Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 03:44:48.515872 GMT+0530
मुख्य / आरोग्य / योजना व कायदे / पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)
शेअर करा

T3 2020/01/27 03:44:48.520566 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 03:44:48.546705 GMT+0530

पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)

साधारणपणे देशातील विविध भागांत ही उपलब्धता व्हावी तसेच वैद्यकीय सेवांबाबतीत कमतरता असलेल्या राज्यांमध्ये दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी सुविधा विशेषत्वाने वाढवाव्यात यासाठी मार्च २००६मध्ये ही योजना मंजूर झाली.

उद्दिष्ट

पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे (पीएमएसएसवाय PMSSY) लक्ष्य आरोग्यसेवा पुरवणाऱ्या परवडण्याजोग्या सुविधा सर्वांना समान रीतीने उपलब्ध व्हाव्यात हे असून त्या मिळण्यात ज्या अडचणी येतात त्या दूर करणे हे आहे. साधारणपणे देशातील विविध भागांत ही उपलब्धता व्हावी तसेच वैद्यकीय सेवांबाबतीत कमतरता असलेल्या राज्यांमध्ये दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी सुविधा विशेषत्वाने वाढवाव्यात हेही उद्दिष्ट आहे. मार्च २००६मध्ये  ही योजना मंजूर झाली.

अमलबजावणी

पहिला टप्पा

पीएमएसएसवायच्या पहिल्या टप्प्याचे दोन घटक आहेत. ‘एम्स’च्या धर्तीवर सहा संस्थांची उभारणी आणि विद्यमान १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्थांची दर्जात्मक सुधारणा.

बिहार (पाटणा), छत्तीसगढ़ (रायपूर), मध्य प्रदेश (भोपाळ), ओरिसा (भुवनेश्वर), राजस्थान (जोधपूर) आणि उत्तरांचल (ऋषिकेश) या ठिकाणी ‘एम्स’च्या धर्तीवर सहा संस्थांची उभारणी केली जाईल, असा निर्णय योजनेत झालेला आहे. त्यासाठी प्रति संस्था रु. ८४० कोटी इतका खर्च नियोजित आहे. मानवविकास निर्देशांक, साक्षरतेचे प्रमाण, दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या व दरडोई उत्पन्न यांसारख्या विविध सामाजिक-आर्थिक निकषांद्वारे या राज्यांची निवड या सुविधेकरिता करण्यात आली आहे. तसेच यासाठी लोकसंख्या आणि रुग्णखाटांचे परस्परप्रमाण, गंभीर संसर्गजन्य रोग फैलावण्याचे प्रमाण, अर्भकमृत्यू दर असे आरोग्य निर्देशांकही लावले गेले. प्रत्येक वैद्यकीय संस्थेमध्ये ९६० रुग्णखाटांचे रुग्णालय (वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी ५०० खाटा; स्पेशालिटी/ सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी ३०० खाटा; अतिदक्षता/ अपघात विभागासाठी १०० खाटा; ३० खाटा या शरीरवैद्यक व पुनर्वसन तर ३० खाटा आयुषकरिता) याद्वारे ४२ स्पेशालिटी/ सुपरस्पेशालिटी शाखांमधील वैद्यकीयसुविधांची सेवा पुरवण्याचे लक्ष्य आहे. वैद्यकीय महाविद्यालयात पदवीसाठी १०० जागा असतील तसेच विविध शाखांमधील पदव्युत्तर/ डॉक्टरेट कोर्सेससाठीही सुविधा असतील. भारतीय वैद्यक परिषदेने ठरवून दिलेल्या (MIC) निकषांवर हे कोर्सेस (अभ्यासक्रम) आधारित असतील. त्याचबरोबर परिचारिका परिषदेच्या निकषांप्रमाणे परिचारिका महाविद्यालयही असेल. याच्या जोडीला १० राज्यांमधील १३ विद्यमान वैद्यकीय महाविद्यालय संस्थांमध्ये दर्जात्मक सुधारणेचेही लक्ष्य आहे. त्याकरिता प्रति संस्था रु. १२० कोटींचा (रु. १०० कोटी केंद्र सरकारकडून व रु. २० कोटी राज्य सरकारकडून) खर्च नियोजित आहे. या संस्था खालीलप्रमाणे-

१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जम्मू जम्मू काश्मीर
२. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, श्रीनगर जम्मू काश्मीर
३. कोलकत्ता वैद्यकीय महाविद्यालय, कोलकत्ता प. बंगाल
४. संजय गांधी वैद्यकशास्त्र पदव्युत्तर संस्था, लखनऊ उत्तर प्रदेश
५. वैद्यकशास्त्र संस्था, बनारस विश्वविद्यालय, वाराणसी उत्तर प्रदेश
६. निझाम वैद्यकशास्त्र संस्था, हैदराबाद तेलंगणा
७. सर वेंकटेश्वर वैद्यकशास्त्र संस्था ,तिरुपती आंध्र प्रदेश
८. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सेलम तामिळनाडू
९. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, अहमदाबाद गुजरात
१०. बंगलोर वैद्यकीय महाविद्यालय, बंगळुरू कर्नाटक
११. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , तिरुवनंतपुरम् केरळ
१२. राजेंद्र वैद्यकशास्त्र संस्था (RIMS), रांची झारखंड
१३. ग्रांट्स वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. रुग्णालय समूह ,मुंबई महाराष्ट्र

दुसरा टप्पा

पीएमएसएसवायच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एम्ससारख्या (AIIMS अखिल भारतीय वैद्यकशास्त्र संस्था) आणखी दोन संस्था स्थापन करण्याचा संकल्प सरकारने मंजूर केला आहे. या संस्था प. बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी एक अशा असतील. सहा वैद्यकीय महाविद्यालयांची दर्जात्मक सुधारणाही या टप्प्यात अंतर्भूत असून ती महाविद्यालये खालीलप्रमाणे-

१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमृतसर पंजाब
२. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टंडा हिमाचल प्रदेश
३. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मदुराई तामिळनाडू
४. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर महाराष्ट्र
५. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज ऑफ अलिगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगढ़ उत्तर प्रदेश
६. पं. भगवत दयाल शर्मा पदव्युत्तर वैद्यकशास्त्र संस्था, रोहतक हरियाणा<

एम्ससारख्या प्रत्येक संस्थेकरिता नियोजित खर्च रु. ८२३ कोटी आहे. वैद्यकीय महाविद्यालय संस्थांच्या दर्जासुधारणेकरिता केंद्र सरकार प्रत्येकी रु. १२५ कोटी देईल.

तिसरा टप्पा

पीएमएसएसवायच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या विद्यमान वैद्यकीय महाविद्यालय संस्थांची दर्जात्मक सुधारणा नियोजित आहे, त्या संस्था खालीलप्रमाणे-

1. सिद्धार्थ वैद्यकीय महाविद्यालय, विजयवाडा आंध्र प्रदेश
2. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , अनंतपुर आंध्र प्रदेश
3. गोहाटी वैद्यकीय महाविद्यालय, गोहाटी आसाम
4. आसाम वैद्यकीय महाविद्यालय, दिब्रुगड आसाम
5. श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय, मुझफ्फरपूर बिहार
6. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , दरभंगा बिहार
7. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, पणजी गोवा
8. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , राजकोट गुजरात
9. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, शिमला हिमाचल प्रदेश
10. पाटलीपुत्र वैद्यकीय महाविद्यालय, धनबाद झारखंड
11. विजयनगर वैद्यकीय विज्ञान संस्था, बेल्लारी कर्नाटक
12. कर्नाटक वैद्यकीय विज्ञान संस्था, हुबळी कर्नाटक
13. कोझिकोडे वैद्यकीय महाविद्यालय, कोझिकोडे केरळ
14. शासकीय टीडी वैद्यकीय महाविद्यालय, अलप्पुझा केरळ
15. श्याम शाह वैद्यकीय महाविद्यालय, रेवा मध्य प्रदेश
16. नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालय, जबलपूर मध्य प्रदेश
17. गजरा राजा वैद्यकीय महाविद्यालय, ग्वाल्हेर मध्य प्रदेश
18. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद महाराष्ट्र
19. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर महाराष्ट्र
20. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला महाराष्ट्र
21. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ महाराष्ट्र
22. एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय, बेरहामपूर ओडिशा
23. वीर सुरेंद्र साई (VSS) वैद्यकीय महाविद्यालय, बुरला ओडिशा
24. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला पंजाब
25. सरदार पटेल वैद्यकीय महाविद्यालय, बिकानेर राजस्थान
26. रवींद्रनाथ टागोर वैद्यकीय महाविद्यालय, उदयपुर राजस्थान
27. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोटा राजस्थान
28. तंजावर वैद्यकीय महाविद्यालय, तंजावर तामिळनाडू
29. तिरुनेलवेली वैद्यकीय महाविद्यालय, तिरुनेलवेली तामिळनाडू
30. राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, आदिलाबाद तेलंगाना
31. काकतिया वैद्यकीय महाविद्यालय, वारंगल तेलंगाना
32. आगरतळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्रिपुरा त्रिपुरा
33. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, झांसी उत्तर प्रदेश
34. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोरखपूर उत्तर प्रदेश
35. मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, अलाहाबाद उत्तर प्रदेश
36. लाला लाजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेज, मेरठ उत्तर प्रदेश
37. बांकुरा संमिलानी मेडिकल कॉलेज पश्चिम बंगाल
38. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मालदा पश्चिम बंगाल
39. उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालय, सिलिगुडी, दार्जिलिंग पश्चिम बंगाल

प्रत्येक संस्थेच्या दर्जासुधारणेकरता प्रकल्पखर्च रु. १५० कोटी अंदाजित असून त्यापैकी रु. १२० कोटी केंद्र सरकार देईल आणि उर्वरित रु. ३० कोटी त्या त्या राज्य सरकारांनी उभे करायचे आहेत.

चौथा टप्पा

केंद्रीय मंत्रिमंडळाने 03.08.2016 रोजी खालील आणखी 13 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्थांना मंजुरी दिली आहे

१. पाटणा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, पाटणा बिहार
२. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भागलपूर बिहार
३. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गाय बिहार
४. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बिलासपुर छत्तिसगढ
५. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जगदलपुर छत्तिसगढ
६. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स - जीटीबी रुग्णालय दिल्ली
७. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुरत गुजरात
८. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भावनगर गुजरात
९. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदोर मध्य प्रदेश
१०. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कट्क ओडिशा
११. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जयपूर राजस्थान
१२. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आग्रा उत्तर प्रदेश
१३. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कानपूर उत्तर प्रदेश

प्रत्येक संस्थेसाठी प्रकल्पखर्च रु. २०० कोटी अंदाजित असून त्यापैकी रु. १२० कोटी केंद्र सरकार देईल आणि उर्वरित रु. ८० कोटी त्या त्या राज्य सरकारांनी उभे करायचे आहेत

 

स्रोत : प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, भारत सरकार

3.05769230769
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Related Languages

T5 2020/01/27 03:44:48.884398 GMT+0530

T24 2020/01/27 03:44:48.891073 GMT+0530
Back to top

T12020/01/27 03:44:48.445776 GMT+0530

T612020/01/27 03:44:48.465060 GMT+0530

T622020/01/27 03:44:48.505689 GMT+0530

T632020/01/27 03:44:48.506414 GMT+0530