অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार

बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे 

महिना

बाळाची वाढ

पहिला महिना

मान सावरणे, आईला ओळखणे, वजनात १/२ ते १ किलो वाढ

दुसरा महिना

बाळाची नजर स्थिर, बाळ हसते

तिसरा महिना

हालचालीत वाढ, आवाजाच्या दिशेने प्रतिसाद

चौथा महिना

हातात वस्तू पकडणे, मांडीवर टेकून बसणे.

पाचवा महिना

ओरडणे, वस्तूचा शोध घेणे, जन्म वजनाच्या दुप्पट वजन

सहावा महिना

आधार दिल्यास खुर्चीत बसू शकते.

सातवा महिना

रांगणे, हाताने पदार्थ खाणे,नाव घेतल्यास प्रतीसाद

आठवा महिना

आधाराशिवाय बसणे, काका, बाबा, दादा इ. शब्द बोलणे

नववा महिना

आधाराने उभे राहणे, वस्तूची आवड दाखवणे

दहावा महिना

बसल्यावर उठून उभे राहणे, टाळ्या वाजवणे, टाटा करणे.

अकरावा महिना

हात धरून पावले टाकणे, वस्तू पकडणे, खेळात रस घेणे.

बारावा महिना

नीट चालणे, नाकाला करणे, जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन.

आहार वयोगटानुसार बाळाचा आहार

  • ० ते ६ महिने :- फक्त स्तनपानच दयावे.
  • ६ ते ९ महिने :- भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सुप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा.
  • ९ ते १२ महिने :- वरण, भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे दयावे.
  • १ वर्षानंतर :- घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील. तेच थोडे कमी तिखट करून या वयातल्या मुलांना देता येते.

बाळाला दिवसातून किती वेळा खायला दयावे (पूरक आहार )

  • ६ ते ९ महिने – २ वेळा
  • ९ ते १२ महिने – ३ ते ४ वेळा
  • दुसऱ्या वर्षातसुद्धा आईचे दूध हा बाळाच्या पोषक आहारातील महत्त्वाचा घटक असतो. त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षणही होते. बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. जन्मापासून ५ व्गार्षानंतर बाळाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

त्यानंतर ठराविक कालांतराने बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासणी करून अयोग्य वाढीची कारणे शोधून काढता येतील. सदर कारणानुसार त्या बालकावर उपचार करून पुढील गुंतागुंत व मृत्यू निश्चितपणे टाळता येतील.

५ वर्षापर्यंत बालकाची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.

मुलांच्या विकासासाठी काय अपेक्षा आहे ?

  1. मुलांना पुरेसा पौष्टिक आहार दया. पण त्यांना अन्न खाण्यासाठी दुराग्रह करू नका. बळजबरी केली तर अन्नाचा परिणाम होणार नाही.
  2. रोगप्रतिबंधक लस मुलांना टोचून घेण्याची खबरदारी घ्या.
  3. मुलांना मार्गदर्शन कर. शिकवत राहा, त्यांना प्रेम, माया दया. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ काढा. त्यांना उगीचच सतत आपल्या संरक्षणाखाली ठेवू नका. त्यांना मोकळेपणाने खेळू बागडू दया.
  4. तीन ते पाच वर्षापर्यंत दुसरे मुल होऊ देऊ नका आणि दुसऱ्या मुलाच्या आगमनाच्या वेळी पहिल्याच्या मनाची तयारी करून ठेवा.
  5. मुलांना शाळेची गोडी लावा.
  6. अपघात आणि विषबाधा होऊ न देण्यासाठी काळजी घ्या.
  7. सुखी कुटुंबासाठी आदर्श माता हवीच. आई ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. कुटुंबाचे स्वास्थ, सुख, आरोग्य आईबरोबरच अवलंबून असते. आजचे मूल उदयाची आई किंवा पिता होणार असते. त्यासाठी, मुलाच्या प्रगतीत आपला फार मोलाचा वाटा आहे.

 

स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate