অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा 22 हजार रुग्णांना लाभ

उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा 22 हजार रुग्णांना लाभ

सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार सेवा पुरविणारी “राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे” नामकरण आता “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” असे करण्यात आले आहे.या योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याने दरम्यानच्या काळात विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी विद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. विद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमधील तरतुदी प्रमाणेच उपचार पद्धती व विमा संरक्षण अनुज्ञेय राहील.असे 13 एप्रिल 2017 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा 22 हजार रुग्णांना लाभ

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात व तालुक्यात अनेक प्रकारच्या आजारातून रुग्णांना लाभ मिळाला आहे. आतापर्यंत 22 हजार रुग्णांना याचा फायदा झाला आहे. योजनेमुळे संबंधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अतिगंभीर आजाराच्या 971 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया/उपचार

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना दि 21 नोव्हेंबर 2013 पासून सुरु करण्यात आली आहे .योजनेला 20 नोव्हेंबर 2016 रोजी 3 वर्षे पूर्ण झाली. या योजनेत 971 अतिगंभीर व अतिविशिष्ट प्रकारच्या रुग्णांवर उपचार/शस्त्रक्रिया या योजनेतून केले जातात.महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये नवीन शासन निर्णयानुसार शेतकरी आत्महत्या ग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबाचा समावेश यात करण्यात आला आहे .उस्मनाबाद जिल्ह्यातून व शहरातून या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयातून विविध प्रकारच्या उपचार/शस्त्रक्रियांचा लाभ देण्यात येतो.अतिगंभीर 971 आजारी रुग्णांवर यशस्वी उपचार/शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत .जिल्ह्यातील 5 रुग्णालयातून 7 हजार 321 रुग्णांवर उपचार/शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत.

या योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांवर 21 नोव्हेंबर 2013 ते 31 मार्च 2014 पर्यत 9 हजार 45, 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015 पर्यत 4 हजार 70, दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 पर्यत 5हजार 280, 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 पर्यंत 7 हजार 923, 1 एप्रिल 2017 ते 30 सप्टेबर 2017 पर्यंत 4 हजार 539 अशा एकूण 22 हजार 657 रुग्णांवर 43 कोटी 28 लाख 31 हजार 326 रुपयांच्या विविध प्रकारची शस्त्रक्रिया/उपचार उस्मानाबाद बाहेरील जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील उस्मानाबाद व उर्वरित अन्य जिल्ह्यातील रुग्णांनी जिल्ह्यातील 5 रुग्णालयातून 21 नोव्हेंबर 2013 ते 31 मार्च 2014 पर्यत 97, 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015 पर्यत 607, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 पर्यत 965, 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 पर्यत 3 हजार 209, 1 एप्रिल 2017 ते 30 सप्टेबर 2017 पर्यंत 2 हजार 443 अशा एकूण 7 हजार 321 रुग्णांवर 9 कोटी 53 लाख 10 हजार 650 रुपयांच्या विविध प्रकारची शस्त्रक्रिया/उपचार करण्यात आल्या आहेत.

    महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

१) रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्तोदय, अन्नपूर्णा)

२) पांढरी रेशनकार्ड व 7/12 उतारा (शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी)

३)ओळखपत्र – (आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक व इतर शासनमान्य ओळखपत्र)

४) लहान मुलासाठी (6 वर्ष वयापेक्षा कमी) जन्माचा दाखला, आई किंवा वडिलांचे ओळखपत्र.

५) फाटलेले रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड मध्ये त्रुटी असतील तर तहसिलदाराचे प्रमाणपत्र किंवा दुय्यम शिधापत्रिका

    योजेनेंतर्गत संलग्नित रुग्णालये :

१ .जिल्हा रुग्णालय ,उस्मानाबाद

२ .निरामय हॉस्पिटल ,उस्मानाबाद

३ .सुविधा हॉस्पिटल अंड आय सी यु सेंटर ,उस्मानाबाद

४ .सह्याद्रि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ,उस्मानाबाद

५ .चिंचोळी हॉस्पिटल ,उमरगा ,उस्मानाबाद

योजेनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री नं : 18002332200 किंवा 155388

website :www.jeevandayee.gov.in, अशी माहिती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.गुरुनाथ थत्तेकर यांनी दिली.

लेखक - मनोज शिवाजी सानप ,

जिल्हा माहिती अधिकारी,

उस्मानाबाद.

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 2/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate