অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पौष्टिक खा

 

प्रस्तावना

मुलं हल्ली ऐकत नाहीत. सतत बाहेरचं जंक फूड खायचा हट्ट धरतात. वेफर्स, समोसे, क्रीमची बिस्किटं, चाट असे पदार्थ रोजच्या रोज मुलं मागतात. त्यामुळेच वजन वाढतं. मुलं नीट खात नाहीत, अशी तक्रार अनेक पालक करताना दिसतात. अशावेळी मुलांना योग्य आहार कसा द्यायचा ते बघूया.

शाळेत जाण्यापूर्वी

सकाळी पोटभर ब्रेकफास्ट देऊनच मुलांना शाळेत पाठवा. पोट व्यवस्थित भरलेलं असेल तर मधल्या सुट्टीत एखादं सँ‌डविच खाऊन त्यांचं पोट भरू शकेल. 

खाण्याचं वेळापत्रक ठरवा : भूक लागली की लगेच बाहेर जाऊन खायची मुलांची सवय घालवायची असेल तर त्यांना घरातंच काय खायला द्यायचं याची तयारी करून ठेवा. भूक लागली की लगेच मिळतील अशी छोटी छोटी पाकीटं तयार करून ठेवा. त्यात ताजी फळं, सुका मेवा, धान्यांची बिस्किटं, सोया वेफर्स, दही अशा गोष्टी मुलांच्या दप्तरात, त्यांच्या खोलीत किंवा गाडीत ठेऊन द्या. शिवाय त्यांच्या हाताला येतील अशा पाण्याच्या बाटल्यासुद्धा भरून ठेवा.

चटकदार पदार्थ लांब ठेवा

गोळ्या, चॉकलेट्स, कुकीज आणि कोल्ड ड्रिंक्स मुलांना माहित नसणाऱ्या ठिकाणी ठेवा. जेणेकरून भूक लागल्यावर त्यांना ते खाण्याची इच्छा होणार नाही.

पर्याय शोधा

मुलांच्या काही सवयी घालवता येत नसतील तर त्यांना पर्यायी उपाय शोधा. त्यांना दुधात बिस्किटं बुडवून खायची सवय असेल तर त्याऐवजी हेल्दी मफीन किंवा धान्यांची बिस्किटं देऊन बघा. संध्याकाळी आईस्क्रीम खायची सवय असेल तर त्याला पर्याय म्हणून ताज्या फळांची स्मूदी बनवून बघा. 

आवर घाला : जंक फूड कधीतरी एकदा खाण्यास हरकत नाही पण त्यांचा आहारात असणारा सततचा समावेश मुलांच्या आरोग्याला घटक ठरू शकतो. याचबरोबर खाण्याच्या बाबतीतल्या मुलांच्या वाईट सवयी काढून टाकायचा प्रयत्न करा. 

जंक फूडला पर्याय म्हणून वेगवेगळे पदार्थ उपलब्ध आहेत. त्यांची चव चांगली असून ते हेल्दी असल्याने मुलांना ते देता येतील. 
खाकरा, डाएट भेळ, सोया बिस्किटं, भाजलेली चकली, खजुराचे गोड पदार्थ असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 
वेफर्सच्या ऐवजी एक मुठभर सुका मेवा खायला देणं, फायदेशीर ठरू शकतं. 
कोल्डड्रिंक्सना पर्याय म्हणून फळांचे रस, नारळाचं पाणी आणि लिंबू पाणी देता येईल.

काळजी घ्या



कोणताही पदार्थ खरेदी करताना त्यात कोणते घटक आहेत ते तपासून मगच खरेदी करा. 
लो फॅट, असं लिहिलेले पदार्थ खरंच तसं आहेत का याची खात्री करून मगच ते विकत घ्या. 
खाण्याच्या बाबतीत जर वाईट सवयी लागल्या तर त्या आयुष्यभर तशाच राहतात म्हणून सुरुवातीपासूनच चांगल्या सवयी लावून घ्या. त्याचा तुमच्या शरीराला फायदा होईल. लहानपणीच या सवयी अंगवळणी पडल्या की संपूर्ण आयुष्यभर त्या तुमची साथ देत राहतात. 
- क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट 
नमिता जैन
शब्दांकन : आकांक्षा मारुलकर

स्‍त्रोत - महाराष्ट्र टाइम्स

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate