অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जन्मांमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे

जन्मांमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे

  1. टायमिंग बर्थ (Timing Birth) ची माहिती मिळवून त्याप्रमाणे कृती करणे महत्वाचे का आहे?
  2. टायमिंग बर्थबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास माहिती मिळण्याचा हक्क आहे काय
  3. सहाय्यक माहिती - जन्मांमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे
    1. महत्वाचा संदेश - वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर होणार्या गर्भधारणेमुळे आई व मुलाचे आरोग्या स असलेले धोके वाढतात.
    2. महत्वाचा संदेश :आई व मुलाचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असावे.
    3. महत्वाचा संदेश : चार बाळंतपणांनंतर गर्भधारणा व मुलाच्या जन्मामधील धोका वाढतो.
    4. महत्वाचा संदेश : कुटुंबनियोजनाच्या सोयी लोकांना मुलाच्या जन्माची वेळ, किती मुलांना जन्म द्यायचा, दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवायचे व मूल जन्माला घालण्यास पूर्णविराम केव्हा द्यायचा इ. बाबींबाबत माहिती पुरवितात.
    5. महत्वाचा संदेश : कुटुंबनियोजनाची जबाबदारी स्त्रिया व पुरुष ह्या दोघांची ही आहे; तसेच ह्यामुळे आरोग्यास होणार्या फायद्यांची माहितीदेखील प्रत्येकाला असायला हवी. अनियोजित गर्भधारणा टाळण्याची जबाबदारी स्त्री व पुरुष अशा दोघांनी ही उचलायला हवी.

टायमिंग बर्थ (Timing Birth) ची माहिती मिळवून त्याप्रमाणे कृती करणे महत्वाचे का आहे?

  • अनेक बाळंतपणे होणे, दोन बाळंतपणांमध्ये फार कमी अंतर असणे किंवा वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर गर्भधारणा येणे राहणे ह्यामुळे स्त्रियांचे जीवन संकटात सापडते व किमान एक तृतीयांश अर्भकांचे मृत्यू ओढवतात.
  • स्त्रिया व मुलांचे आरोग्य सुधारण्याचा अतिशय सबळ उपाय म्हणजे कुटुंबनियोजन. विकसनशील देशांमधील 100 दशलक्षांपेक्षा ही अधिक स्त्रिया सांगतात की त्यांनी गर्भनिरोधक साधनांची मागणी केल्यास त्यांच्या नवर्याकडून किंवा संबंधित पुरुषाकडून ती पुरवली जात नाही. कुटुंबनियोजनाची साधने व सोयी सर्वांना सहजपणे मिळाल्यास – तरुणवर्गासह, विशेषतः जेथे लवकर लग्न केले जाते त्यास देशांमध्येे - व शिक्षणाचा एकंदर प्रसार वाढल्यास जन्माच्या वेळीच होणारे बालकांचे मृत्यू किंवा त्यांना येणारे अपंगत्व रोखता येईल.

टायमिंग बर्थबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास माहिती मिळण्याचा हक्क आहे काय

  1. वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर होणार्या गर्भधारणेमुळे आई व तिच्याT मुलाच्याव आरोग्यास असणारे धोके वाढतात.
  2. आई व मुलाचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता, दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असावे.
  3. चार बाळंतपणांनंतर गर्भधारणा व मुलाच्या जन्मामधील धोका वाढतो.
  4. कुटुंबनियोजनाच्या सोयी लोकांना मुलाच्या जन्माची वेळ, किती मुलांना जन्म द्यायचा आणि दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवायचे व मूल जन्माला घालण्यास पूर्णविराम केव्हा द्यायचा इ. बाबींबद्दल माहिती देतात. गर्भधारणा टाळण्याचे अनेक सुरक्षित व मान्यताप्राप्त उपाय आज उपलब्ध आहेत.
  5. कुटुंबनियोजनाची जबाबदारी स्त्रिया व पुरुष ह्या दोघांची ही आहे; तसेच ह्यामुळे आरोग्यास होणार्या फायद्यांची माहितीदेखील प्रत्येकाला असायला हवी.

सहाय्यक माहिती - जन्मांमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे

महत्वाचा संदेश - वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर होणार्या गर्भधारणेमुळे आई व मुलाचे आरोग्या स असलेले धोके वाढतात.

  • गर्भधारणा व मुलाच्या जन्माशी संबंधित समस्यांमुळे दरवर्षी सुमारे 515,000 स्त्रिया मृत्युमुखी पडतात. तर मरणार्या प्रत्येक स्त्रीमागे सुमारे 30 इतर स्त्रियांना गंभीर समस्या किंवा अपंगत्वास तोंड द्यावे लागते. असे मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना कुटुंबनियोजनाद्वारे टाळता येतात.
  • मुलगी किमान 18 वर्षांची होईपर्यंत पहिली गर्भधारणा होऊ न दिल्यास गर्भधारणा व बालकाचा जन्म सुरक्षित रीतीने होईल व जन्माला येणारे मूल कमी वजनाचे असण्याची शक्यता राहणार नाही. ज्या देशांमध्ये मुलीचे लग्न लवकर करून देण्याची पध्द त आढळते तिथे हे महत्वाचे आहे.
  • मुलगी किमान 18 वर्षांची होईपर्यंत गर्भधारणेसाठी तिचे शरीर तयार झालेले नसते. प्रौढ स्त्रीाच्या तुलनेत कमी वयाच्या मुलीस अपत्यजन्माची प्रक्रिया अत्यंत त्रासदायक व जोखमीची ठरते. शिवाय अगदी तरूण मातांना होणारी मुले पहिल्याच वर्षात दगावण्याची शक्यता देखील खूप असते. आई वयाने जितकी लहान, तितकाच तिला व तिच्या मुलाला असणारा धोका अधिक असतो.
  • तरूण मुलींना गर्भधारणा लांबवण्यासाठी विशेष मदतीची गरज असते. अशा तरूणींना व त्यांच्या कुटुंबियांना लवकर होणार्या बाळंतपणामधील धोके व ते टाळण्याच्या उपायांची माहिती देण्याित आली पाहिजे.
  • वयाच्या 35 वर्षांच्याक नंतर गर्भधारणा व अपत्य जन्मामधील धोके वाढण्याचस सुरूवात होते. एखाद्या स्त्रीचे वय 35 पेक्षा जास्त असेल व तिची चार किंवा अधिक बाळंतपणे झाली असल्यास त्यानंतरच्या गर्भधारणेमुळे तिला व त्या गर्भास गंभीर धोका असू शकतो.

महत्वाचा संदेश :आई व मुलाचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असावे.

  • दोन मुलांमधील अंतर दोन वर्षांपेक्षा कमी असल्यास बालमृत्यूचे प्रमाण जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढते.
  • दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकाच्या आरोग्यास व वाढीस असलेला सर्वांत मोठा धोका म्हणजे नवीन बाळाचा जन्मक. कारण त्यामुळे ह्या पहिल्या बालकास मिळणारे आईचे दूध कमी होते किंवा थांबतेच. शिवाय त्याला आवश्यक असलेले विशेष अन्न तयार करण्यासाठी किंवा आजारपणामध्ये त्याची काळजी घेण्यासाठी आईला वेळच मिळत नाही. परिणामस्वीरूप, वयात दोन वर्षांपेक्षा अधिक अंतर असलेल्या सख्ख्या भावंडांच्या तुलनेमध्ये, पाठोपाठ जन्मलेल्या मुलांची शारीरीक किंवा मानसिक विकास पूर्ण होत नाही.
  • गर्भधारणा व अपत्यजन्मामध्ये खर्च झालेली ताकद भरून येण्यास स्त्रीच्या शरीरास दोन वर्षांची गरज असते. पाठोपाठच्या बाळंतपणांमुळे आईच्या आरोग्यास अधिक धोका असतो. पुन्हांी गर्भधारण करण्यासाठी आईच्याय शरीरामध्ये पुरेशी ताकद भरणे गरजेचे असते. स्त्रीच्या व एकंदरीनेच कुटुंबाच्या आरोग्याच्या‍ संरक्षणाचा विचार करून पुरुषांनी अपत्या जन्माीसाठी आवश्य क असलेल्याच दोन वर्षांच्या ह्या कालावधीचे महत्व लक्षात घेतले पाहिजे.
  • मागील बाळंतपणामध्ये गमावलेली ताकद भरून येण्याआधीच एखाद्या स्त्रीस पुन्हा गर्भ राहिल्यास जन्माला येणारे मूल अपुर्या दिवसांचे व कमी वजनाचे असण्याची बरीच शक्यता असते. कमी वजनाच्या ह्या बालकाची पुढील वाढ ही खुंटते, ते जास्त वेळा आजारी पडते व इतर सर्वसामान्य वाढीच्या मुलांच्या तुलनेमध्ये पहिल्या वर्षातच दगावण्याची ही शक्यता अधिक असते.

महत्वाचा संदेश : चार बाळंतपणांनंतर गर्भधारणा व मुलाच्या जन्मामधील धोका वाढतो.

  • पुनःपुन्हा होणारी गर्भधारणा व अपत्यजन्मामुळे तसेच अंगावर दूध पाजणे व तान्ह्या बाळांची काळजी घेण्यामधील दगदगीने स्त्रीचे शरीर फार लवकर थकू शकते. चारपेक्षा जास्तच बाळंतपणे झाल्यास, आणि विशेषत: ह्या बाळंतपणांमधील अंतरदेखील 2 वर्षांपेक्षा कमी असल्यास तिला कदाचित ऍनिमिया (रक्तह पातळ होणे) व हॅमरेजसारख्याष (अत्यजधि‍क रक्ततस्त्राजव) गंभीर समस्यां ना तोंड द्यावे लागते.
  • चार किंवा अधिक बाळंतपणे झालेल्या स्त्रीच्या अपत्याचा अकाली मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.

महत्वाचा संदेश : कुटुंबनियोजनाच्या सोयी लोकांना मुलाच्या जन्माची वेळ, किती मुलांना जन्म द्यायचा, दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवायचे व मूल जन्माला घालण्यास पूर्णविराम केव्हा द्यायचा इ. बाबींबाबत माहिती पुरवितात.

गर्भधारणा टाळण्याचे अनेक सुरक्षित व मान्यताप्राप्त उपाय आज उपलब्ध आहेत.
कुटुंबनियोजनाची मान्यताप्राप्त, सुरक्षित, सोयीची, प्रभावी तसेच परवडणारी पद्धत वापरण्याबाबत आरोग्यकेंद्रांनी लोकांना योग्य तो सल्ला देणे अपेक्षित आहे.
कुटुंबनियोजनाच्या विविध उपायांपैकी फक्त निरोध (कंडोम) ह्या एकाच साधनाच्या वापराने गर्भधारणा टाळणे व लैंगिक संबंधांतून पसरणार्या एचआयव्ही/एडस् सारख्या रोगांना अटकाव करणे असे दुहेरी हेतू साध्य होतात.
मुलाच्या जन्मानंतर आईने त्यास फक्त स्वतःचेच दूध पाजल्यास तिला तिची गर्भधारणा-क्षमता (फर्टिलिटि) पुन्हा प्राप्त होण्यास सहा महिने लागतात. अशा रीतीने बालकास फक्त स्वतःचेच दूध पाजत राहणार्या स्त्रीस पुन्हा लगेचच गर्भ राहण्याची शक्यता फक्त 2 टक्के असते - अर्थात तिचे मूल 6 महिन्यापेक्षा कमी वयाचे असल्यास, तिची मासिक पाळी पुन्हा सुरू झालेली नसल्यास, आणि मुलास गरज असेल तेव्हाा आईचे दूध मुबलक प्रमाणात मिळत असल्याहस आणि दुसरी कुठली ही पेये किंवा आहार देण्याणत येत नसेल तर - हा उपाय लागू पडतो.

महत्वाचा संदेश : कुटुंबनियोजनाची जबाबदारी स्त्रिया व पुरुष ह्या दोघांची ही आहे; तसेच ह्यामुळे आरोग्यास होणार्या फायद्यांची माहितीदेखील प्रत्येकाला असायला हवी.
अनियोजित गर्भधारणा टाळण्याची जबाबदारी स्त्री व पुरुष अशा दोघांनी ही उचलायला हवी.

त्यासाठी कुटुंबनियोजनाच्या आज उपलब्ध असलेल्या विविध पद्धतींची माहिती आरोग्यसेवकाकडून त्यांना मिळाली पाहिजे.
ही माहिती डॉक्टर, नर्स (परिचारिका), शिक्षक, कुटुंबनियोजन चिकित्सा्लय व युवक किंवा महिला संघटनांकडूनदेखील मिळू शकते. टायमिंग बर्थ (Timing Birth) ची माहिती मिळवून त्‍याप्रमाणे कृती करणे महत्वाचे का आहे? अनेक बाळंतपणे होणे, दोन बाळंतपणांमध्ये फार कमी अंतर असणे किंवा वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर गर्भधारणा येणे राहणे ह्यामुळे स्त्रियांचे जीवन संकटात सापडते व किमान एक तृतीयांश अर्भकांचे मृत्यू ओढवतात. स्त्रिया व मुलांचे आरोग्य सुधारण्याचा अतिशय सबळ उपाय म्हणजे कुटुंबनियोजन. विकसनशील देशांमधील 100 दशलक्षांपेक्षा ही अधिक स्त्रिया सांगतात की त्यांनी गर्भनिरोधक साधनांची मागणी केल्यास त्यांच्या नवर्‍याकडून किंवा संबंधित पुरुषाकडून ती पुरवली जात नाही. कुटुंबनियोजनाची साधने व सोयी सर्वांना सहजपणे मिळाल्यास – तरुणवर्गासह, विशेषतः जेथे लवकर लग्न केले जाते त्‍या देशांमध्‍ये - व शिक्षणाचा एकंदर प्रसार वाढल्यास जन्माच्या वेळीच होणारे बालकांचे मृत्यू किंवा त्यांना येणारे अपंगत्व रोखता येईल.

 

स्त्रोत : UNICEF

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate