Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/01/19 16:19:42.450651 GMT+0530
शेअर करा

T3 2019/01/19 16:19:42.455687 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/01/19 16:19:42.480557 GMT+0530

रक्तगट

रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत.

रक्ताचे प्रमुख गट

रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत. या ए, बी घटकांशिवाय 'आर-एच' नावाचा एक घटकही सुमारे 85 टक्के व्यक्तींत असतो. अशा व्यक्तींच्या रक्तगटाला + (पॉझिटिव्ह) म्हणतात. ज्या व्यक्तींत हा घटक नसतो त्याला - (निगेटिव्ह) म्हणतात. मराठीत धन (+) व ऋण (-) असे शब्द वापरता येतील.एखाद्याचे रक्त चालणे किंवा न चालणे म्हणजे काय हे आता समजावून घेऊ या. रक्तात एखादा पदार्थ गेला की त्यावर प्रथिनांच्या कणांचा हल्ला होतो हे आपण शिकलो आहोत. या न्यायाने A गटाच्या व्यक्तीस B गटाचे रक्त दिल्यास B पदार्थावर हल्ला होईल. कारण निसर्गतः A गटाच्या व्यक्तीत B घटक सापडत नाही. सुरुवातीस हे काही प्रमाणात खपून जाते. नंतर मात्र अशी चूक झाल्यास वरीलप्रमाणे मोठा घोटाळा होतो. हे आपण पुढच्या विवेचनात पाहणार आहोत.

म्हणून सर्वसाधारणपणे रक्त द्यायचे झाल्यास त्याच एका गटाचे रक्त चालते. उदा. ए + (पॉझिटिव्ह) व्यक्तीला रक्त द्यायचे असल्यास ए + लागते. B+ve व्यक्तीला B+ve रक्त चालते. दुसरे रक्त दिल्यास रक्तात गाठी होऊन मृत्यू येऊ शकतो.

ओ - रक्तात कोठलाच घटक नसतो. त्यामुळे हे रक्त कोणालाही दिले तर चालते.

कोणत्या गटाचे रक्त कोणत्या रक्तगटास चालते

व्यक्ती कोणत्या गटाचे रक्त चालते

A+ A+ve किंवा O+ve किंवा O-ve

B+B+ve किंवा O+ve किंवा O-ve

AB+ A, B, AB O+ve किंवा O-ve

O+ O+ O-ve

O O- फक्त O-ve

व्यक्ती कोणाचे चालते

A- A-ve किंवा O-ve

B- B-ve किंवा O-ve

AB- AB- किंवा O-ve

'एबी पॉझिटिव्ह' या व्यक्तीला कोणाचेही रक्त चालते.

हे दोन अपवाद सोडल्यास सर्वसाधारणपणे विशिष्ट गटाचे रक्तच द्यावे लागते. काही गटांचे रक्त (उदा. ए-) दुर्मिळ असते.

पूर्ण रक्त गरज

शस्त्रक्रिया, रक्तस्राव याप्रसंगी पूर्ण रक्त दिले जाते. मात्र हल्ली पूर्ण रक्त क्वचितच द्यावे लागते.

केवळ लाल रक्तपेशी (पॅकड् रेड ब्लड सेल)

रक्तपांढरीत रक्त देण्याची गरज असेल तर हे वापरतात. यात द्रवपदार्थ नसतो. तो आधीच वेगळा काढलेला असतो. तो इतर रुग्णांना उपयोगी असतो. केवळ रक्तपेशी दिल्याने हृदयावर जादा दाब येत नाही हा फायदा असतो.

रक्तकणिका (प्लेटलेट)

काही आजारांमध्ये रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. डेंगू ताप, बाळंतपणातला रक्तस्राव, इ. साठी केवळ रक्तकणिका वापरल्या जातात. यामुळे दोन-तीन तासात रक्तस्रावाची प्रवृत्ती दुरुस्त होते. अर्थात यासाठी एक पॅक पुरत नाही, गरजेप्रमाणे जादा द्यावे लागतात.

ताजा रक्तद्रव (प्लाझ्मा)

याची गरज काही विशिष्ट आजारांमध्ये असते.

आर-एच गट व गर्भनाश

आर-एच रक्तगटाचे एक विशेष महत्त्व आहे.

आई आर एच (-) आणि पिता आर.एच (+ve) असेल तर २०% बाळे ही आईच्या गटाची असतील व ८०% बाळांचा गट हा वडिलांसारखा असेल.

आई व बाळाचा गट एक असेल तर बाळाला धोका नसतो. पण जर आई व बाळाचा रक्तगट विरुध्द असतील म्हणजे बाळ आर.एच (+ve) असेल तर पहिल्या बाळंतपणात सूक्ष्म प्रमाणात आई व बाळाचे रक्त एकमेकांत मिसळते. यामुळे आईच्या रक्तात आर एच घटका विरुध्द प्रतिघटके तयार होतात.

पुढच्या बाळंतपणातही जर बाळ विरुध्द गटाचे असेल तर ही प्रतिघटके बाळाला गर्भातच त्रास देतात. हा गर्भ पोटातच मरुन जाण्याची शक्यता असते. पूर्ण वाढ होऊन जन्म झाला तर पहिल्या काही तासांत गंभीर कावीळ होऊ शकते. तसेच बाळाचा रक्तनाश होण्याचाही धोका असतो. म्हणून गर्भारपणात आईचा रक्तगट तपासणे महत्त्वाचे असते. जर आई आर एच (-) असेल तर बाळाच्या जन्मानंतर लगेच बाळाचा रक्तगट तपासणी करतात. जर बाळ आर.एच (+ve) असेल तर पुढील बाळाला त्रास होऊ नये म्हणून पहिल्या 24 तासात आईला 'ऍन्टी डी' चे इंजेक्शन द्यावे लागते. हे इंजेक्शन खूपच महाग असते. (सुमारे 1500 ते 1600रु.) व सध्यातरी सरकारी इस्पितळात मिळत नाही. पण जर आईच्या रक्तात आर एच रक्ताविरुध्द प्रतिज्घटके तयार झाली तर प्रत्येक आर.एच (+ve) बाळाला गंभीर धोका होऊ शकतो.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

 

3.0987654321
रंजना आकरे Feb 05, 2018 11:59 PM

जर आई वडील बी+ असतील तर बाळ o+ होऊ शकत का? व कस

देवा Jan 30, 2018 08:10 AM

जर मुलगा A+ आणि मुलगी पण A+ असेल तर काय प्रॉब्लेम येतो का

मयुर Aug 09, 2017 05:38 PM

दोघाचे रक्त गटB+ असेल तर

‍डी कुमार Jun 14, 2017 10:05 AM

वडीलांचा रक्त गट ए निगेटीव व आई चा रक्त गट ए पॅझीटीव असेल तर गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते काय?

गजु Apr 11, 2017 11:20 PM

जर माता ABनिगेटिव असेल पिता A (+ve ) बालक कोणत्या गटाचे असेल

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/01/19 16:19:42.710096 GMT+0530

T24 2019/01/19 16:19:42.717428 GMT+0530
Back to top

T12019/01/19 16:19:42.369487 GMT+0530

T612019/01/19 16:19:42.386948 GMT+0530

T622019/01/19 16:19:42.439633 GMT+0530

T632019/01/19 16:19:42.440557 GMT+0530