অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मारझोड कशी ओळखावी ?

मारझोड कशी ओळखावी ?

बाई मारहाण लपवत असली तरी ती ओळखून काढणे हे आवश्यक आहे. आरोग्य कार्यकर्ते किंवा शेजारी-पाजारी हे काम करू शकतात.

  • एखादी बाई अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, इत्यादी 'दुखी' घेऊन नेहमीनेहमी दवाखान्यात येत असेल (अशावेळी कारण म्हणून त्या बहुतेक असे सांगतात - काम करताना पडले, खूप काम करावे लागते, ताप, इ.)
  • जखम झाल्यावर 1,2,3 दिवसांनी उपचारासाठी येणारी बाई ! कदाचित मारझोडीमुळे ही जखम झाली असेल. त्यादिवशी तिला येऊ दिले नसेल किंवा संध्याकाळ-रात्र झाल्यामुळे ती बाहेरच पडली नसेल. 'जुनी जखम' ही महत्त्वाची खूणगाठ लक्षात ठेवा. उपचारासाठी एवढा उशीर का केला असे विचारले तर ती बहुधा काहीतरी उत्तर देईल - (वेळ मिळाला नाही, पाळी आलेली होती, मुलांच्या शाळा, शेतात तातडीचे काम होते वगैरे वगैरे)
  • मुकामार/जखम, ती पण अशा ठिकाणी की पडल्यामुळे तिथे लागू शकत नाही. पडल्यामुळे होणा-या जखमा गुडघे, छाती, पोट, चेह-याचा पुढचा भाग, हाताचे तळवे, कोपर कुल्ले, इ. ठिकाणी होऊ शकतील. बाई सांगते ते कारण व मुकामार/ जखम याची संगती लागत नसेल तर शंका घ्यावी. बचावासाठी मनुष्य हातांचा ढालीसारखा वापर करतो, त्या जखमा सहज कळतात. जखमांच्या जागा व स्वरूप यावरून कारण समजू शकते.
  • तोंडाने कारण सांगत असताना डोळे/चेहरा वेगळीच कहाणी सांगतात, ती ओळखणे आवश्यक आहे. यासाठी अर्थातच आपण सहृदय व जागृत असले पाहिजे.
  • मारहाणीच्या जुन्या खाणाखुणांवरून शंका घेता येईल.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate