অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोषक पदार्थ आणि अन्न

प्रथिने

 

कोणते अन्न पदार्थ आपल्याला प्रथिने पुरवतात

प्रथिने पुरविणारे वेगवेगळे अन्न पदार्थ खालील तक्त्यात दाखवीले आहेत

अन्न पदार्थ

प्रथीने क्षमता (१००ग्राम प्रतीपदार्थ)

दूध
चीझ
पनीर
दूध पावडर
मांस मासे
सोयाबिन
डाळी
दाणे
अखंड डाळी


२४
१५
३८
१८-२०
४३
१८-२४
१८-२५
८-१२

 

प्रथिने युक्त अन्नाचे शारीरिक महत्व

 

प्रथिने युक्त शारीरिक महत्व हे त्या प्रथिनामध्ये असलेल्या ऍमिनो ऍसीड वरून ठरवता येते. दुध, मासे, मांस, सोयाबीन हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून त्यांना अत्यंत चांगले प्रथिने म्हणतात. भाजीपाला ७५ प्राण्याकडून २५ अखंड डाळीपासून ५० व फोडलेल्या डाळीपासून ५० प्रथिने मिळतात. अतिप्रथिने इजाकारक असतात.

नुतन अशी माहीती हाती आहे की जास्त प्रथिने हानीकारक असतात त्यामुळे.

१)      किडनी खराब होते

२)      हाडातील खजिने कमी होतात.

३)      आतड्याचा कर्करोग होवू शकतो.

४)      प्रथिने खनिजात रुपांतरीत होवून हानी पोहचू शकते.

योग्य प्रमाणात न मिळणा-या प्रथिनाचे परिणाम

योग्य प्रमाणत प्रथिने न मिळाल्यास वाढीवर परिणाम होतो शरीरिक व मेंदूची वाढ कमी होते तंदुरुस्तीवर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलामध्ये Kwashiorkar नावाचा रोग होतो PEM ( protin – energy malnutrition) रोग होतो. प्रगतीशील देशामध्ये हा आढळतो.

पाणी

 

पाणी का महत्वाचे आहे?

 

पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन हे पाण्याचे असते. पाण्याविना शरीर फार गुंतागुंतीचे होते. २० ते २५ टक्के पाणी जर शरीरातले कमी झाले तर जगणे जवळ जवळ अशक्य होते.

शरीरातील प्रत्येक पेशीला इमारत बांधीनी म्हणून पाण्याचा उपयोग होतो. अन्न पदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे ह्यासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग होतो.

शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते.

दररोज किती पाणी आवश्यक असते ?

 

सर्व साधारण १ ml पाणी अन्नाच्या उष्मांकांला आवश्यक असते. म्हणजे दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) प्रत्येक दिवसाला पाणी आवश्यक असते. शरीर नेहमी पाण्याचे संतुलन ठेवत असते.

पाणी

फ्लोरिक ऍसीड, मांस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, Macrocytic anemia, asparagus गहू, दाणे, रताळी, Magaloblastic anemia तांबडा, भोपळा Reduction in W.B.C.

पाण्यात विरघळणा-या जीवनसत्वांचा शरीरात साठा होऊ शकत नाही जास्त प्रमाणात असणारी शरीरातील अशा प्रकारची जीवनसत्वे मुत्राव्दारे शरीरातील निघून जातात. यामुळे अशा जीवनसत्वांचा रोजच्या रोज पुरवठा तोटे टाळण्यासाठी आवश्यक असतो. योग्य प्रकारच्या आहाराच्या सेवनामुळे अशी जीवनसत्वे शरीराला मिळू शकतात, औषधाद्वारे अशा प्रकारची जीवनसत्वे घेणे योग्य नाही कारण त्यामुळे अधिक काहीच फायदा होत नाही.

जीवन सत्वे

मिळवण्याचा मार्ग योग्य प्रमाणात

न मिळाल्यास होणारे तोटे

सी- Ascorbic acid

आवळा, पेरू, संत्री, मोसंबी, लिंबू, टॉबेरी , शेवग्याच्या शेंगा, पोपई, Anamia,कलींगड टॉमेटो, कोबी

Acute Scury जखम भरून येण्यास उशीर, Fragile capillaries कीडके दात, साथीचे रोग, लोहाची कमतरता

ए १ - Thaimin

दाणे आणि तेलबीया, सीसेम, मटार, सर्व प्रकारच्या न फोडलेल्या डाळी, गहू, सोयाबीन.

बेरीबेरी, पायात गोळे येणे, मानसिक तणाव, Edema, भूक न लागणे, वजनात घट.

व २ - Niacin

यीस्ट, मटार, वाटाणे, Peanut Butter सीसेम बीया, सोयाबीन न फोडलेल्या डाळी, दाणे मासे, अंडी

Acute- Pellagra Anoria तोंड येणे, अशक्तपणा, चीडचीड, मानसिक तणाव, Orgam meet. damage to contra Nervous System Skin

 

पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्‌स)

 

पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील ऐच्छीक आणि अनैच्छीक कार्य आणि आपल्या शरिरातील प्रोटीन आणि जड पदार्थाच्या निवळीकरणाला मदत करतात. साखर, पाणी, मुळा कार्ल इत्यादी. पदार्थात आपल्याला पिष्टमय पदार्थ आढळतात.

साखर ही १०० टक्के पिष्टमय आहे. भाजीपाला, फळे आणि डाळीचे कवच (टरफल ) हे पदार्थ जास्तीत जास्त पिष्टमय पदार्थ (साठवून असतात) आणि हे पदार्थ मानवी आतड्यांमध्ये पचवू शकत नाहीत. म्हणून या पदार्थाला किंमत देत नाही. आणि टाकावू म्हणून प्रसिध्द आहेत. आणि आपल्या शारीरीक तंदुरूस्तीसाठी व जिभेच्या वळणासाठी आणि (Arterioscerosis) C.H.D. आणि महत्वाचे पिष्टमय पदार्थ आपल्या शरिरातील वजन वाढल्यास वजन घटण्यात मदत करतात. साधारणत: ६०ते ७० टक्के उर्जा पिष्टमय पदार्थापासून मिळते. नेमके भारतीय पदार्थ ७० ते ७५ टक्के पिष्टमय असतात. पाश्‍चिमात्य देशातील पदार्थ फक्त ४० ते ५० टक्के पिष्टमय असतात. कमीत कमी १०० ग्राम पिष्टमय पदार्थ चरबीच्या ऑक्सीजनीकरणाला आवश्यक असतात. हे साठवणीपेक्षा जास्त साठवलेली असतात.

जीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स)

 

जीवनसत्वे

अ(A)

प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी–यातून मिळते

ब १ (B 1)
पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननसयातून मिळते

ब २ (B 2)
मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूधयातून मिळते

ब ३ (B 3)

कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्टयातून मिळते

ब ५ (B 5)
शरीरातील शक्ती वाढवते धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलकयातून मिळते

ब६ (B 6)
प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीयायातून मिळते 

ब१२ (B 12)
पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग यीस्ट, दुग्धजन्य पदार्थयातून मिळते 

फॉलिक ऍसिड


लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते) गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रसयातून मिळते

क (C)
प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी...) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षेयातून मिळते

ड (D)
कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलकयातून मिळते

इ (E)
रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळायातून मिळते

फ (F)
कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते दाणे, काजू–यातून मिळते

के (K)
रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. (गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त) यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलकयातून मिळते 

खनिजे


लोह
सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते (गर्भवतीस अतिशय आवश्यक) चेरीचा रस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट

कॅल्शियम
हाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजरयातून मिळते

फॉस्फरस
कॅल्शियम, तसेच ड जीवनसत्वाच्या कार्यात मदत करते, उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक दुग्धजन्य पदार्थ, पूर्णं धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदामयातून मिळते

पोटॅशियम
स्नायुंचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक, शरिरात सोडीयम ची आवश्यक पातळी कायम ठेवते केळी, खजूर, पपई, धान्याचे मोड, पालेभाज्यायातून मिळते

मॅग्नेशियम
प्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मदत करते, कॅल्शियमची आवश्यक पातळी कायम ठेवते, तणावापासून मुक्ती देते हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थयातून मिळते

झिंक
उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थयातून मिळते

खनिजांचे महत्व

शरीराच्या वाढीसाठी व प्रगतीसाठी खनीजांची खूप आवश्यकता आहे. आम्लयुक्त पदार्थांच त्यामुळे समतोल राखला जातो. मज्जासंस्था, स्नायु, पेशी व पाण्याचा समतोल यामुळे राखला जातो. ज्या अन्नामध्ये सल्फर फॉस्परस, क्लोरीन असते ती अन्न शरीराला जास्त पोषक असतात दूध, चीज डाळी, मांस, अंडी, सोडीयम पोटॅशीयम, मॅग्नेशियम, लोह, फळ, व भाज्या अर्कयुक्त आहार आहे. खनीजांचे अधिक सेवन हे शरीराला फायदेशीर नसते . खनीजांचे जास्त झालेले सेवन हे संडासाद्वारे बाहेर फेकले जाते. लोहाचं जास्त सेवन यकृताला (लीव्हरला) घातक असते. खनीजांचे जास्त सेवन हे शरीरात असमतोल निर्माण करतो, किंवा इतर खनीजांच्या सेवनाला तरी घातक ठरू शकतात.

खनीज मिळण्याचे मार्ग व त्यामुळे होणार्‍या त्रृटीचे परिणाम

खनीज

मार्ग

मार्ग त्रुटीचे परिणाम

कॅल्शीयम फॉस्परस

(क्षारयुक्त पदार्थ) दूध व दूधाचे प्रकार, मांस, मासे,हिरव्या पालेभाज्या,  दाणे, डाळी, कडधान्य

Rickets, Octeaomalacia Osteoporosis Poor Blood clotting दातांचे दुखणे

सोडीयम

मीठ, बेकींग पावडर, प्रथीनयुक्त अन्न, मासे, दूध, अंडी व कोंबडी

स्नायूंमध्ये गोळे येणे, विचारात गोंधळ, द्रव पदार्थाचा कमी पुरवठा, वशरीरातील असमतोल तत्व.

लोह

मांस, कडधान्य, सुकामेवा

Hypo chronic, Microcytic रक्ताची कमतरता.

पोटॅशियम

दूध व त्याचे प्रकार, मांस व त्याचे द्रव पदार्थाचे प्रकार, फळ भाज्या, कॉफी

असमतोलत्व, पेशींची हानी

 

आशय लेखक : योगेश शिंदे

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate