অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुंता करणे

सुंता म्‍हणजे काय

मुलांच्या शीश्नावर त्वचेची एक टोपी असते, त्याने टोक झाकले जाते. सुंता करतेवेळी ही वरची त्वचा शस्त्रक्रियेनं काढली जाते त्यामुळं शीश्नाचं टोक उघडं होतं.

  • जन्मानंतर दोन ते तीन आठवड्यांनी मुलाची सुंता करणं चांगलं कारण मुलगा मोठा होत जातो तसं सुंता करणं अवघड होतं.  परंतु ही प्रक्रिया पहिल्या दहा दिवसांमधे केली जाते (ब-याचदा पहिल्या ४८ तासांमधे).
  • लवकर जन्मलेल्या किंवा अन्य गुंतागुंत असलेल्या बाळांची ते रुग्णालयात बाहेर पडत नाहीत तोवर सुंता करण्याची गरज नाही.
  • ज्या बाळांना जन्मतःच शीश्नाची विकृती आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा मुलांची सुंता केली जात नाही कारण ती त्वचा भरुन काढण्याच्या कामी येते.

सुंता केलेल्या शीश्नाची निगा

  • अंघोळीच्या वेळी साबण आणि पाण्याने ते स्वच्छ धुवा.
  • सुंता केल्यानंतर बाळाला थोडी अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळं काळजी घ्या.
  • सुंता केलेल्या ठिकाणी मलमपट्टी असेल तर आवश्यकतेनुसार ती बदला.
  • सुंता बरी होण्याला सामान्यतः सात ते दहा दिवस लागतात. तोवर शीश्नाचे टोक खडबडीत किवा पिवळ्या रंगाचं दिसू शकतं. पुढील स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • सतत रक्तस्त्राव
  • शीश्नाच्या टोकाला लालसरपणा जो तीन दिवसांनंतर आणखी वाढतो

ताप

  • संक्रमणाची चिन्हें, जसे, पू भरलेले फोड
  • सुंता केल्यानंतर ६ ते ८ तासांनी देखील सामान्यपणे लघवी न होणे

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate