असावा सुंदर चॉकलेटचा बंगलाचंदेरी सोनेरी चमचमता चांगलाचॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दारशेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खारगोल गोल लेमनच्या खिडक्या दोन"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदारपेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललालचांदीच्या झाडामागं चांदोबा रहातोमोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतोउंच उंच झोक्याचा खेळ रंगलामैनेचा पिंजरा वर टांगलाकिती किती सुंदर चॉकलेटचा बंगलाचंदेरी सोनेरी चमचमता चांगला कवी : राजा मंगळवेढेकर