অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊर्जेच्या मुलभूत बाबी

ऊर्जेच्या मुलभूत बाबी

  • अक्षय उर्जा ..व नवीकरणीय उर्जा
  • देशात १०२७८८ मे .वॅ. इतक्या क्षमतेचे पवनउर्जेपासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास वाव असून त्यापैकी ५९६१ मे .वॅ. इतक्या वीजनिर्मितीचा महाराष्ट्रात वाव आहे

  • अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर आधारित ऊर्जा निर्मिती साधने
  • मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा, तेल, नैसर्गिक वायू इ.पारंपरिक इंधन साठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत

  • आपली ऊर्जेची गरज किती?
  • प्रत्येकाला चांगल्या दर्जाची राहणी खात्रीने मिळण्यासाठी किती ऊर्जा लागेल?हा एक मूलभूत प्रश्न आहे. ऊर्जा नियोजन करताना त्याचा विचार मुळात करावा लागतो.

  • इंधन-विद्युत् घट
  • इंधनामधील रासायनिक ऊर्जेचे सरळ विद्युत् ऊर्जेत अखंडपणे रूपांतर करणारे साधन.

  • उर्जा आणि तिचा सध्याचा वापर
  • या विभागात भारतात सध्या वापरले जाणारे विविध उर्जा प्रकार याविषयी माहिती दिली आहे

  • ऊर्जा
  • कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा.

  • ऊर्जा संसाधने ( Energy resources )
  • घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी लागणारी ऊर्जा ( उष्णता, प्रकाश किंवा वीज ) मिळविण्यासाठी जे पदार्थ अथवा वस्तू वापरल्या जातात, त्यांना 'ऊर्जा संसाधने' म्हणतात. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ऊर्जा मिळविणे, ऊर्जेचे उपयुक्त स्वरूपात रूपांतर करणे आणि ऊर्जेचा विविध कारणांसाठी वापर करणे शक्य झाले आहे.

  • ऊर्जा-उद्‌गम
  • उष्णता, प्रकाश आणि विद्युत् यांचा पुरवठा करण्याकरिता ज्यांपासून ऊर्जा मिळविता येते, अशी नैसर्गिक ऊर्जा साधने म्हणजे म्हणजे शक्ति-उदगम वा ऊर्जा-उदगम होत.

  • ऊर्जापरिवर्तक (ट्रॅन्सड्यूसर)
  • एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे साधन.

  • कार्यक्षम सौरऊर्जा ग्रहणासाठी द्विमितीय स्फटिक विकसित
  • अमेरिकेतील एमआयटी येथील अभियंत्यांनी द्विमितीय डायइलेक्‍ट्रिक प्रकाश ग्रहण करणारे धातूचे स्फटिक विकसित केले आहे.

  • काळाची गरज उर्जाबचत
  • पाणी व उर्जा ह्या मानवी जीवनाच्या अविभाज्य गरजा आहेत. त्याचा जपून व बचत सदृश्य उपयोगच मानव प्राण्यांना तारणार आहे.

  • किरणोत्सर्गी अपशिष्ट ( Radioactive Waste )
  • अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प व तत्संबंधित उद्योगांतून बाहेर पडणार्‍या टाकाऊ पदार्थांना किरणोत्सर्गी अपशिष्टे वा प्रदूषके म्हणतात. ही वायुरूप, द्रवरूप किंवा घनरूप असतात. खनिज मूलद्रव्यांचे उत्खनन व पृथ:करण संयुगांपासून धातू व इंधन निर्मिती, अणुऊर्जा निर्मिती, किरणोत्सर्गी समस्थानिकावरील संशोधन, जळलेल्या इंधनांवरील प्रक्रिया, अणुचाचणी, अणुस्फोट इ. क्रियांमधून किरणोत्सर्गी द्रव्ये बाहेर पडतात.

  • निसर्गातील ऊर्जा
  • आजची जागतिक अर्थव्यवस्था ही खनिज इंधनाच्या उपलब्धतेशी किती जवळून जोडली गेली आहे, हे सध्याची आजूबाजूची परिस्थिती पाहूनही लक्षात येईल. मोठमोठ्या कंपन्यांपासून ते अगदी झोपडीत राहणाऱ्या कुटुंबापर्यंत सर्वांना खनिज इंधनाच्या वाढत्या किमतीचा सामना करावा लागतो आहे. खनिज इंधने म्हणजे खरे तर पृथ्वीच्या पोटात निसर्गाने साठवून ठेवलेली ऊर्जा.

  • बायोगॅस : जैविक इंधन
  • बायोगॅसची निर्मिती ही सेंद्रिय पदार्थापासून (विशेषत : organic waste) हवाबंद परिस्थितीमध्ये होत असते.

  • भारतातील जलशक्ती / विदयुत निर्मिती इतिहासाचा मागोवा
  • जगात जलशक्तीचा नोंदलेला पहिला वापर इ.स. 250 साली घड्याळ चालवून झालेला दिसून येतो. यानंतर मात्र मानवाने, उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वापर पिठाची गिरणी, लाकुड मिल, किंवा तत्सम उपकरणे चालविण्यासाठी केला. वॉल्वेरीन खुर्चीच्या कारखान्यात 22 मार्च 1880 साली 16 ब्रशआंर्कचे दिवे चालविण्यासाठी जलशक्तीचा वापर केला आणि खऱ्या अर्थाने विद्युतीय वापरास सुरूवात झाली असे म्हटले जाते.

  • शक्ति-उद्‌गम
  • शक्ति-उद्‌गम : (ऊर्जा-उद्‌गम). उष्णता, प्रकाश आणि विद्युत् यांचा पुरवठा करण्याकरिता ज्यांपासून ऊर्जा मिळविता येते, अशी नैसर्गिक ऊर्जा साधने म्हणजे म्हणजे शक्ति-उदगम वा ऊर्जा-उदगम होत. गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा असे ऊर्जेचे दोन मुख्य प्रकार आहेत. गतिज ऊर्जा म्हणजे द्रव्याच्या स्थितीमुळे साठविलेले व स्थिर स्थितीत असलेले कार्य असते.

  • सूर्यप्रकाश
  • सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागी पाहता येण्यासारख्या सौर प्रारणाला सूर्यप्रकाश म्हणतात.

  • सौर ऊर्जा
  • सौर ऊर्जा : ही सूर्याकडून प्रेषित होणारी चुंबकीय प्रारणाच्या (तरंगांच्या) रूपातील ऊर्जा आहे. सूर्याकडून उत्सर्जित होणारे विद्युत् चुंबकीय प्रारण आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व अधिक विरल जड अणुकेंद्रे म्हणजे सौर प्रारण होय.

  • सौर ऊर्जेद्वारे जल-शुद्धीकरण
  • भारतामध्ये शेतीसाठी व घरगुती वापरासाठी पारंपरिक ऊर्जेचा पुरवठा अत्यल्प आहे व त्याची पूर्तता अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर योग्य वापर व व्यवस्थापन करूनच होऊ शकतो.

  • सौरऊर्जेचा ‘राजमार्ग’
  • देशात आज सौरऊर्जा, पवनऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर करून परांपरागत साधनांवरील ताण कमी करण्याची गरज आहे.

  • स्थितीज ऊर्जा
  • वारं आलं. कागद उडाले. कागदांवर ठेवलेला काचेचा वजनी गोळाही (पेपरवेटही) ढकलल्या गेला. पायावर पडला. लागलं. पण तोच गोळा जर नुसता पावलांवर अलगद ठेवला असता तर मुळीच लागलं नसतं. तो गोळा ज्या उंचीवरून पडला त्या उंचीमुळेच गोळ्यात काहीतरी वेगळी 'ऊर्जा' निर्माण होत असावी. तिलाच 'स्थितीज ऊर्जा' म्हणतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate