অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नियमित लसिकरण कार्यक्रम

पार्श्वभूमी

बालकांमधील लसीकरणाव्‍दारे प्रतिबंध करता येणा़-या आजारांचे प्रमाण व त्‍या आजारांमुळे होणारे मृत्‍यु कमी करण्‍यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम सुरु करण्‍यात आलेला आहे. ऑक्‍टोबर १९७७ मध्‍ये लसीकरणाव्‍दारे प्रतिबंध करता येणा-या घटसर्प, डांग्‍या खोकला, धनुर्वात, पोलिओ व क्षयरोग या पाच आजारावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी ''विस्‍तारित लस टोचणी कार्यक्रम (विलटो)'' सुरु करण्‍यात आला. सन १९८५-८६ मध्‍ये ''सार्वत्रिक लसीकरण'' कार्यक्रम सुरु करण्‍यात आला. गोवर लसीचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामध्ये करण्‍यात आला.

नियमित लसीकरण कार्यक्रमाच्‍या वेळापत्रकामध्‍ये हिपॅटायटिस बी या रोगाच्‍या लसीचा समावेश राज्‍यात सन २००८-०९ मध्‍ये टप्‍याटप्‍याने करण्‍यात आला. आता ही लस सर्व जिल्‍हयांमध्‍ये लागू करण्‍यात आली आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात जापनीज एन्‍सेफलायटिस या रोगाच्‍या लसीचा समावेश अमरावती (महानगरपालिकासहीत) यवतमाळ, नागपूर, भंडारा, वाशिम, गडचिरोली, लातूर आणि बीड जिल्‍हयात करण्‍यात आला. महाराष्‍ट्रात लसीकरणाच्‍या वेळापत्रकामध्‍ये सन २०११ पासून गोवर लसीच्‍या दुस-या मात्रेचा समावेश करण्‍यात आला.

विशेष वैशिष्ठ्ये

  • लसीकरणाव्‍दारे प्रतिबंध करता येणा-या आजारांसाठी लहान बालकांचे लसीकरण, धनुर्वातासाठी गरोदर मातांचे लसीकरण.
  • नियोजित सत्रांमध्‍ये लसीकरण करणे
  • लसीची क्षमता टिकविण्‍यासाठी शितसाखळीचे व्‍यवस्‍थापन
  • लसीकरणाची सुरक्षितता वाढविण्‍यासाठी सर्व जिल्‍हे व महानगरपालिका यांना एडी सिरिंजेसचा पुरवठा करण्‍यात येतो.
  • जैविक वैदयकिय कच-याची सु‍रक्षित विल्‍हेवाट
  • वैदयकिय अधिकारी व आरोग्‍य कर्मचारी यांचे नियमित प्रशिक्षण
  • लसीकरणानंतर उदभवणा-या विपरित प्रतिक्रियांचा आढावा घेण्यासाठी जिल्‍हा व राज्‍यस्‍तरावर अन्‍वेषण समित्‍यांची स्‍थापना
  • लसीकरणानंतर उदभवणा-या विपरित प्रतिक्रियांची माहिती नोंदविण्‍यासाठी ‘’व्हिजीफलो’’ या आंतरराष्‍ट्रीय ग्‍लोबल पोस्‍ट मार्केटिंग सर्व्‍हेलन्‍स ऑनलाईन सॉफट्वेअरचा वापर.

कार्यक्रमाची कार्यपध्दती

राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रम केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राबविण्यात येतो. लसी तसेच सिरिंजेस शितसाखळी उपकरणे व अनुदान केंद्रशासनाकडून पुरविण्यात येते. लसीकरणासाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे दिलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचा वापर केला जातो.

आरोग्य संस्था व बाहयसंपर्काच्या ठिकाणी ठराविक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते. लाभार्थीपर्यंत लस पोहचविण्यासाठी लसीची वाहतूक करताना शितसाखळीची गुणवत्ता अबाधित ठेवली जाते. आरोग्य व कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणा-या लाभार्थींची नोंद लसीकरण रजिस्टर मध्ये करतात.

लसीकरणाच्या सेवा प्रशिक्षित कर्मचा-यांकडून लाभार्थींना विनामुल्य पुरविल्या जातात. लसींची शितसाखळी अबाधित ठेवण्यासाठी आईसलाईन्डम रेफ्रीजरेटर, डिपफ्रीजर, कोल्ड बॉक्स व्हॅक्सीन कॅरिअर, आईस पॅक, वॉक इन कुलर आणि फ्रीजर्स अशा उपकरणांचा वापर केला जातो.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ही राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम स्वरुपात संपुर्ण राज्यात व ठराविक जिल्हसयांच्याय जिल्हयांत अतिजोखमीच्या‍ कार्यक्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते.

नियमित लसीकरण कार्यक्रम

अर्भक, लहान बालके व गर्भवती महिलांसाठी राष्‍ट्रीय लसीकरण वेळापत्रक
लसकधी द्यावेमात्रामार्गजागा
गर्भवती महिलांसाठी
टी.टी-१ गरोदरपणाच्‍या सुरुवातीला ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
टी.टी-२ टी.टी. दिल्‍यानंतर ४ आठवडयांनी+ ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
टी.टी-बूस्‍टर जर माता मागील टी.टी. दिल्‍यानंतर ३ वर्षाच्‍या आत गरोदर राहिल्‍यास ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
अर्भकासाठी
बी.सी.जी. जन्‍मतः, शक्‍य तितक्‍या लवकर, एक वर्ष पुर्ण होण्‍याआधी ०.१ मि.ली.(एक महिना आंतील बालकांना ०.०५ मि.ली.) त्‍वचेमध्‍ये (अंतःत्‍वचा) डाव्‍या दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
हिपॅटायटिस़्- बी जन्‍मतः जन्‍मल्‍यानंतर २४ तासाच्‍या आत ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत डाव्‍या मांडीच्‍या मध्‍यभागी बाहेरील बाजुला
ओ.पी.व्‍ही. झिरो मात्रा जन्‍मतः, शक्‍य तितक्‍या लवकर, १४ दिवसापर्यंत २ थेंब तोंडावाटे तोंडावाटे
ओ.पी.व्‍ही. १,२ व ३ जन्‍मल्‍यानंतर ६, १० व १४वा आठवडा पूर्ण झाल्‍यावर २ थेंब तोंडावाटे तोंडावाटे
डी.पी.टी. १,२ व ३ जन्‍मल्‍यानंतर ६, १० व १४वा आठवडा पूर्ण झाल्‍यावर ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत उजव्‍या मांडीच्‍या मध्‍यभागी बाहेरील बाजुला
हिपॅटायटिस़्- बी १,२ व ३ जन्‍मल्‍यानंतर ६, १० व १४वा आठवडा पूर्ण झाल्‍यावर ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत डाव्‍या मांडीच्‍या मध्‍यभागी बाहेरील बाजुला
गोवर जन्‍मल्‍यानंतर ९ महिने पूर्ण झाल्‍यावर, १ वर्ष पूर्ण होण्‍याआधी ०.५ मि.ली. अधःत्‍वचेत उजव्‍या दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
जीवनसत्‍व- अ- १ जन्‍मल्‍यानंतर ९ महिने पूर्ण झाल्‍यावर, गोवर लसीबरोबर १ मि.ली. (१ आय.यू.) तोंडावाटे तोंडावाटे
बालकांसाठी
डी.पी.टी. बूस्‍टर १६ ते २४ महिने ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत उजव्‍या मांडीच्‍या मध्‍यभागी बाहेरील बाजुला
ओ.पी.व्‍ही. बूस्‍टर १६ ते २४ महिने २ थेंब तोंडावाटे तोंडावाटे
गोवर बूस्‍टर १६ ते २४ महिने ०.५ मि.ली. अधःत्‍वचेत उजव्‍या दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
जे.ई. १६ ते २४ महिने++ ०.५ मि.ली. अधःत्‍वचेत डाव्‍या दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
जीवनसत्‍व- अ- २ ते ९ १६ महिने, व नंतर प्रत्‍येक सहा-सहा महिन्‍याने ५ वर्षे पूर्ण होईपर्यंत+++ २ मि.ली. (२ आय.यू.) तोंडावाटे तोंडावाटे
डी.पी.टी. बूस्‍टर ५ ते ६ वर्षे ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत दंडाच्‍या वरच्‍या बाजुला
टी.टी. १० व १६ वर्षे ०.५ मि.ली. अंतःस्‍नायुत दंडाच्‍या वरच्‍या बाजुला

सेवा देणा-या संस्था्

जिल्हदयामध्यें लसीकरणाच्याी सेवा पुढील संस्थांकमध्ये् उपलब्धस असतात.

  • प्राथमिक आरोग्य् केंद्र
  • उपकेंद्र
  • ग्रामीण रुग्णालये
  • उपजिल्हा रुग्णालये
  • जिल्हा / स्त्रील रुग्णालये
  • नगरपालिका दवाखाने
  • कॅन्टोनमेंट रुग्णालये
  • महानगरपालिका रुग्णालये
  • वैदयकिय महाविद्यालय रुग्णालये
  • इतर शासकीय व निमशासकीय रुग्णालये
  • खाजगी मानांकित रुग्णायलये / दवाखाने
  • धर्मादाय व स्वयंसेवी रुग्णागलये / दवाखाने
  • संस्थेाच्या कार्यक्षेत्रात होणारी बाहयसंपर्क आरोग्यत सेवा सत्रे

इतर विभागांचा सहभाग

महिला व बालकल्‍याण विभाग तसेच शिक्षण विभाग व ग्रामीण विकास यंत्रणा विभाग

कामगिरी

 

स्त्रोत -सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate