Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:16:9.970828 GMT+0530
मुख्य / आरोग्य / रोग व आजार / सामान्य समस्या / तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
शेअर करा

T3 2019/10/14 07:16:9.976513 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:16:10.007440 GMT+0530

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम

तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात.

तंबाखूमुळे कँसर (कर्करोग) होऊ शकतो

तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात.

तथ्य आधार

 • भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कँसर (कर्करोग) असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे.
 • भारतात, ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.
 • ९०% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्‍सर आणि इतर कँसर होण्‍याचे कारण धूम्रपान आहे.

तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्‍यांचे विकार

तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्‍यांचे विकार, ह्दयरोग, छातीत दुखणे, हदयविकाराच्‍या झटक्‍यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक (मेंदूचा विकार), परिधीय संवहनी रोग (पायाचा गैंग्रीन) हे रोग होतात.

तथ्य आधार

 • भारतात ८2 % फुफ्फुसाच्‍या दीर्घकालीन रोगांचे कारण धूम्रपान हे आहे.
 • तंबाखू हे क्षयरोग होण्‍याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणा-यांमध्ये देखील टीबी, ३ पट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बीड़ीचे धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते.
 • धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते.
 • ह्यामुळे पायाकडे होणा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गैंग्रीन होऊ शकते.
 • तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्‍यांच्‍या पापुद्र्याला नुकसान पोहचवते.
 • मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्‍या इतर सदस्यांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो. धूम्रपान न करणारा पण २ पाकिट रोज धूम्रपान करणा=या बरोबर राहिल्यास, न करणा-यास रोज ३ पाकिट धूम्रपान करणा-या इतका त्रास होतो, हे लघवीच्या निकोटिनच्या पातळीचा अभ्यास करता आढळून आले.
 • तंबाखू किंवा धूम्रपानामुळे मधुमेह होण्‍याची शक्यता जास्त बळावते.
 • तंबाखू मुळे रक्तातील चांगले कोलॅस्ट्राँलचे प्रमाण कमी होते.
 • धूम्रपान करणारे/तंबाखू सेवन करणारे यांच्यात, धूम्रपान न करणा-यांच्या तुलनेत हृदय रोग व पक्षाघात होण्याचा धोका 2 ते 3 पट अधिक वाढतो.

तंबाखूमुळे दर 8 सेकंदाला 'एक' मृत्यु घडतो.

तथ्य आधार

 • भारतात, तंबाखू संबंधित मृत्‍युची एकूण संख्या दर वर्षी ८00000 ते ९00000  इतकी असेल.
 • तंबाखूपासून दूर राहिल्यास एक किशोर/किशोरीचा जीवनकाळ 20 वर्षाने वाढू शकेल.
 • तंबाखूचा वापर करणारे किशोर/किशोरी अंततः यामुळे मृत्‍युमुखी पडतील.(जवळजवळ एक चतुर्थांश मध्य आयुष्यात किंवा एक चतुर्थांश म्हातारपणात)
 • भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दरवर्षी वाढत असल्‍याचा अंदाज आहे.

धूम्रपान / तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात.

 • याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे
 • धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते.
 • धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.
 • ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.
 • ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो. (अचानकपणे झालेला अनाकलित मृत्यु)

तंबाखू सोडण्याचे फायदे

तंबाखू सोडण्याचे काही शारीरिक तसेच सामाजिक फायदे आहेत. ते पुढीलप्रमाणे :

शारीरिक फायदे

 1. तुमच्यातील कँसर वा हदयरोग होण्याचे धोके कमी होतात.
 2. हदयावर येणारा दाब कमी होतो.
 3. तुमच्या धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास तुमच्या आपल्यांवर होणार नाही.
 4. तुम्हाला धूम्रपानामुळे होणारा खोकला (सारखा होणारा खोकला व कफ) नाहीसा होईल.
 5. तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.

सामाजिक फायदे

 • तुम्ही स्वतः नियंत्रक व्हाल, सिगारेट तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही.
 • तुमची आत्‍म-शक्ती तथा आत्मविश्वास वाढेल.
 • आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक (पिता/माता) बनाल.
 • तुमच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा असेल.

धूम्रपान सोडण्यासाठी कधी ही उशीर झालेला नसतो

 • धूम्रपान/तंबाखू सोडणे वा थांबवणे हे वयाच्या मध्यान्हात कर्करोग होण्यापूर्वी देखील होवू शकते किंवा तंबाखूमुळे इतर भयंकर रोग बळावण्या आधी, जेणेकरुन भविष्यातली मरणाची भीती नाहीशी होईल.
 • किशोर अवस्थेत सोडल्यास त्याचे फायदे जास्त पहायला मिळतात.
 • तुम्‍ही एकदा का तंबाखूचे सेवन थांबवले की हदयविकाराचा धोका ३ वर्षात तंबाखूचे सेवन न करणा-यासारखा सामान्य होतो.

धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी युक्त्या

 1. ऐशट्रे, सिगरेटी, पान, ज़र्दा लपवून ठेवा, जे नजरेसमोर नसते ते आठवत पण नाही. हा एक सोपा, परंतु सहाय्यक उपाय आहे.
 2. सिगरेटी, पान आणि ज़र्दा लवकर मिळतील अशा ठेवू नका. सिगरेटी, पान आणि ज़र्दा अशा जागी ठेवा जेथून तुम्हाला काढणे वा सापडणे अवघड पडेल. उदाहणार्थ, दुस-या खोलीत, किंवा तुम्ही नेहमी जात नाही अशा जागी, कुलुपाच्या कपाटात इ.
 3. धूम्रपान करण्यासाठी प्रेरीत करणा-या कारणांना ओळखा किंवा त्या ऐवजी पान खा / जर्दा खा आणि दुसरे उपाय शोधा.
 4. तुमचा कंपू किंवा गट, सिगरेटी, पान, ज़र्दा खातो कां ? असे असल्यास पहिल्यांदा त्यांना टाळायचा प्रयत्न करा किंवा ते जेव्हा, सिगरेटी, पान, ज़र्दा खात असतील तेव्हा त्यांच्या पासून दूर व्हा.
 5. तोंडात च्‍यूइंगम, चॉकलेट, पे‍परमिंट, लॉज़ेंजेस  ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
 6. जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते.
 7. जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखूमुळे होणा-या भयंकर रोगांचा विचार करा.
 8. सेवन थांबवण्याची एक तारीख ठरवा.
 9. मदतनीसाची मदत घ्या.
 10. तुमचे वेळा-पत्रक सिगरेट, पान, ज़र्दा सोडून आखा.
 11. जेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा ४ गोष्टी लक्षात ठेवा
  १. काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा    २. दोन सिगरेट पिण्यामध्ये विलम्ब करा
  ३. दीर्घ श्वास घ्या.                    ४. पाणी प्या
 12. स्‍वतःसाठी सकारात्मक बोला
 13. स्वतःला पुरस्कृत करा.
 14. दररोज आरामाच्या तंत्रांचा वापर करा जसे (योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत इत्यादी).
  कॅफीन आणि अल्कोहलचे सेवन सीमित करा.
 15. या व्यतिरिक्त, सक्रिय बना आणि पोषक आहार घ्या !
 16.  

  स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

3.15267175573
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
Anil Jun 14, 2019 04:49 PM

आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार, मी दररोज तंबाखू खातो पण यापुढे मी तंबाखू कमी कमी करून सोडेल
Thanks ☺☺☺👍

KJ THE BOSS May 10, 2019 06:43 AM

4दिवस झाले सोडून नक्कीच सोडतो तंबाखू जिद्द आहे माझी

❤pyara dil❤ Jun 25, 2018 06:58 PM

आपन दिलेली माहीती खुप छान आहे.मि हे वाचुन तंबाखू पासून मुक्त झालो.1 वष्रे पूर्ण🙋🙅👪👬💪❤💙💓👆👌

SHRIKANT डिकले Feb 03, 2018 06:52 AM

आपण ही माहिती उपलब्ध करून दिली आहे
आपला हा समाज ऋण फेडण्याचा छान प्रयत्न आहे
ही माहिती मी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार

साईनाथ कपाले Jan 10, 2018 10:44 PM

मी तंम्बाखु मुळे माझी सहनशिलता हारावुन गेलो आहे.त्यामुळे मी आज दिनांक १०/०१/२०१८.रोजी राञी १०:५७:०४ मि.तंम्बाखु सोडत आहे...गुड बाय तंम्बाखु,..

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:16:10.310005 GMT+0530

T24 2019/10/14 07:16:10.317030 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:16:9.907278 GMT+0530

T612019/10/14 07:16:9.926314 GMT+0530

T622019/10/14 07:16:9.960265 GMT+0530

T632019/10/14 07:16:9.961067 GMT+0530