आपला महाराष्ट्र देशातले एक प्रगत राज्य आहे. देशाच्या नकाशात जसे ते मधोमध आहे तसेच देशाच्या आरोग्याच्या नकाशातही मधोमध आहे. दक्षिणेकडील राज्ये म्हणजे केरळ, तमीळनाडू, कर्नाटक, गोवा हे महाराष्ट्रापेक्षा आरोग्याच्या ब-याच बाबतीत पुढारलेले आहेत. मात्र उत्तर भारतातली पंजाब सोडून अनेक राज्ये महाराष्ट्राच्या मानाने आरोग्यात मागासलेली आहेत. परंतु महाराष्ट्राची आकडेवारी ही शहरी लोकसंख्येमुळे थोडी सुधारलेली दिसते. जर शहर आणि खेडे अशी तुलना केली तर मुंबई, पुणे वगैरेपेक्षा ग्रामीण आरोग्याची स्थिती बरीच खराब आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 50% लोकसंख्या शहरी असल्याने आपली एकूण आकडेवारी चांगली दिसते. मात्र आपल्या ग्रामीण भागातले आरोग्य देशातल्या इतर प्रांतांसारखेच आहे. महाराष्ट्रात देशातले सगळयात जास्त डॉक्टर्स आणि परिचारिका आहेत. याचे कारणही मुंबई-पुणे-नागपूर या शहरांमध्ये एकवटलेल्या आरोग्यसेवा.
ग्रामीण महाराष्ट्राचे आरोग्य सुधारल्यास महाराष्ट्राची प्रगती जास्त उठून दिसेल. विभागवार पाहिल्यास पश्चिम महाराष्ट्र व कोकण आरोग्याच्या बाबतीत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यापेक्षा जास्त आरोग्यसंपन्न आहेत. ग्रामीण भागात देखील आदिवासी विभागांची आरोग्याची परिस्थिती इतर ग्रामीण भागापेक्षा जास्त बिकट आहे. या पुस्तकात मानव विकास निर्देशांकाची जिल्हावार आकडेवारी दिली आहे. त्यावरून कोणते जिल्हे मागास आहेत हे आपल्याला कळू शकते. राष्ट्रीय कुटुंब पाहणीनुसार प्रांतोप्रांतीची 2005-06 ची आकडेवारी उपलब्ध आहे. यात मुख्यत: प्रजननविषयक आकडेवारी असते. खाली राष्ट्रीय कुटुंब पाहणीचे (3री फेरी) महाराष्ट्राचे निष्कर्ष थोडक्यात दिले आहेत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...