Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/03/22 07:48:3.439090 GMT+0530
मुख्य / ऊर्जा / पर्यावरण / जैवविविधता - मासे
शेअर करा

T3 2019/03/22 07:48:3.444260 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/03/22 07:48:3.497575 GMT+0530

जैवविविधता - मासे

या विभागात जैवविविधते मधील मासे यांच्या विषयी माहिती देण्यात आली आहे.

सूर्यमासा
ट्रार्किडी मत्स्यकुलातील अनेक प्रजातींमधील गोड्या पाण्यातील माशांना व मोलिडी मत्स्यकुलातील सागरी जातींच्या गटाला हे नाव देतात.
सोनमासा
या माशाचा समावेश अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिडी मत्स्य कुलात करतात.
सोनमुशी
या माशाचा समावेश काँड्रिक्थीज (उपास्थिमीन) वर्गाच्या सेलेची उपवर्गातील कॅरकॅनिडी कुलात होतो.
सामन
एक महत्त्वाचा खाद्य व छंद म्हणून मासेमारी केला जाणारा मासा. त्याचे ट्राउट माशाशी नाते आहे.
पापलेट
पापलेट : मासळीच्या बाजारात पाँफ्रेट मासे पापलेट किंवा पपलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आणि काळा पाँफ्रेट. करडा आणि पांढरा पाँफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा काँड्रोप्लायटीस वंशातला आहे.
पॉरपॉइज
पॉरपॉइज : (शिंशुक). हे नाव विशेषेकरून फोसीना वंशातील लहान, गोल तोंडाच्या, सदंत सागरी प्रण्याला देतात. त्यांचा समावेश फोसीफिडी कुलात होत असून ⇨डॉल्फिन, ⇨देवमासा व पॉरपॉइज यांचा मिळून सस्तन प्राणयांचा सीटॅसिया गण तयार होतो. त्याचा प्रसार उष्ण कटिबंधी व समशीतोष्ण कटिबंधी महासागरांत आहे.तसेच तो दक्षिण अमेरिका व आशियामधील अनेक मोठ्या नद्या-उपनद्यांत आढळतो.
पिरान्हा
पिरान्हा : टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब अशीही या माशाची इतर नावे आहेत. चॅरॅसिडी मत्य्कुलातील सेरॅसाल्मस वंशातील पुष्कळ जातींना पिरान्हा हे नाव देतात. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा., अँमेझॉनमध्ये) आढळतात. बहुसंख्य माशांची लांबी सु. ३५ सेंमी. असते; पण मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो. त्यांचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असते.
वाम
वाम : (बाले). या माशाचा समावेश अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरीनिसॉसिडी कुलात करतात. या कुलातील म्युरिनीसॉक्स सिनेरिअस व म्यु. टॅलॅबोनॉयडीस या दोन जाती वाम या नावाने ओळखल्या जातात.
बांगडा
बांगडा : स्काँब्रिडी मत्स्यकुलातील खाऱ्या पाण्यातील एक खाद्योपयोगी मासा. याचे शास्त्रीय नाव रास्ट्रेलिजर कानागुर्टा असे आहे. एफ्. डे यांनी याचा समावेश स्काँबर वंशात केला असून त्याचे नाव स्काँवर मायक्रोलेपिडोट्स असे ठेवले आहे. भारतात हीच जाती आढळत असून मराठीत याला बांगडा, बांगडई किंवा तेल-बांगडा म्हणतात.
दोदरी रावशी
मांस रुचकर व स्वादिष्ट
नेवीगेशन

T5 2019/03/22 07:48:3.623091 GMT+0530

T24 2019/03/22 07:48:3.629178 GMT+0530
Back to top

T12019/03/22 07:48:3.357127 GMT+0530

T612019/03/22 07:48:3.376124 GMT+0530

T622019/03/22 07:48:3.425859 GMT+0530

T632019/03/22 07:48:3.426023 GMT+0530