অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोगॅस

पुन्हा-पुन्हा वापरता येण्याजोग्या (नवीनीकरणीय) उर्जास्रोतांपैकी एक म्हणजे बायोगॅस. ह्या जैविक वायूचा उपयोग घरगुती तसेच शेतीच्‍या कामांसाठी होतो.

बायोगॅस म्हणजे काय?

ह्यामध्ये मुख्यतः हायड्रोकार्बन्स असतात, ते ज्वलनशील असल्याने जळताना उष्णता आणि उर्जा उत्पन्न करतात. एका जैव-रासायनिक क्रियेमधून हा वायू उत्पन्न होतो. ह्या प्रक्रियेच्‍या दरम्यान काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जैविक कचर्‍याचे रूपांतर उपयुक्त अशा बायोगॅसमध्ये करतात. जैविक प्रक्रियेमुळे हा वायू उत्पन्न होत असल्याने ह्याला बायोगॅस असे म्हणतात. मिथेन हा वायू बायोगॅसचा मुख्य घटक असतो.

बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया

बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया अनएरोबिक प्रकारची असते आणि ती दोन चरणांत घडून येते – ती दोन चरणे म्‍हणजे आम्लनिर्मिती (अ‍ॅसिड फॉर्मेशन) आणि मिथेन वायूची निर्मिती. आम्लनिर्मितीमध्ये, कचर्‍यामधील जैव-विघटनयोग्य जटिल सेंद्रीय संयुगांवर आम्ल तयार करणारे जीवाणू आपले काम सुरू करतात. हे जीवाणू कचर्‍यातील विष्ठेमध्ये राहतात. ह्या पातळीवर सेंद्रीय आम्ले हाच मुख्य घटक असल्याने तिला आम्लनिर्मितीची पातळी असे म्हणतात. दुसर्‍या चरणात, मिथॅनोजेनिक प्रकारचे जीवाणू सेंद्रीय आम्लांवर क्रिया करून मिथेन वायू बनवतात.

बायोगॅस निर्मितीसाठी कच्चा माल

बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. तरी ही, शेणाखेरीज कुक्कुटपालना मधील कचरा, शेतांमधील वाया जाणारा माल, नाइट-सॉइल (रात्री वाहून नेला जाणारा मैला) ह्यांचा ही वापर कच्चा माल म्हणून करता येतो.

बायोगॅस उत्पादनाचे फायदे

हे पर्यावरण मित्रत्‍वपूर्ण इंधन आहे. बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खेड्यापाड्यांमधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ह्या प्रक्रियेत बायोगॅसखेरीज द्रवस्‍वरूप स्लरीदेखील निर्माण होते. तिच्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असल्याने तिचा खत म्हणून ही वापर केला जातो. शेणाच्या गोवर्‍या आणि लाकडे जाळून चूल पेटवताना निर्माण होणारा धूर आरोग्यास घातक असतो. बायोगॅसपासून असा काही धोका नाही. बायोगॅसच्या वापराने वातावरण स्वच्छ राहाते कारण ह्या प्रक्रियेमुळे माशा आणि इतर जंतूंना आकर्षित करणारे कचर्‍याचे उघडे ढीग साचून राहात नाहीत. बायोगॅसच्या वापराने सरपण जाळण्याचे प्रमाण कमी होऊन झाडे तोडली जाण्यापासून बचाव होतो.

बायोगॅस निर्मिती संयंत्राचे घटक

मुख्यतः दोन प्रारूपे (मॉडेल्स) असतात -फिक्स्ड डोम म्हणजे स्थिर घुमटाकार आणि फ्लोटिंग ड्रम म्हणजे तरंगते पिंप असलेले.
दोन्ही मॉडेल्सचे प्रमुख घटक ह्या प्रमाणे आहेत-
(i)डायजेस्टर -ही वस्तू कुजवण्याची टाकी आहे. ही जमिनीत अर्धी किंवा पूर्णपणे पुरून तयार करतात. विटा आणि सिमेंटने बांधलेली ही टाकी साधारणपणे दंडगोलाकार आकाराची असते.
(ii)गॅस होल्डर -डायजेस्टरमधून बाहेर पडणारा वायू ह्या घटकामध्ये साठवतात. हा फिक्‍सड डोम किंवा फ्लोटिंग ड्रम असू शकतो.ह्यानुसारच संयंत्रांचे ढोबळ वर्गीकरण केले आहे. ह्याच्या वरील भागामधून गॅस बर्नर किंवा पुढच्या पाइपलाइनशी जोडणी करतात.
(iii)स्लरी मिश्रण टाकी - ह्या टाकीत शेण आणि पाण्याचे मिश्रण करून ते एका इनलेट पाइपमार्फत डायजेस्टरमध्ये सोडले जाते.
(iv)आउटलेट टाकी आणि स्लरीसाठी खड्डा पिट-आउटलेट टाकी साधारणपणे घुमट प्रकारच्या संयंत्रात असते. ह्यामधून स्लरी थेट शेतातील खड्ड्यात सोडली जाते. तरंगत्या पिपाच्या संयंत्रामध्ये ही स्लरी एकतर वाळवतात किंवा थेट शेतात सोडतात.

बायोगॅस संयंत्र तयार करताना विचारात घेण्याचे मुद्दे

  • जागेची निवड -जागा निवडताना खालील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे -पाणी साठून राहू नये म्‍हणून जागा सपाट आणि आसपासच्या जमिनीपेक्षा थोडी उंचावर असावी. तेथील माती अगदीच ढिली-मोकळी नसावी. तिच्यामध्ये 2 किलोग्राम/सेंमी2 इतकी धारणा-शक्ती (बेअरिंग स्‍ट्रेंथ) असावी.
  • वायूचा प्रत्यक्ष वापर ज्या ठिकाणी होणार असेल (घर किंवा शेत) त्यापासून ती जवळ असावी. कच्चा माल सहजपणे हाताळता यावा ह्यासाठी अशी जागा गोठा/तबेला ह्याजवळ असावी. पाणी पातळी (वॉटर-टेबल) फार उथळ नसावे. संयंत्र असलेल्‍या स्‍थळी पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा. दिवसभरातील बहुतेक काळ संयंत्राला नितळ सूर्यप्रकाश मिळायला हवा. संयंत्र स्‍थळावर वायुवीजन चांगले हवे. संयंत्र आणि जवळची भिंत किंवा पाया ह्यांमधील अंतर किमान 1.5 मीटर असावे.संयंत्र झाडांपासून दूर असावे म्हणजे मुळांचा अडथळा होणार नाही. पिण्याच्या पाण्याच्या कोणत्या ही विहिरीपासून हे संयंत्र किमान 15 मीटर दूर असावे.
  • कच्च्या मालाची उपलब्धता-कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरच बायोगॅस संयंत्राचा आकार ठरवता येतो.साधारणपणे दर रोज 10 किलो शेण मिळेल असे मानले तर ताज्या शेणापासून सुमारे 40 लिटर/किलो वायू मिळू शकतो. म्हणजेच 3 घनमीटर बायोगॅस तयार करण्यासाठी सुमारे 75 किलो शेण लागेल (3/0.04). म्‍हणून, गरजेपुरते शेण मिळवण्यासाठी किमान 4 गुरांची गरज असते.

उपयुक्त स्रोत

वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालापासून मिळू शकणार्या बायोगॅसचे साधारण प्रमाण

क्र.

कच्चा माल

लीटर /कोरडा माल, किलो

मिथेन वायूचे प्रमाण %

1.

शेण

350*

60

2.

रात्री वाहून नेण्‍यात येणारा मैला

400

65

3.

कुक्कुटपालनातील कचरा

440

65

4.

वाळलेली पाने

450

44

5.

उसाच्या शेतातील कचरा

750

45

6.

मक्याचे तूस

800

46

7.

पेंढ्याचा भुगा

930

46

संयंत्रामध्ये तापमान-नियंत्रक व्यवस्था नसेल तर दर किलो ताज्‍या शेणापासून सुमारे 40 लिटर वायू मिळेल असे माना. एक हजार लिटर म्हणजे 1 घनमीटर वायू होय.

बायोगॅस संयंत्राच्या आकारानुसार गाईगुरांची आवश्यक असलेली संख्या

संयंत्राचा आकार, घनमीटरमध्ये

गाईगुरांची आवश्यक असलेली किमान संख्या

2

3

3

4

4

6

6

10

8

15

25

45

सर्वसामान्य वापरात असलेल्या इंधनांचे उष्मांक-मूल्य

सर्वसामान्य इंधन

उष्मांक-मूल्य, किलोकॅलरीमध्ये

उष्मीय कार्यक्षमता

बायोगॅस

4713/घनमीटर

60%

शेणाची गोवरी

2093/किलो

11%

सरपण

4978/ किलो

17.3%

डिझेल (एचएसडी) (HSD)

10550/ किलो

66%

रॉकेल

10850/ किलो

50%

पेट्रोल

11100/ किलो

---

बायोगॅसची गरज

क्र.

उपयोग

आवश्यक प्रमाण

1.

स्‍वयंपाक

336 - 430 लि/ दिवस / व्यक्ती

2.

गॅस स्टोव्‍ह

330 लि / तास /5 सेंमी बर्नर

470 लि / तास /10 सेंमी बर्नर

640 लि / तास /15 सेंमी बर्नर

3.

गॅसबत्ती

126 लि / 100 वॉटच्‍या बरोबरीने जळणारा लँम्‍प

70 लि / तास /1 मँटलची (वातीची) बत्ती

140 लि / तास /2 मँटलची बत्ती

169 लि /lir/3 मँटलची बत्ती

4.

द्वि-इंधनीय इंजिन

425 लि /अश्वशक्ती/ तास

शक्ती-सुरभिघरांसाठी बायोगॅस संयंत्र

शक्ती-सुरभि हे एक स्वयंपाकघरातील केरकचर्‍यावर आधारित बायोगॅस संयंत्र आहे. हे एखाद्या पंरपरागत बायोगॅस संयंत्राच्या सिद्धांतांवर काम करते पण ह्यामध्ये. शहरी जीवनातील गरजांप्रमाणे सुधारणा करण्याात आली आहे. ह्या संयंत्रामध्येा केरकचर्‍याचा इनलेट फीड पाइप, डायजेस्ट‍र, गॅस होल्डंर, वॉटर जॅकेट, गॅस वितरण प्रणाली आणि आउटलेट पाइप असे भाग असतात. ह्याचा विकास विवेकानंद केंद्र, नैसर्गिक संसाधन विकास प्रकल्पर (Vknardep), कन्याकुमारी, तामिळनाडु द्वारे करण्यायत आला आहे.

biogas

हे संयंत्र परंपरागत बायोगॅस संयंत्रांपेक्षा चांगले आहे हे कशावरून?

  • परंपरागत संयंत्रांमध्ये जनावरांचे शेण मोठ्या प्रमाणात वापरतात आणि दररोज शेणाच्या लगद्याचे मिश्रण गॅसच्याण टाकीत घालावे लागते. पण शक्ती-सुरभि करीता, जनावरांचे शेण फक्त सुरुवातीला आवश्यक आहे आणि त्या नंतर स्व्यंपाकघरातील उरले-सुरले शिजविलेले अन्न (शाकाहारी व मांसाहारी) किंवा केरकचरा, भाज्यांरची देठे, पिठाच्या गिरणीतील उरलेला कचरा, गैर-खाद्यान्नट तेलबियांची खळ, (कडुलिंब, एरंड इत्याादी) ही सर्व सामग्री गॅस उत्पादनासाठी पुरेशी आहे.
  • हे संयंत्र 500 ते 1500 लीटर क्षमतेचे असून दोन आकर्षक रंगांत मिळते.
  • हे जोडणे किंवा हलवणे अगदी सोपे आहे तसेच हे स्वतंत्र घराच्या् परसदारी किंवा फ्लॅट संरचना असल्याकस गच्चीैवर किंवा एखाद्या शेडमध्येचसुध्दाव लावता येते. आवश्यक फीड सामग्री

कार्यप्रदर्शन

  • 0.43 किलो एलपीजीसमान असलेल्यात 1 क्युगबिक मीटरच्यार संयंत्रासाठी, सुमारे 5 किलो केरकचरा आवश्यंक आहे. 100 क्यु1बिक मीटर बायोगॅसच्याच मदतीने 5 किलोवॅट उर्जा निर्मिती करता येते असा अंदाज आहे. ही वीज एका घरासाठी 20 तास पुरू शकेल.
  • प्रक्रिया आरोग्यापूर्ण आहे आणि कोणत्याही वासाचा किंवा माश्यांॅचा त्रास होत नाही.
  • हे संयंत्र हवामानातील बदल आणि हरितगृह (ग्रीन हाउस) वायूंच्या नियंत्रणास मदत करते तसेच संयंत्रामध्येी वापरलेला शेणाचा लगदा चांगले सेंद्रीय खत म्हणून वापरता येतो.

जास्ते माहितीसाठी संपर्क साधा
विवेकानंद केंद्र, नैसर्गिक संसाधन विकास प्रकल्पस, व्हीच.के.नारदीप, विवेकानंदपुरम्, कन्याकुमारी - 629 702, तामिळनाडु,
ईमेल: vknardep@gmail.com
दूरध्वुनी: 04652 246296 and 04652 -247126.

स्रोत: http://www.hindu.com

बायोगॅस स्लरीची तुलनात्मक पोषणमूल्ये

 

N

P2O5

K2O

बायोगॅस स्लरी

1.4

1.0

0.8

फार्मयार्ड मॅन्युअर (FYM)

0.5

0.2

0.5

शहरी कंपोस्ट

1.5

1.0

1.5

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate