मंद -मंद - वाऱ्याची झुळूक मी होणार
बंद -बंद --कळीला फुलवत राहणार ।
टप -टप पडणारा थेंब मी होणार
पट -पट मोती माळत राहणार ।
रट --रट शिजणारा तृण मी होणार
मट --मट खाणाऱ्यास तृप्त मी करणार ।
लुक -लुकता आकाश दीप मी होणार
चम -चमता प्रकाश धरतीला देणार ।
गर -गर फिरणारे चाक मी होणार
भर -भर विद्न्यानास आकार मी देणार ।
कण -कण बीज बनून मातीत मी जाणार
मण -मण धान्य बनून सुवर्णमय होणार !
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 10/7/2020