ए आई मला पावसात जाउ देएकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ देमेघ कसे बघ गडगड करितीवीजा नभातुन मला खुणवितीत्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु देबदकांचा बघ थवा नाचतोबेडुक दादा हाक मारतोपाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु देधारेखाली उभा राहुनीपायाने मी उडविन पाणीताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे कवियत्री : वंदना विटणकर