रीय शिष्यवृत्त्या

राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा इयत्ता आठवीसाठी

राष्ट्रीय प्रतिभा शोध योजना एनसीईआरटीची प्रमुख गतिविधि आहे जी 1963 साली सुरु करण्यात आली. या योजनेचा उद्देश्य प्रतिभावान विद्यार्थी ओळखणे व त्यांच्या प्रतिभेचे संवर्धन करणे असा होता.म्हणून या योजनेच्‍या अंतर्गत, विज्ञान,सामाजिक विज्ञान,इंजीनियरिंग,चिकित्सा,प्रबंधन आणि कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश करण्यात येतो.यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्‍मान व मासिक शिष्यवृत्ती मार्फत आर्थिक मदत दिली जाते.

शिष्यवृत्त्या घेतलेल्या परीक्षांवरुन,1000 शिष्यवृत्त्या ह्या इयत्ता 8वीत शिकणा-या मुलांच्या समूहाला बहाल करण्‍यात येतील.

पात्रता : मान्यता प्राप्त शाळांमध्ये शिकणा-या 8वीतल्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षांना बसता येते. राज्या द्वारे/केन्द्र शासित प्रदेशाद्वारे परीक्षांचे आयोजन शाळा ज्या ठिकाणी आहेत त्या प्रमाणे केले जाते.त्यात कोणता ही अधिवास प्रतिबंधनसेल.

परिक्षा : 8वी साठी लेखी परीक्षांचा नमुना खालील प्रमाणे असेल :

चरण 1 राज्या द्वारे/केन्द्र शासित प्रदेशाद्वारे परीक्षांचे दोन विभाग असतील, 1)मानसिक योग्यता परिक्षा(मॅट) (MAT)आणि 2)शैक्षणिक योग्यता परीक्षा (सॅट) (SAT) ज्यातसामाजिक विज्ञान,विज्ञान और आणि गणित या विषयांचा समावेश असेल.
चरण 2राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये अ) मानसिक योग्यता परीक्षा(मॅट) (MAT) आणि ब) शैक्षणिक योग्यता परीक्षा (सॅट) (SAT) ज्यात सामाजिक विज्ञान, विज्ञान और आणि गणित या विषयांचा समावेश असेल. क) तोंडी परीक्षा(this word indicates ORAL EXAMINATION and is not according to source text)(इंटरव्‍ह्यू मुलाखत)फक्त जे विद्यार्थी लेखी परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतील त्यांनाच तोंडी राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेसाठी राष्ट्रीय पातळीवरल परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल.

राष्ट्रीय प्रतिभा शोध योजना (इयत्ता 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी)

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत असलेल्‍या राष्ट्रीय प्रतिभा शोध योजनेत, 1000 शिष्यवृत्त्या प्रति वर्षी बहाल करण्‍यात येतील, ज्यात अनुसूचित जातींसाठी 150 शिष्यवृत्त्या आणि अनुसूचित जमातींसाठी 75चा समावेश असेल. ह्या योजनेचा उद्देश 10वीच्या शेवटच्या वर्षात बुध्दिमान विद्यार्थी शोधणे आणि त्यांना वित्तीय मदत करणे असा असेल, ज्यामुळे त्यांच्‍या कौशल्‍याचा विकास होवून पुढे ते अनुशासनाचाचे पालन करतील आणि देशाच्या कामास येतील.

पात्रता
कोणत्‍या ही मान्‍यताप्राप्‍त शाळांसमवेत केन्द्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सैनिक शाळांमध्ये 10वीत शिकणारे सर्व विद्यार्थी त्या राज्याच्या राज्य पातळी परीक्षांना बसण्यास पात्र असतील. त्यात कोणता ही अधिवास प्रतिबंध नसेल.

अर्ज कसा करावा
देशाभरात 10 वीत शिकणार्‍या विद्यार्थांनी वरील परीक्षांसाठी संबंधित सरकारी/संघ राज्य क्षेत्रा तर्फे, वृत्तपत्रात येणा-या किंवा शाळांमध्ये लावलेल्या परिपत्रांतील जाहिरातींवर लक्ष ठेवले पाहिजे व त्यात नमूद केल्याप्रमाणे अर्ज दाखल केला पाहिजे.

परिक्षा
राज्य पातळीवरील परीक्षांचे दोन विभाग असतील : भाग-1 मानसिक योग्यता परीक्षा(मॅट) (MAT) आणि भाग 2 शैक्षणिक योग्यता परीक्षा (सॅट) (SAT). दुस-या पातळीवरील परीक्षेसाठी उमेदवारांची अपेक्षित संख्या एनसीईआरटीतर्फे आयोजित करण्‍यात येईल.

कलात्मक आणि अभिनव उत्कृष्टतेसाठी चाचा नेहरू शिष्यवृत्ती

राष्ट्रीय बाल भवन: बालश्री कार्यक्रम:

संपूर्ण देशभरातून कलेला प्रोत्साहन देण्यात राष्ट्रीय बाल भवनाची महत्वपूर्ण भूमिका आहे. आतापर्यंत देशातील 73 राज्यात आणि जिल्ह्यात बाल भवने आहेत. बाल भवनांतर्फे आजपर्यंत विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांचा सत्कार 1995 पासून बाल श्री योजनेच्‍या अंतर्गत केला जात आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील 9वी ते 12वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी कलात्मक आणि अभिनव उत्कृष्टतेसाठी चाचा नेहरु शिष्यवृत्ती उपलब्ध असेल.

बाल श्री कार्यक्रमाच्या माध्यमातून निम्नलिखित क्षेत्रांतील प्रतिभा शोधल्या जातात :
1. रचनात्मक प्रदर्शन (Creative Performance)
2. रचनात्मक कला (Creative Arts)
3. रचनात्मक शास्‍त्रीय उपक्रम (Creative Scientific Innovations)
4. रचनात्मक लेखन (Creative Writing)

राष्ट्रीय बाल भवन रचनात्मक विद्यार्थ्यांची निवड तीन पातळींवर आयोजित करण्‍यात येणा-या गतिविधिंच्‍या माध्यमातून करतात जसे :

1. 2 दिवसाच्या शिबिराचे आयोजन करुन स्थानिक पातळीच्या 8 मुलांमध्ये (प्रत्येक क्षेत्रातील 2)
अशाप्रमाणे स्थानिक पातळीवरील चयन केले जाते.

2. प्रादेशिक पातळीवर 3 दिवसाच्या शिबिराचे आयोजन करुन स्थानिक विशेषज्ञ आणि उत्तर, पूर्व, पश्चिम, केंद्रीय, दक्षिण-1 आणि दक्षिण-2 अशा 6 प्रदेशातील तज्ञ मुलांची निवड करण्‍यासाठी सहभाग घेतात.

3. राष्ट्रीय पातळीवर 4 दिवसाच्या शिबिराचे आयोजन देशातील 6 प्रदेशातून करण्‍यात येते. 4 पातळींचे प्रतिनिधित्‍व करणा-या नामित तज्ञांचा गट आणि संसाधन व्‍यक्‍ति-विशेष विद्यार्थ्यांच्‍या रचनात्मकतेचे मूल्‍यांकन करतात.

ओलम्पियाड

शिक्षणातील उत्‍कृष्‍टता आणि नि:संशय ज्ञानाधाराची ओळख ओलम्पियाडमुळे होते. भारतात अशा प्रकारच्‍या प्रतिभावान विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यासाठी खालील ओलम्पियाड उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय सायबर ओलंपियाड

राष्ट्रीय सायबर ओलंपियाड, ही देशातील पहिलीच राष्ट्रीय पातळीवरील प्रतिभा शोध स्पर्धा आहे ज्यात तरुण मुलांमधील सायबरबाबतची सहजबुद्धी व प्रतिभा ओळखून त्यांना पुरस्कृत करण्यात येते. आव्‍हान आणि प्रतिस्‍पर्धेचे तत्‍व वाढवून तरुण मुलांमध्‍ये संगणकाबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच तरूण पिढीमध्‍ये सूचना प्रौद्योगिकी बाबत माहिती देऊन करियरच्‍या स्‍वरूपात संगणकीय ज्ञानासंबंधी योग्‍यता वाढविण्‍यात येते.

पात्रता
सीबीएसई/आयसीएसई (CBSE/ICSE) आणि राज्याच्या बोर्डात शिकणारी, इंग्रजी शाळेतील इयत्ता 3री ते 12 वीतील मुले ह्या राष्ट्रीय सायबर ओलंपियाड (एन.सी.ओ.) (NCO) मध्ये सहभागी होऊ शकतात. 9वी ते 12वी तील सर्व विद्यार्थ्यांनी ज्याना विज्ञान, कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या सर्वांनी यात भाग घ्यावा जेणे करुन त्यांच्या संगणकीय ज्ञानाची पातळी वाढून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल.

राष्ट्रीय विज्ञान ओलंपियाड

राष्ट्रीय पातळीवर भाग घेऊन व प्रतिभा दाखविण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान ओलम्पियाडमध्ये 3रीच्या वरील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाते. स्पर्धेची पहिली चाचणी संबंधित शाळांमध्ये शाळेच्या वेळांमध्ये घेतली जाते. ज्या शाळांमध्ये 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नाव नोंदणी असेल त्यांनाच पुढे ओलम्पियाड मध्ये नाव नोंदविता येते.

विद्यार्थ्यांची नाव नोंदणी
ह्यात इयत्ता 3री ते 12 चे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. ह्यासाठी प्रवेश संबंधित शाळांमधून दिलेल्या नमुन्याप्रमाणे दिला जातो. शाळांसाठी नांवनोंदणी पत्र आणि माहिती पुस्तिका भारतातील सर्व शाळांना टपाला द्वारे पाठविण्यात येते.

राष्ट्रीय गणित ओलंपियाड

राष्ट्रीय पातळीवरील गणित ओलंपियाड  हा राष्ट्रीय बोर्डाच्या उच्चतर गणित (एन.बी.एच.एम.) (NBHM) विषयासाठीचे 1986 मधील फार मोठा पुढाकार आहे. उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमधून गणित विषयात तज्ञ असेलेले विद्यार्थी शोधणे या मागचा एक महत्वाचा उद्देश आहे. एन.बी.एच.एम. ने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे व दरवर्षी होणा-या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओलंपियाड साठी तयारी करुन घेण्याची देखील जबाबदारी घेतली आहे.

ओलंपियाड स्पर्धांवर देखरेख करण्याच्या उद्देशाने, देशाचे 16 भागांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ओलंपियाड (आय.एम.ओ.) (IMO) मध्ये भारतामधून सहभागासाठी खालील टप्पे पार करावे लागतात :

चरण 1: विभागीय गणित ओलंपियाड (आर.एम.ओ) : आर.एम.ओ साधारणपणे सप्टेंबर महिन्‍यात आणि डिसेंबरच्या पहिल्या रविवारी दर वर्षी वेगवेगळ्या देशात संपन्न होतात. सर्व शाळांमधील 11वी इयत्तेत शिकणारी मुले आर.एम.ओ साठी पात्र ठरतात. या ओलंपियाडच्‍या अंतर्गत 3 तासांची लेखी परीक्षा असते ज्यात 6 ते 7 प्रश्न असतात.

चरण 2: भारतीय राष्ट्रीय गणिती ओलंपियाड (आय.एन.एम.ओ): आय.एन.एम.ओ दर वर्षी फेब्रूवारी महिन्याच्या रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध सेंटर मध्ये होतात. फक्त आर.एम.ओ. मध्ये निवड झालेले वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी आय.एन.एम.ओ साठी पात्र ठरतात. आय.एन.एम.ओ ही चार तासाची लेखी परीक्षा असते; ज्यात संपूर्ण देशात एकच प्रश्न पत्रिका असते. आय.एन.एम.ओ मध्ये यश मिळविणा-या 30-35 विद्यार्थ्यांना मेरिटचे प्रमाणपत्र देण्यात येते.

चरण 3: आंतरराष्ट्रीय गणिती ओलंपियाड प्रशिक्षण शिबिर (आय.एम.ओ.टी.सी.) : यू.एन.एम.ओ. चे प्रमाणपत्र मिळालेल्यांना एक महिन्याच्या प्रशिक्षण शिबिरासाठी दर वर्षी मे/जून मध्ये आमंत्रित करण्‍यात येते. या खेरीज, आय.एन.एम.ओ. मध्ये मागील वर्षी पारितोषिक मिळविणा-या आणि संपूर्ण वर्ष पोस्टाने अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना देखील शिबिराच्या दुस-या चरणासाठी आमंत्रित करण्‍यात येते. शिबिरातील काही निवड चाचण्यांद्वारे, विशेष प्राविण्य असणा-या 6 विद्यार्थ्यांचा एक समूह लहान व मोठ्या गटातून संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय गणिती ओलंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडला जातो.

चरण 4 : आंतरराष्ट्रीय गणिती ओलंपियाड (आय.एम.ओ.) शिबिराच्या शेवटी निवड झालेला 6 मुलांचा गट त्याचा एक नेता आणि उपनेता हे सर्व  बरोबर आय.एम.ओ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात जी साधारणपणे जुलै मध्ये वेगवेगळ्या देशात संपन्न होते. आय.एम.ओ. मध्ये साडेचार तासाच्या दोन लेखी परीक्षा दोन दिवसात एका दिवसाच्या अंतराने पूर्ण करायच्या असतात. आय.एम.ओ.ला जाण्या येण्यासाठी दोन आठवडे लागतात. ज्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्‍य, आणि ब्रॉन्‍झ पदके आय.एम.ओ. मध्ये मिळतात त्यांना एन.बी.एच.एम तर्फे रोख पारितोषिके रु. 5000/-, 4000/- आणि रु. 3000/- या प्रमाणे त्या वर्षा अखेरीच्या समारंभात शिबिराच्या शेवटी बहाल केली जातात. एम.एच.आर.डी 8 भारतीय प्रतिनिधि सभासदांचा आंतरराष्ट्रीय खर्च उचलते व एन.बी.एच.एम (डी.ए.ई) संपूर्ण देशांतर्गत असलेल्‍या कार्यक्रमांचा खर्च पाहते आणि इतर आंतरराष्ट्रीय सहभागासाठी लागणा-या खर्चांची बाजू संभाळते.

गणिती ओलंपियाडसाठी अभ्‍यासक्रम : गणिती ओलंपियाडच्‍या अभ्‍यासक्रमाच्‍या (विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय) पूर्व-पदवी गणित असते. आर.एम.ओ ते आय.एन.एम.ओ ते आय.एम.ओ. अशी पायरी अवघड होत जाते.

गणिती ओलंपियाड हे खालील पाठ्यपुस्तकांमधून मिळू शकते :

मॅथेमॅटिक्स ओलंपियाड प्रायमर, लेखक व्ही. कृष्णमूर्ती, सी.आर.प्रणेसाचार, के.एन. रंगनाथन आणि बी.जे. वेंकटाचला (इंटरलाईन पब्लिशिंग प्रा.लि. बंगलोर).

चेलेंज एन्ड थ्रिल ऑफ प्री-कॉलेज मॅथेमॅटिक्स, लेखक व्ही. कृष्णमूर्ती, सी.आर.प्रणेसाचार, के.एन. रंगनाथन आणि बी.जे. वेंकटाचला (न्यू एज पब्लिशर, नवी दिल्ली)

अंतिम सुधारित : 8/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate