অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शरीरातले पाणी

शरीरातले पाणी

शरीरात निम्म्यापेक्षा अधिक वजन पाण्याचेच असते. सर्व पेशींमध्ये आणि पेशींबाहेर पाणी असते. त्यात काही क्षार व इतर पदार्थही असतात. शरीरातील अनेक क्रियांना पाणी लागते. शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यासाठीही पाणी लागते. याची भरपाई करण्यासाठी आपल्याला तहान लागते. पाणी प्यायल्यावर जठर व आतडयातून ते रक्तप्रवाहात शिरते. इथून ते  सर्व भागात पोचवले जाते.

शिरेतून दिले जाणारे सलाईन म्हणजे पाणी व ठरावीक प्रमाणात मीठ असते. गरजेप्रमाणे इतरही क्षार व ग्लुकोज साखर सलाईनमध्ये घातलेले असतात, त्यानुसार त्यांची नावे वेगळी असतात.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate