অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुलांचे आजार

लहान मुलांचे आजार

एका दृष्टिक्षेपात आपल्या देशात बालमृत्यूंचे प्रमाण हजारी 60 इतके जास्त आहे. यात निम्मे अर्भकमृत्यू असतात. जन्मताना पुरेशी काळजी न घेणे, बाळाची ऊब कमी होणे,जंतूदोष-पू, न्यूमोनिया हे अर्भकाचे प्रमुख आजार आहेत. याने अनेक बाळे दगावतात.

पचनसंस्था

 

 

 

दात येण्यासंबंधी त्रास, तोंड येणे,उलटया, हगवण, अतिसार, पोटात कळ, कावीळ, जंत, विषमज्वर,माती खाणे, मळाचे खडे होणे,विषबाधा (रॉकेल, इ.)

नाक-घसा-श्वसनसंस्था

सर्दी, ऍडेनोग्रंथी वाढ, टॉन्सिल्स-सूज, घसासूज, सायनससूज, श्वासनलिकादाह, न्यूमोनिया, क्षय, जंत-खोकला, बाळदमा,इत्यादी. त्वचा : गळवे, दूषित जखमा, इसब, उवा, खरूज, गजकर्ण, नाळेत पू होणे,बेंबीतील हर्निया, इ.

डोळा

डोळे येणे, बुबुळावर व्रण किंवा जखम, रातांधळेपणा, दीर्घदृष्टी, तिरळेपणा,रांजणवाडी, लासरू, इ.

कान

बाह्यकर्णदाह, बुरशी, कानात मळ गच्च बसणे, अंतर्कर्णदाह, कान फुटणे,बहिरेपणा. मेंदू व मज्जासंस्था : मेंदूआवरणदाह, मेंदूसूज, मेंदूज्वर, धनुर्वात, पोलिओ,मेंदूजलविकार, फेफरे, मतिमंदत्व, इ. हृदय रक्ताभिसरण संस्था : झडपांचे आजार, सांधेकाळीज ताप, इत्यादी.

अस्थिसंस्था

पाऊल सदोष असणे, इतर हाडांची-सांध्यांची रचना सदोष असणे,मुडदूस, हाडसूज, इ.

स्नायुसंस्था

कुपोषणामुळे अशक्तता, कमी वाढ असणे, स्नायू निकामी होणे, इ.

रक्तसंस्था

सदोष तांबडया पेशी, रक्तपांढरी, हिवताप, रक्ताचे कर्करोग, जंतुदोष,रक्तस्रावाची प्रवृत्ती, इ. रससंस्था : हत्त्तीरोग, कर्करोग, गंडमाळा, इ. संप्रेरक संस्था : गलग्रंथी दोष, मधुमेह, इ.

मूत्रसंस्था

मूत्रपिंडदाह, मूत्राशयदाह, मूत्रनलिकादाह, लघवी अडकणे, मुतखडे, इ. पुरुषजननसंस्था : पुरूष बीजांडे वृषणात न उतरणे, बीजांडांची अपुरी वाढ, हर्निया,इ. स्त्रीजननसंस्था : बीजांडांची अपुरी वाढ. इतर : गोवर, कांजिण्या, जर्मन गोवर, गालगुंड, कुपोषणाचा प्रकार, अपुरे दिवस,अपुरे वजन.

अपघात

जखमा, भाजणे, साप-विंचू चावणे, बुडणे, शॉक, कानात, नाकात खडा किंवा बी जाणे. या वर्गीकरणात लहान मुलांचे बहुतेक आजार तक्रारींची नोंद केलेली आहे. याच प्रकरणात शेवटी लहान मुलांच्या आजारांच्या काही प्रमुख लक्षणांसंबंधी तक्ते व मार्गदर्शन दिले आहे (ताप, खोकला, उलटी, खूप रडणे, इ.). याशिवाय बहुतेक आजारांची चर्चा संबंधित शरीरसंस्थेच्या प्रकरणात केली आहे. शरीरसंस्थेच्या विभागणीत न बसणारे काही आजार या भागात दिले आहेत. या वर्गीकरणावरून असे दिसते की मुलांमध्ये पचनसंथा, श्वसनसंस्था व त्वचा यासंबंधीचे आजार व तक्रारी जास्तीत जास्त आढळतात. त्यातही जंतुदोष, जंत, इत्यादी कारणांमुळे होणारे आजार जास्त आढळतात. मोठया माणसांपेक्षा मुलांमध्ये आजारांचे प्रमाण तसे जास्त असते आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आढळते. आपल्या देशात लहान मुलांच्या आजारांमध्ये सर्वप्रथम अतिसार आणि न्यूमोनिया गटांचे आजार येतात. या दोन्हीही आजारांवर परिणामकारक उपाययोजना होऊ शकते. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटू शकेल.

 

स्त्रोत: आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate