অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घनकचरा व्यवस्थापन


सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे; कारण तिथूनच व्यवस्थापनाला सुरुवात करायची आहे. हे झाले नाहीतर सार्वजनिक यंत्रणा (ग्रामपंचायत, नगरपालिका) काही करू शकणार नाही.

यापुढची पायरी म्हणजे गाव-नगर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण,जमा करून आणणे, विल्हेवाट, विक्री इ. सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे. यात अनेक संस्था, गट सहभागी झाले तर हे काम यशस्वी होऊ शकते.संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी मिळणा-या निधीच्या एकूण दहा टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरता येईल.

काही घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने, आठवडे बाजार, शाळा, मंदिरे,यात्रा, लग्नसमारंभ इ. ठिकाणी पण पुष्कळ कचरा निर्माण होतो. या सर्व घटकांचा विचारही व्यवस्थापनात करावा लागेल.

न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणत: जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

कुजणा-या कच-याचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत किंवा गांडुळखत तयार करु शकतो.

घनकच-याचे परिणामकारक व्यवस्थापन तीन तत्त्वांवर अवलंबून आहे.

(3 R- Principal)
  1. वापर कमी करणे (Reduce)
  2. पुनर्वापर (Reuse)
  3. चक्रीकरण (Recycle) पुनर्प्रक्रिया

वापर कमी करणे

सध्याचा काळ वापरा व फेका अशा स्वरुपांच्या वस्तूंचा आहे. एकदाच वापरण्याच्या वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर टाकाऊ पदार्थ तयार होतात. फेकण्याजोगे साहित्य वापरण्यापेक्षा कायमस्वरुपी वापरण्यात येणा-या वस्तूंचा वापर केल्यास टाकाऊ वस्तूंची निर्मिती कमी होईल. उदा. चहासाठी प्लास्टिक कप किंवा कुलहड वापरण्यापेक्षा चिनी मातीचे किंवा काचेचे कप वापरावेत.

पुनर्वापर

आहे त्याच स्वरुपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरणे म्हणजे पुनर्वापर. टाकाऊ पदार्थ अनेक प्रकारांनी वापरता येतात. जुने प्लॅस्टिकचे व धातूचे डबे, बाटल्या,बरण्या पुन्हा वापरल्यामुळे अविघटनशील कच-याचे प्रमाण कमी होईल.

पुनर्प्रक्रिया

उदा. लोखंड. भंगारापासून परत लोखंडी वस्तू तयार उदा. लोखंड. भंगारापासून परत लोखंडी वस्तू तयार करणे.

घनकचरा व्यवस्थापन पध्दती/पाय-या

सर्व व्यवस्थापनाची सुरुवात घराघरातच सुरु व्हायला पाहिजे. घनकच-याचं व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा वेगळा करणे महत्त्वाचे आहे. घनकचरा वेगळा करण्यासाठी खालीलप्रमाणे वेगवेगळा रंग असणा-या कचरा कुंडयांचा वापर केला जाऊ शकतो.

1. सफेद : पुन्हा वापरता येण्याजोगा कचरा

2. हिरवा : कुजणारा/ओला कचरा

3. काळा : न कुजणारा / सुका कचरा

पहिल्याप्रथम या कच-याची वर्गवारी केली पाहिजे. यातून कुजणारा कचरा घरच्या घरी कुजवून खत करता येते. उरलेला कचरा सार्वजनिक व्यवस्थेने उचलावा. घरातील कच-याच्या वर्गवारीसाठी निरनिराळया रंगाचे डबे/बादल्या वापराव्यात.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate