Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 02:51:18.710287 GMT+0530
मुख्य / आरोग्य / प्रथमोपचार / लहान मुलांचे अपघात
शेअर करा

T3 2020/01/27 02:51:18.714797 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 02:51:18.739341 GMT+0530

लहान मुलांचे अपघात

साधारणपणे एक वर्षानंतर मुलांची हालचाल एकदम वाढते. मुलांच्या सभोवतालच्या परिस्थितीत अनेक धोकादायक गोष्टी असल्यास अपघातांचे प्रमाण वाढते

साधारणपणे एक वर्षानंतर मुलांची हालचाल एकदम वाढते. मुलांच्या सभोवतालच्या परिस्थितीत अनेक धोकादायक गोष्टी असल्यास अपघातांचे प्रमाण वाढते. एक वर्षावरील मुलांच्या मृत्यूंचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. या अपघातांत अनेक प्रकार येतात. भाजणे (स्वयंपाकघरात), फटाक्यांचे अपघात, बुडणे, झाडावरून पडणे,साप-विंचू चावणे, पडून मार लागणे,गुरांमुळे होणा-या जखमा, विजेचा शॉक वाहनांखाली सापडणे, औषधे किंवा विषारी पदार्थ पोटात जाणे,खेळताना झालेल्या जखमाबी,किडा खडू इत्यादी नाका-कानात जाणे धारदार वस्तूंमुळे जखमा होणे खेळामध्ये टोकदार वस्तू लागणे इत्यादी अनेक अपघात यात येतात. यांतल्या अनेक घटना जीवघेण्या ठरू शकतात. असे अपघात होऊ नयेत म्हणून अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागते. मुलांकडे व त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष असणे आवश्यक आहे. अनेक कुटुंबांत मुलांना लहान भावंडांकडे सोपवून रोजगारासाठी बाहेर पडावे लागते. यामुळे अपघात होत राहतात.

घर व घराभोवतालच्या परिसरात धोकादायक गोष्टी मुलांपासून दूर किंवा हाताबाहेर आहेत याची खात्री करायला पाहिजे. उदा. औषधे किंवा विषारी बाटल्या उंच ठिकाणी असणे, चाकू-कात्री खाली न राहणे, आजूबाजूला टाकी, उघडी डबकी किंवा खड्डे नसणे,मुलांच्या खेळण्यांत धारदार वस्तू नसणे, इत्यादी अनेक गोष्टी पाहणे आवश्यक असते. अशी दक्षता घेतली तरच मुलांचे अपघात टळू शकतील.

फटाक्यांचा मोह टाळल्यास काही अपघात टळतील. तसेच बालमजुरीचीही मागणी कमी होईल.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

2.95180722892
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/01/27 02:51:18.879330 GMT+0530

T24 2020/01/27 02:51:18.885590 GMT+0530
Back to top

T12020/01/27 02:51:18.663447 GMT+0530

T612020/01/27 02:51:18.679936 GMT+0530

T622020/01/27 02:51:18.700528 GMT+0530

T632020/01/27 02:51:18.701234 GMT+0530