অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतर आजार

इतर आजार

  • अंकुशकृमि रोग
  • तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी’ असे म्हणतात. या कृमीमुळे मनुष्याला होणाऱ्‍या रोगाला अंकुशकृमी रोग म्हणतात. हा रोग उष्णकटिबंधात जास्त प्रमाणात आढळतो.

  • अंधत्व 
  • पदार्थाचे रूप, आकार व रंग यांचे ज्ञान दृष्टीमुळे होते. तसे ते मुळीच होत नसल्यास त्या अवस्थेला ‘अंधत्व’ म्हणतात. दृष्टिदोष आणि डोळ्याचे शारीर व शरीरक्रियाविज्ञान यांचे वर्णन डोळा, नेत्रवैद्यक व दृष्टी या शीर्षकांखाली केलेले आहे.

  • अपायिता
  • दहा दिवसांपेक्षा अधिक अवधीनंतर तोच बाह्य पदार्थ दुसऱ्‍या वेळी शरीरात टोचला असताना एखाद्या वेळी जीðअवसादासारखी (शॉकसारखी) तीव्र अवस्था उत्पन्न होते, तिला ‘अपायिता’ असे म्हणतात.

  • अभिकोथ
  • अवयवातील रोहिणीचा आकस्मिक रोध झाला तर रक्तपुरवठा थांबल्यामुळे तेथील ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांचा) मृत्यू होतो, त्या अवस्थेला ‘अभिकोथ’ असे म्हणतात.

  • अभिघात
  • शरीरातील ऊतकांना (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांना) हानिकारक अशा बाह्य शक्तींचा संबंध शरीराशी आल्याने होणाऱ्या परिणामास‘अभिघात’ म्हणतात.

  • अम्‍लपित्त
  • आंबट ढेकरा येणे, घशाशी जळजळ होऊन आंबट ओकारी होणे या अर्थी ‘अम्‍लपित्त’ ही संज्ञा वापरतात.

  • अस्बेस्तोस प्रदर्शनासह कर्करोग होऊ शकते
  • नैसर्गिकपणे येणार्या तंतुमय गारगोटी खनिजला अस्बेस्तोस हे नाव दिलेले आहे जे त्यांच्या उपयुक्त गुणधर्म आहेत जसेकी थर्मल पृथक् रासायनिक आणि थर्मल स्थिरता,

  • अस्वच्छता व मलिनतेचा परिणाम म्हणजे जंतांचा प्रादुर्भाव
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील जवळपास 68 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतांमुळे होतो.

  • आक्षेपी विकार
  • शरीरातील स्नायू ताठ होऊन त्यांचे प्रचंड, अनियंत्रित व अंगग्राही आकुंचन व प्रसरण झाल्यामुळे सर्व शरीराला झटके बसतात, त्या अवस्थेला आक्षेप असे म्हणतात. त्यालाच आचके, आकडी किंवा झटके असेही म्हणतात.

  • आत्मप्रतिरक्षा रोग
  • शरीराच्या प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक) प्रणालीमध्ये प्रामुख्याने रक्तातील पांढर्‍या पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.

  • आमांश
  • बृहदांत्राच्या श्लेष्मकलेच्या शोथामुळे होणाऱ्या व पोटात मुरडा होऊन वारंवार श्लेष्मा व रक्तमिश्रित मलोत्सर्ग ही लक्षणे असलेल्या रोगाला आमांश, प्रवाहिका किंवा आमातिसार असे म्हणतात.

  • आरक्त चर्मक्षय
  • आरक्त चर्मक्षय : (त्वचाक्षय). त्वचेतील संयोजी ऊतकाला (समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहाला) शोथ (दाहयुक्त सूज) येऊन जी विकृती होते तिला आरक्त चर्मक्षय किंवा त्वचाक्षय असे म्हणतात.

  • आलर्क रोग ( Rabies)
  • आलर्क हा मानवाला आणि सस्तन प्राण्यांना विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होणारा एक संसर्गजन्य, जीवघेणा रोग आहे. काही प्राण्यांच्या (उदा., कुत्रा, मांजर इ. ) चावण्यामुळे या रोगाचे विषाणू लाळेतून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात.

  • इंटरफेरॉने
  • प्रयोगांकरिता वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात एकदा विषाणू [→ व्हायरस] टोचल्यानंतर जर त्यांना दुसऱ्या वेळी विषाणुबाधा झाली तर पोषक कोशिकांमध्ये (शरीराच्या सूक्ष्म घटकांमध्ये) संरक्षण शक्ती तयार असलेली आढळून येते.

  • इन्फल्युएंझा ए.एच. १ एन १
  • स्‍वाईन फल्‍यू या नावाने ओळखला जाणारा हा आजार २००९ मध्‍ये साथस्‍वरुपात जगभर पसरला. हिवाळा आणि पावसाळ्यात या रोगाचे रुग्ण प्रामुख्याने आढ्ळतात.

  • इन्फ्ल्यूएंझा ( Influenza )
  • इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते.

  • उन्हाळे लागणे
  • उन्हाळे लागणे : वेदनायुक्त, वारंवार आणि थेंबथेंब मूत्रोत्सर्ग होणे, मूत्रमार्गाची आग होणे या लक्षणांच्या समुच्चयाला उन्हाळे लागणे असे म्हणतात.

  • उपदंश
  • उपदंश : ट्रिपोनेमा पॅलिडम या रंगविहीन मळसूत्राकार जंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या सार्वदेहिक रोगाला‘उपदंश’, ‘गरमी’, अथवा ‘फिरंग रोग’ असे म्हणतात. या रोगाचा संसर्ग मुख्यत्वे संभोगाद्वारे होतो. हा रोग पाश्चात्य देशांतून भारतात आला.

  • उष्णकटिबंधी रोग
  • उष्णकटिबंधी रोग : पृथ्वीच्या उष्णकटिबंधामध्ये विशेष प्रमाणात आढळणाऱ्या रोगांना उष्णकटिबंधी रोग असे म्हणतात.

  • उष्णताजन्य विकार
  • वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे होणार्‍या विकारांना उष्णताजन्य विकार असे म्हणतात. हे विकार साहजिकच उष्णकटिबंधात अधिक प्रमाणात दिसतात.

  • उसण
  • मानेतील आणि पाठीतील स्नायुतंतू अकस्मात आखडले गेल्यामुळे त्यांना जी इजा होते तिला 'उसण' असे म्हणतात. जड वजन उचलणे, थंडी, गारठा, स्नायूंचे अनपेक्षित आणि अकस्मात आकुंचन यांमुळे उसण भरते.

  • ऊतकक्रामी संसर्ग रोग
  • ट्रिकिनेला स्पायरॅलिस नावाच्या गोलकृमीची अळी-अवस्था स्‍नायूपर्यंत पोहोचून तिथे कवचयुक्त होऊन राहते, त्या पुटीमय अवस्थेला ऊतकक्रामी संसर्ग रोग (ट्रिकिनोसीस) म्हणतात.

  • ऊष्माघात ( Sun stroke )
  • शरीरातील उष्णतानियमनाच्या कार्यात बिघाड झाल्यास उद्भवणारी एक स्थिती. उच्च तापमानाच्या सान्निध्यात खूप वेळ राहिल्यास वा शरीरात खूप उष्णता निर्माण झाल्यास अशी स्थिती उद्भवते. शरीराचे तापमान विशिष्ट मर्यादेत राखणारी यंत्रणा काही सजीवांमध्ये असते.

  • ओकारी
  • ओकारी : जठरातील पदार्थ परत तोंडावाटे जोराने फेकले जाण्याच्या क्रियेला वमन, उलटी, वांती किंवा ओकारी असे म्हणतात. हे पदार्थ तोंडावाटे फेकून देताना ‘ओ’ म्हटला जातो म्हणून त्याला ओकारी हे नाव पडले असावे.

  • कंपवात
  • कंपवात : उतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या, कंप, स्‍नायूंच्या ताठरपणा, अशक्तता, विशिष्ट तऱ्हेची चालण्याची पद्धत ही लक्षणे असलेल्या रोगाला कंपवात असे म्हणतात.

  • कंपवात ( Parkinson's disease)
  • मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे.

  • कणकोशिकान्यूनत्व
  • या रोगाच्या तीव्र प्रकारात एकूण श्वेतकोशिकांची संख्या दोन हजारपर्यंतही उतरते व त्यांतील कणकोशिकांचे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत कमी होते.

  • कर्करोग (Cancer)
  • अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो.

  • कवकसंसर्ग रोग
  • कवकांमुळे मानवात दोन प्रकारचे रोग होतात. एक स्थानिक स्वरूपाचा असून त्यामुळे त्वचा, नखे व केश-पुटक या ठिकाणी रोगोत्पत्ती होते व दुसरा सार्वदेहिक असून शरीरातील विविध अवयवांत व घटकांत रोगोत्पत्ती होते.

  • काँगो हिमोरेजीक फिवर
  • क्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवर(CCHF)हा विषाणूजन्‍य असून तो गोचिडा पासून संक्रमित होतो.अलिकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्‍वरुपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत .

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate