थ -थ –थंडी, दे ग आई बंडी !
खाऊ मस्त – मस्त, झोपून राहू सुस्त !
थ -थ थंडी, नेसुया ग लुगडी !
खेळू फु- फुगडी, पळून जाईल थंडी !
प -प - पाढे , वाचू ध - ध धडे !
खाऊ खेळू मस्त । नको बनू सुस्त !
थ - थ थंडी, दे ग आई बंडी !
खाऊ मस्त मस्त, झोपून राहू सुस्त !
थ - थ थंडी, घालू विजार तोकडी !
खेळू ल -ल- लंगडी ! पळून जाईल थंडी !
गिरवू बाराखडी, गाऊ गीते चिमखडी !
करू कसरत थोडी ! उभारू आरोग्याची गुढी !
पळून जाईल थंडी ! पळून जाईल थंडी !
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 10/7/2020