অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लहान मुलांचे आजार - न्यूमोनिया

लहान मुलांचे आजार - न्यूमोनिया

न्यूमोनिया

न्यूमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा आजार आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो. या जंतूमुळे श्वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र आजार आहे व उपचार न केल्यास माणूस मरू शकतो.

न्यूमोनिया हा आजार कोणताही होऊ शकतो. पण पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण जास्त आढळते व भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात.

लक्षणे

पाच वर्षाखालील मुलामुलीमध्ये छाती उडते व त्याचबरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची शक्यता जास्त असते. बोटाने छातीवर वाजवून बघितल्यास फुफ्फुसाच्या सुजलेल्या भागावर ठप्प असा आवाज येतो. लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो. आईचे दूध नीट ओढता येत नाही.

उपचार

न्यूमोनिया हा गंभीर आजार असल्यामुळे योग्य त्या डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते. वरीलपैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरु होऊन तीव्रता (गंभीरता) कमी होऊ शकते.

 

स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate