অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परजीवी कृमी संक्रमण

परजीवी कृमी संक्रमण यालाच सूत्रकृमी संक्रमण असेही म्हणतात.

विवरण

  1. परजीवी हे असे प्राणी असतात जे मूळ जीवाच्या शरीरात शिरतात, स्वतःला बाहेरुन तसंच आतून चिटकवून घेतात (ऊती आणि अवयवांना), आणि त्या जीवाच्या शरीरातून पोषकद्रव्य शोषून घेतात.
  2. कृमी (सूत्रकृमी) हे लांब, उघडे, आणि हाडंविरहीत प्राणी असतात जे आपली पिल्लं अंडी किंवा सिस्ट मधून अळीच्या (नव्यानं जन्मलेले कृमी) स्थितीत पाठवतात, नंतर ते ज्या ऊतीला प्रभावित करतात तिथे वाढतात, जसे, त्वचा, स्नायू, फुफ्फुसं किंवा आंतडे (आंत्र, किंवा पाचन नलिका)

लक्षणे

कृमींच्या मुक्कामाच्या ठिकाणावर आधारित, लक्षणं

  1. काहीच लक्षणं नाहीत किंवा थोडी लक्षणं
  2. लक्षणं ही लगेच दिसतात किंवा 20 वर्षांहून अधिक काळ घेतात.
  3. काहीवेळा कृमी हे पूर्णतः किंवा तुकड्यांमधे मलाव्दारे बाहेर टाकले जातात.
  4. पाचन नलिकेत (पोट, आंतडे, यकृत, बृहदांत्र, आणि गुदव्दार) कृमी असल्यास, ओटीपोटात वेदना, अशक्तपणा, अतिसार, भूक कमी लागणे, वजन कमी होणे, उलट्या, कुपोषण - ब 12 जीवनसत्व, खनिजं (लोह), चरबी आणि प्रथिनांच्या कमतरतेसह.  गुदद्वार आणि गुप्तांगाच्या आसपास खाजणे, झोप न लागणे, बिछान्यात लघवी होणे, आणि ओटीपोटात वेदना.
  5. त्वचा उकलणे, द्रव भरलेले फुगीर उंचवटे, चेह-यावर विशेषतः डोळ्यांभोवती भरपूर सूज.
  6. अलर्जीक प्रतिक्रीयाः त्वचेवर पुरळ येणे, त्वचा खाजणे आणि गुदद्वाराच्या आसपास खाजणे.
  7. यकृताची लक्षणे – वाढलेले नाजूक  झालेले यकृत, ताप, ओटीपोटात वेदना, अतिसार, पिवळी त्वचा
  8. लसीकांवर प्रभाव – सुजलेले हत्तीसारखे पाय किंवा वृषण

कारणे

  1. ऊती सूत्रकृमी किंवा गोल कृमी : आंतड्यातील सूत्रकृमी जंत होणे (गोल कृमी) जंताच्या विष्ठेत याची अंडी सापडतात आणि दूषित माती किंवा भाज्यांव्दारे चुकून ती माणसांच्या पोटात जातात.  हे जंत आतड्यात वाढू शकतात आणि रक्ताव्दारे इतर ठिकाणी स्थलांतरित होतात, जसे की फुफ्फुसं.  ते 40 सेंटीमीटर लांबीपर्यंत वाढू शकतात.
  2. चपटे कृमी : हे कृमी अनेक तुकड्यांचे बनलेले असतात.  ते सामान्यतः पाचन नलिकेत घुसतात, जिथे त्यांना मूळ शरीरातून पोषक अन्न मिळतं.
  3. हत्तीरोग : यामधे अनेक प्रकारचे कृमी असतात जे त्वचा तसंच पायांच्या ऊतींमधे शिरकाव करतात.

धोक्याचे घटक

  1. पाण्याचे मलामुळं होणारं प्रदूषण
  2. अस्वच्छ स्थिती
  3. कच्चं किंवा कमी शिजवलेलं मांस किंवा मासे खाणं
  4. जनावरांना अस्वच्छ स्थितींच्या जवळ ठेवणं
  5. उंदीर किवा कीटकांचा उपद्रव
  6. कुपोषित किंवा रोगिष्ट व्यक्ती
  7. डास किंवा माशांचा उपद्रव
  8. खेळण्याची मैदानं जिथं मुलं अन्नपदार्थ खातात किंवा मातीच्या संपर्कात येतात

साधे उपाय

  1. द्रवपदार्थ
  2. विश्रांती
  3. कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करुन उपचार करावेत
  4. उपचार पूर्ण होईतोवर आतले कपडे, कपडे आणि चादरी गरम पाण्यात धुवावेत.
  5. हात वारंवार धुवावेत, कमी शिजवलेले किंवा कच्चे अन्न टाळावे, भाज्या आणि फळे धुवून घ्यावीत आणि पाणी पिण्यापूर्वी उकळून घ्यावे.

 

स्त्रोत: पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate