অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लैंगिक विकृती

लैंगिक विकृती

समाजात नैसर्गिक लैंगिक प्रवृत्तीशिवाय अनैसर्गिक लैंगिक प्रवृत्ती व त्याबरोबर मानसिक दोष यांचे प्रमाण कमी नाही. समाजात सर्वसाधारणपणे पुढील लैंगिक विकृती आढळतात

  • परपीडन : पीडन म्हणजे नैसर्गिक शरीरसुखाऐवजी जोडीदाराला शारीरिक,मानसिक पीडा देऊन आनंद मिळवणे. (उदा. सिगारेटचे चटके देणे, मारणे, इ.)
  • आत्मपीडन : स्वत:ला पीडा देऊन सुख मानणे.
  • लिंगप्रदर्शन : भिन्नलिंगी व्यक्तीसमोर आपले लिंग दाखवून असभ्य वर्तन करणे.
  • पशुमैथुन : पाळीव प्राण्यांशी लैंगिक संबंध.
  • बलात्कार : स्त्रीच्या संमतीशिवाय लैंगिक जबरदस्ती.
  • बालकशोषण : लहान मुलांवर जबरी करणे. ही विकृती मोठया प्रमाणात आढळते. अनेक घरात कुटुंबातच ही विकृती आढळते.

हस्तमैथुन : मुलामुलींनी हस्तमैथुन करणे ही विकृती मानली जात नाही. वयात आल्यानंतर बरीच वर्षे शारीरिक संबंध नसण्याच्या काळात लग्न होईपर्यंत हस्तमैथुन करणे स्वाभाविक मानले आहे. मात्र अशी सवय लग्नानंतरही राहणे ही मनोविकृती आहे, असे मानता येईल.

समलिंगी संबंध : पुरुष-पुरुष किंवा स्त्री-स्त्री संबंध हे अनेकांच्या मते ही विकृती नसून काही लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. याबद्दल कायदेशीर वाद असला तरी अनेक देशात हे संबंध मान्य झालेले आहेत.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate