Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:06:8.115111 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:06:8.120779 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:06:8.150646 GMT+0530

पाइक

पाइक : हे मासे एसॉसिडी मत्स्यकुलातील असून त्यांच्या कित्येक जाती आहेत. सामान्य जातीचे शास्त्रीय नाव एसॉक्स ल्यूसिअस असे आहे. हे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेतील नद्या व सरोवरे यांत आढळतात.

पाइक

हे मासे एसॉसिडी मत्स्यकुलातील असून त्यांच्या कित्येक जाती आहेत. सामान्य जातीचे शास्त्रीय नाव एसॉक्स ल्यूसिअस असे आहे. हे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेतील नद्या व सरोवरे यांत आढळतात. याचे शरीर लांबट, दोन्ही बाजूंनी दबलेले असून हिरवट तपकिरी वा हिरवट करड्या रंगाचे असते व त्यावर फिक्कट रंगाचे ठिपके असतात. पक्षांवर (परांवर) काळे डाग असतात. शरीर लहान खवल्यांनी झाकलेले असते. डोके लांब, मुस्कट कलथ्याच्या अथवा चमच्याच्या आकाराचे आणि तोंड पुष्कळ मोठे असते. जबड्यांमध्ये मजबूत व लांब दात असतात आणि टाळू व जीभ यांवर लहान दातांचे पट्टे असतात. दात मागे वळलेले असल्यामुळे भक्ष्य बाहेरून तोंडात सहज जाऊ शकते; परंतु सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) आणि गुदपक्ष बरेच मागे शेपटावर असतात, त्यामुळे हा फार वेगाने पोहू शकतो.

गोड्या पाण्यातील माशांमध्ये पाइक हे अत्यंत खादाड आहेत. लहान मासे, कीटक आणि जलचर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी यांवर ते उदरनिर्वाह करतात. मोठे पाइक चिचुंदऱ्या आणि पाणकोंबड्या पकडून खातात; ते कोल्हे आणि लहान कुत्रे यांवर देखील हल्ला करतात असे म्हणतात.

मादी वर्षाच्या सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यांत नदीच्या पात्रात सु. ५,००,००० अंडी घालते; पण त्यांपैकी पुष्कळ अंडी इतर मासे खातात. पाइक मासा एक वर्षाचा झाला म्हणजे त्याची लांबी सरासरी ५० सेंमी. व पाच वर्षांचा झाल्यावर सरासरी ७५ सेंमी. होते. या माशांचे सरासरी वजन सु. १.३४ किग्रॅ. असते; परंतु १.२ मी. पेक्षा जास्त लांब व २२.६ किग्रॅ. पेक्षा जास्त वजन असलेल्या माशांची काही उदाहरणे आहेत. नराला सु. दोन वर्षांनी व मादीला सु. चार वर्षांनी प्रौढत्व येते. हे मासे २०-३० वर्षे जगतात, परंतु काही ७५ वर्षे जगल्याची नोंद आढळते.

 

सूर्यवंशी, वि. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

3.08695652174
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:06:8.337076 GMT+0530

T24 2019/10/18 04:06:8.343688 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:06:8.032034 GMT+0530

T612019/10/18 04:06:8.052211 GMT+0530

T622019/10/18 04:06:8.104013 GMT+0530

T632019/10/18 04:06:8.104929 GMT+0530