Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/01/19 16:12:14.002214 GMT+0530
शेअर करा

T3 2019/01/19 16:12:14.007629 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/01/19 16:12:14.038341 GMT+0530

दोदरी रावशी

मांस रुचकर व स्वादिष्ट

दोदरी रावशी : हा मासा पॉलिनीमिडी या मत्स्यकुलातील असून त्याचे प्राणिविज्ञानातील नाव पॉलिनीमस पॅरॅडीसियस असे आहे. भारतीय समुद्रात विशेषेकरून बंगालच्या उपसागरात हे मासे आढळतात. पश्चिम बंगाल आणि ओरिसा यांच्या किनाऱ्यालगत आणि नदीमुखाजवळील पाण्यात ते मुबलक आहेत.

शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असून शेपटीकडे निमुळते असते. शरीराची लांबी १५-२३ सेंमी. असून त्यावर कंकताभ शल्क (फणीसारखे खवले) असतात. सगळे अंग आणि पक्ष (पर) पिवळसर रंगाचे असतात; पण पाठीवर आणि पक्षांवर करड्या रंगाची झाक असते. अंसपक्षाच्या (छातीच्या भागावरील पराच्या) बुडाखाली सात मोकळे पक्ष-अर (पक्षांना आधार देणारे सांगाड्याचे घटक) असून त्यांपैकी वरचे तीन सगळ्यांत लांब व मजबूत असतात. त्यांची लांबी माशाच्या लांबीच्या दुप्पट असते. पुच्छपक्ष (शेपटीचे पर) द्विशाखित असून दोन पालींच्या मधली खोबण खोल असते. वरची पाली खालची पेक्षा जास्त लांब असते. डोळे बारीक असतात.

नैऋत्य मॉन्सूनच्या सुरुवातील हे मासे अंडी घालण्याकरिता नदी मुखातून नदीत फार दूरवर जातात. त्यांच्या या स्थलांतराच्या काळात विशेषतः जून महिन्यात हे मासे पकडण्याच्या धंद्याला विशेष तेजी येते. सामान्यतः यांची मासेमारी एप्रिलपासून सुरू होते. हे मासे जरी लहान असले, तरी त्यांचे मांस रुचकर व स्वादिष्ट असल्यामुळे त्यांना फार मागणी असते.

 

 

लेखक-यार्दी ह. व्यं.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

2.8
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/01/19 16:12:14.218140 GMT+0530

T24 2019/01/19 16:12:14.225478 GMT+0530
Back to top

T12019/01/19 16:12:13.944702 GMT+0530

T612019/01/19 16:12:13.963805 GMT+0530

T622019/01/19 16:12:13.992110 GMT+0530

T632019/01/19 16:12:13.992901 GMT+0530